मुलाखत पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
वीणा गवाणकर ह्यांचा जन्म ६ मे, इ. स. १९४३ पुण्याजवळ
लोणी काळभोर येथे झाला. त्या मराठी लेखिका आहेत. कृषी, निसर्ग, पर्यावरण आणि
प्राणी या क्षेत्रात महत्त्वाच काम करणा-या तज्ञांच्या जीवनावरती त्यांनी ललितलेखन
केलेलं आहे. वीणाताई चार वर्षे मिलिंद कला महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून नोकरीला होत्या.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे ज्येष्ठ साहित्यिका वीणाताई गवाणकर ( एक होता कार्व्हर, डॉ. सालीम अली अशा अनेक चरित्र ग्रंथांच्या प्रसिद्ध लेखिका) यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्याल आले होते. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र महिला व्यासपीठच्या कार्यकारी संयोजिका ममता कानडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महाराष्ट्र महिला व्यासपीठच्या संयोजिका रेखा नार्वेकर आणि प्रा. सुहासिनी किर्तीकर यांनी वीणाताईंशी संवाद साधला.

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हा अमेरिकेल जन्मलेला एक अनाथ गुलाम, त्याने कृषी
क्षेत्रात जी क्रांती केली, त्याची कथा वीणाताईंनी आपल्या ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकातून
लोकांसमोर मांडली. या पुस्तकाबरोबरच वीणा गवाणकर यांचे नाव साहित्यजगतात ओळखीचे
झाले.
‘एक होता कार्व्हर’ त्यानंतर डॉ. आयडा
स्कडर, गोल्डा मेयर, सर्पतज्ज्ञ रेमंड डिट्मार्स, लीझ माइट्नर, रोझलिंड
फ्रँकलीन, पक्षितज्ज्ञ डॉ. सालीम
अली, डॉ. खानखोजे, यांच्या जीवनावर त्यांनी पुस्तके लिहिली. त्यांनी केलेल्या
लेखनासाठी त्यांना तीन वेळा महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. कोकण
मराठी साहित्य परिषदेचा धनंजय कीर पुरस्कार आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा
कै. प्रा. वि. ह. कुलकर्णी पुरस्कार आदी पुरस्कारांसह २०१४ मध्ये एसएनडीटी
विद्यापीठातर्फे वूमन ऑफ दी इयर या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं आहे.
हे सर्व साहित्य लिहिताना त्यांना त्या काळी माहिती मिळवण्यासाठी खूप मेहनत
करावी लागली.
डॉ आयडा स्कडर हि वैद्यकीय सेवा ग्रामीण भागात देणारी जगातली पहिली
डॉक्टर होती. तिने दक्षिण भारतात खूप मोठ कामं केलं. त्यात बालविवाह, बालमाता,
बालमृत्यू अशा वेगवेगळ्या विषयांवर तिने मार्ग शोधले. तिच्याविषयी महिती
मिळवण्यासाठी वीणाताईंनी सहा दिवस मद्रासला जाऊन माहिती मिळवली.
यासर्वाबरोबरच वीणाताई ठिकठिकाणी कार्यक्रमाला जात असतात.
यावेळी मिळालेल्या मानधनातून प्रवास खर्च वगळता उर्वरित रक्कम त्या कु़डाळ येथील
जीवन आनंद या संस्थेस देतात.
साहित्य लिहिताना एक लेखिका म्हणून झालेला प्रवास, या प्रवासात आलेले वेगवेगळे अनुभव अशा अनेक गोष्टींचा उलगडा त्यांनी या
मुलाखतीत केला.
No comments:
Post a Comment