Tuesday 7 January 2020

महिला गौरव पुरस्कार - २०२० साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन....


मा. यशवंतरावजी चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून मानले जातात. राजकीय, सामाजिक, अर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या लक्षणीय कामगिरीमुळे राष्ट्रीय जीवनात महाराष्ट्राला गौरवास्पद स्थान प्राप्त झाले आहे. प्रखर स्वातंत्र्यसेनानी, कुशल मुत्सद्दी, सुसंस्कृत सत्ताधीश, लोकाग्रणी म्हणून त्यांचे स्थान लोकमानसात चिरंतन राहणार आहे. त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा जतन करून सार्वजनिक हिताचे विविध उपक्रम हाती घेण्याच्या उद्देशाने १९८५ साली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ची स्थापना झाली. प्रतिष्ठानतर्फे सन २०१९ पासून 'महिला गौरव पुरस्कार' देण्यात येत आहे. सन २०२० या वर्षासाठी साहित्य क्षेत्रातील कोणत्याही भाषेतील साहित्यकृतींचा उत्तम अनुवाद मराठी भाषेत करणा-या महाराष्ट्रातील महिलेस हा पुरस्कार दिला जाणार असून रोख रक्कम १०,०००/-, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सदर पुरस्कारासाठी महिलांची नावे विहित पध्दतीनूसार सुचविण्यासाठी पुरस्कार नियमावली कृपया यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट मुंबई ४०० ०२१ या पत्तावर संपर्क साधावा. पुरस्कारासाठी नावे पाठविण्याची अखेरची तारिख २६ जानेवारी २०२० आहे.


No comments:

Post a Comment