Wednesday, 1 January 2020

फ्यूजन-२०१९ संगम सप्तकलांचा...


सप्तकलांच्या अविष्कारातून रसिकांना नववर्षाची सुरेल भेट

नाशिक (दि. ३१) : सरत्या वर्षाची सायंकाळ आणि सूरांची बरसात  यांचा अनोखा मेळ जीवन जगण्याचे  बळ व सकारात्मक जाणिवांचे आनंदी चांदणे बरसून गेले. प्रत्येक रसिकाने मनात सूरांची आठवण काळीजकुपीत आणि हृदयात निश्चित जपून ठेवली असेल. निमित्त होते नववर्षाच्या पूर्वसंध्येला नव्या संकल्पांची नवी मैत्री, नवी ओळख आनंदाची जाणीव असलेल्या नवीन वर्षाची सुरुवात ही थोड्याशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्हावी,  याकरीताच नववर्षाच्या पूर्वसंध्येला काही चांगले संकल्प घेऊन नवीन वर्ष आपण सर्वच एका वेगळ्या प्रकारे साजरा करावा या संकल्पनेतून विश्वास ग्रृप, विश्वास संकल्प आनंदाचा उपक्रमातंर्गत फ्यूजन-२०१९ संगम सप्तकलांचा...या अनोख्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.
सांज सुरांची आठवण, सांज ये गोकुळी या गीतातून अलगद चालत आली आणि त्यानंतर सूर संगीत, ताल यांची अनोखी अनुभूती रसिकांना अमृतानुभव देऊन गेली. नृत्य, लावणी, भावगीत, समुहगीत, त्याचबरोबर शिल्पकला, चित्रकला यांचा अनोखा मिलाप जीवनाचे फ्यूजन कसे सुंदर आकाराला येते याचे दर्शन घडविणारे होते. लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, अधिर मन झाले, चांदणं-चांदणं झाली रात..., वेडात मराठे वीर दौडले सात..., पाहिले नं मी तुला.. तु मला.., वार्‍यावरती गंध पसरला नाते मनाचे..., आम्ही ठाकरं ठाकरं..., लिंबोगाचा डोंगर..., श्रावणाचं ऊन मला झेपेना.., उगवली शुक्राची चांदणी... अशा एकाहून एक सरस गीतांतून मैफिलीला रंग चढत गेला. हिंदी, मराठी गीतांमधला आशय आणि त्यातून मिळणारा संगितानुभव भारतीय चित्रपट संगीताचा सुरमयी प्रवासच होता. याद किया दिल ने कहाँ हो तुम..., आजी रूठ के अब कहाँ जायीगा..., अभी ना जाओ छोडकर अशा गीतांमधली नजाकत जीवनावरचं प्रेम आणि आशयाचं दर्शन घडविणारे होते. सचिन शिंदे दिग्दर्शित विनोदी नाट्यप्रवेशाने रसिकांना नाट्यानुभवाची अनोखी हास्यानुभूती दिली. जीवनातल्या रोजच्या विसंगतीवर त्यातून नेमके बोट ठेवले.
विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकरनगर, गंगापूर रोड येथे सदर मैफल संपन्न झाली. कार्यक्रमाची संकल्पना विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास जयदेव ठाकूर यांची होती तर संयोजक मिलिंद धटिंगण हे होते. सदर उपक्रमाचे ५ वे वर्ष असून नववर्षाच्या पूर्वसंध्येला वेगळे आणि अभिरूची संपन्न कार्यक्रमाची परंपरा विश्वास गृ्रपने राखली आहे.
शब्द-सूर-ताल-रंगरेषा या समन्वयातून वैशिष्ठपूर्ण अविष्कार रसिकांना अनुभवण्यास मिळाला. चित्र, शिल्प, गायन, नृत्य अशी ही विविधरंगी मैफल आनंदानुभव देणारी ठरली.
विश्वास को-ऑप बँक लि. नाशिक,  सारस्वत बँक,  फॅरवशी इंटरनॅशनल अ‍ॅकेडमी, जुम्मा मस्जिद चॅरिटेबल ट्रस्ट,  स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था, पिंपळगाव (ब.), नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमास नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे-पाटील यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की,
समाजाला आनंद देण्यासाठी विश्वास संकल्प आनंदाचा ही जनमानसांची चळवळ झाली असून समाजाला विधायक कार्याची प्रेरणा देणारी आहे. यातून नव्या पिढीलाही दिशा मिळेल.
संयोजक मिलिंद धटिंगण, गायन मकरंद हिंगणे, मिलिंद धटिंगण, विवेक केळकर, मीना परूळकर निकम, शुभंकर हिंगणे यांनी केले. सहगायन तन्मयी घाडगे, दिशा दाते, जुई आंबेकर यांनी केले.
नृत्यविष्कार डॉ. सुमुखी अथणी व सहकारी कलावंतांनी सादर केला. तसेच नाट्यविष्कार दत्ता पाटील, सचिन शिंदे, शुभम लांडगे, निलेश सुर्यवंशी, रोहित सरोदे व लक्ष्मण कोकणे यांनी सादर केले. चित्र - भारती हिंगणे, शिल्पकला - यतीन पंडीत, तर तबला - नितीन वारे, वाद्यवृंद कलाकार - अमोल पाळेकर, रागेश्री धुमाळ, शुभम जाधव, जय शेजवळ, अनिल धुमाळ, दिगंबर सोनवणे, दिनेश पडाया यांची होती. संहिता व निवेदन-किशोर पाठक यांचे होते तर ध्वनी व्यवस्था व प्रकाश व्यवस्था - सचिन तिडके यांची होती. कार्यक्रमास महसुल उपायुक्त रघुनाथ गावडे, डॉ. कैलास कमोद, विलास हावरे, दिपक करंजीकर, डॉ. प्रदीप पवार, विलास हावरे, अजित मोडक, जयंत भातंबरेकर, जालींदर ताडगे, रमेश देशमुख, प्रतापदादा सोनवणे, अ‍ॅड. नितीन ठाकरे, विद्या करंजीकर व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदी मान्यवर उपस्थित होते. हस्ते कलावंतांचे सत्कार जयंत कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले.  स्वागत व प्रास्ताविक विश्वास गु्रपचे कुटुंब प्रमुख विश्वास ठाकूर यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. मनोज शिंपी यांनी केले. समन्वयक-विनायक रानडे, डॉ. मनोज शिंपी हे होते.



No comments:

Post a Comment