Sunday, 19 January 2020

फिनलंडची शिक्षणपद्धती - प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न...

डॉ. हेरंब कुलकर्णी यांनी फिनलंड सारखा एक छोटासा देश १९७० नंतर शिक्षणातील बदलामुळे कसा प्रगतीप्रथावर पोहोचला याचे विश्लेषण करून आज जगातल्या पहिल्या पाच देशाबरोबर या देशाचा GDP कशारीतीने वाढला आहे याची तुलनात्मक आकडेवारी मांडली. फिनलंड मधील शिक्षणपद्धतीत पूर्व प्राथमिक,प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक,पदवी पदव्युत्तर,पीएच. डी. यांसारखे शिक्षण कशारीतीने दिले जाते याचा आलेख त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. फिनलंड या देशात सरकारी शाळांचे प्रमाण हे जास्तीचे म्हणजे ९० च्या वर आहे. तिथे खाजगी शाळांचे प्रमाण खूप कमी आहे. खाजगी शिकवणी वर्ग नाहीत. फिनलंडमध्ये वयवर्षे ७ पर्यंतची मुले शाळेत जाण्याऐवजी डे-केअर मध्ये जातात आणि तिथे त्यांचा भावनिक,शारीरिक,सामाजिक,बौद्धिक विकास केला जातो. इयत्ता निहाय परीक्षा पद्धती नाहीपण मूल्यमापनाच्या विविध पद्धती आहेत असे प्रतिपादन त्यांनी केले. भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये कोणता बदल आवश्यक आहे. याबद्दलचे मत त्यांनी व्यक्त केले.
शाळा,अभ्यासक्रम,पुस्तके,परीक्षा,अध्यापनाच्या पद्धती,शिक्षक,मुख्याध्यापक,यांची नियुक्ती त्यांचे पगार,समाजात असलेले त्यांचे स्थान यांसंदर्भात मुक्त संवाद डॉ. हेरंब कुलकर्णी यांनी उपस्थितांशी साधला. भारतीय शिक्षणपद्धती आणि फिनलंडची शिक्षणपद्धती यांचा तुलनात्मक आढावा व त्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थितांनी मांडले.
कार्यक्रमाचे निवेदन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्यक्रम प्रमुख मा. दत्ता बाळसराफ यांनी केले व उपस्थितांचे आभार शिक्षण विकास मंचाचे समन्वयक माधव सूर्यवंशी यांनी मांडले.




No comments:

Post a Comment