भारतात
विशेषतः गुजरात आणि राजस्थान राज्यामध्ये वापरल्या जाणार्या प्राचीन हस्तकलांपैकी
बांधणी एक आहे. भारतात साडी, कुर्ता व ओढणी तयार करण्यासाठी बांधणी
कला वापरली गेली आहे. शब्द 'बांधणी' हा शब्द बंधन पासून बनलेला आहे. ज्याचा अर्थ कापड बांधणे असा आहे.
कापड तयार करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत जे वायब्रेंट रंग वापरून
नमुने आणि फॉर्म तयार करतात. प्राचीन भारतीय संस्कृती आणि कलांबद्दल मुलांना जागृकता निर्माण व्हावी,
यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पूजा शिंदे, प्राची घाणेकर, शिवानी धनावडे यांनी या कार्यशाळेत
मुलांना मार्गदर्शन केले. ठळक आणि उज्ज्वल रंग मुलांना सृजनशीलता, सकारात्मकता आणि एकत्रितता आणण्यास प्रोत्साहित करतात.
No comments:
Post a Comment