विश्वास ग्रृपतर्फे ‘सुर
विश्वास’चे *सहावे पुष्प
शास्त्रीय संगीत ते भक्ती संगीत अशा
सुमधुर आणि प्रयोगशील स्वरांची मेजवानी रसिकांना अनुभवण्यास मिळाली. निमित्त होते
सूरविश्वास मैफिलीत सुप्रसिद्ध गायक पं.मकरंद हिंगणे यांचे गायन. सूरविश्वासचे
सहावे पुष्प त्यांनी गुंफले. सावरकरनगर येथील विश्वास हब येथे हा कार्यक्रम संपन्न
झाला.
नव्या पिढीतील कलाकारांच्या अविष्काराला
हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी ‘सूर विश्वास’
हा अनोखा उपक्रम ‘विश्वास गृ्रप’तर्फे
सुरु करण्यात आला आहे. ‘विश्वास ग्रृप’चे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून, संकल्पना
विनायक रानडे यांची आहे.
मैफलीची सुरुवात आज बधाई बाजे...
घनश्याम कृष्णाच्या जन्मानंतर गोकुळात श्रावण मेघांनी आच्छादित वातावरणात जणू
सूर्योदय झाला. नंद यशोदेचे सगळे अभिनंदन करू लागले. हा हर्षोल्लास सालगवराली
रागाच्या स्वरांनी श्रोत्यांसमोर साकारला. काहीश्या अनवट अशा, दक्षिण
भारतीय संगीतातील या रागानंतर
‘दरस बिन सूनो’
ही बंदिश सादर केली आणि वातावरणात स्वरांनी रिमझीमच जणू सुरु
झाली.
त्यानंतर आषाढाच्या घनगर्द वातावरणात
कवी शंकर रामाणी यांचे ‘रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी’ हे
पं.जितेन्द्र अभिषेकी यांनी गायलेली प्रसिद्ध स्वरचना सादर केली. विराणीची हुरहुर
अस्वस्थ करीत असताना नंतरच्या ‘आम्हा न कळे ज्ञान’ या चोखोबांच्या रचनेने आणि ‘अवघे
गरजे पंढरपूर’
या भक्तीगीताने सभागृह भक्तीमय झाले.
कार्यक्रमात आनंद अत्रे (हार्मोनियम), नितीन
पवार (तबला) व सुखदा बेहेरे,
केतन इनामदार,
अजिंक्य जोशी,
शुभंकर हिंगणे,
अमोल पाळेकर यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.
स्मिता मालपुरे यांनी केले.
सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण
प्रतिष्ठान,
मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास
ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी
रेडिओ, विश्वास गार्डन,
कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त
विद्यमाने संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी राहुल भावे (पद्मावती केटरर्स) यांचे
सहकार्य लाभले. कार्यक्रमात कुसुमाग्रज प्रतिष्ठानवर विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल
अॅड. अजय निकम यांचा सन्मान विश्वास ठाकूर यांनी केला. तसेच साथसंगत करणार्या
कलावंतांचे सन्मान विश्वास ज्ञान
प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी, बीएसएनएलचे महाप्रबंधक नितीन महाजन, महसूल
उपायुक्त संगीता धायगुडे,
मिलींद धटिंगण,
उद्योजक
डी. जे. हंसवाणी, कौस्तुभ
मेहता, डॉ. सुधीर संकलेचा, एबीबी कंपनीचे उपाध्यक्ष अजय गोसावी
यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास आ. हेमंत टकले,
अॅड. विलास लोणारी, आर्कि.संजय
पाटील, किशोर पाठक,
डॉ. हेमंत कोतवाल, अमर भागवत, किरण
निकम, राधिका गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शन
विनायक रानडे यांनी केले.
No comments:
Post a Comment