Friday, 14 February 2020

अंमली पदार्थ सेवनाविरोधात जनजागृती रॅली...


बहुतांश शाळा कॉलेजातील मुले ही अंमली पदार्थ सेवनाच्या आहारी जातात. वाईट संगतीत राहून आयुष्य खराब करून घेतात. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नवी मुंबई व अन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने SIES महाविद्यालयातील विध्यार्थ्यांच्या माध्यमातून अंमली पदार्थ सेवना विरुद्ध शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता SIES कॉलेज ते नेरुळ रेल्वे स्टेशन व परत अशी सुमारे ६ किलोमीटरची रॅली (मोर्चा) काढण्यात आली.
यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड, अन्वय प्रतिष्ठानचे डॉ. अजित मगदूम, प्रा. वृशाली मगदूम, कॉलेजचे प्राचार्य, अध्यापक व भाग घेणारे सुमारे २०० विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होते.





Thursday, 13 February 2020

स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यशाळा


आजकाल महिलांसोबत नेहमीच छेडछाडीचे प्रकार घडत असतात. अशा प्रसंगी महिलांनी सक्षम रहावे, यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, नवमहाराष्ट्र युवा अभियान तर्फे १३ फेब्रुवारी २०२० रोजी स्व-संरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे स्वरूप आणि उद्देश यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ यांनी सांगितला. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिषा खिल्लारे यांनी केले. उषादेवी पांडुरंग हायस्कुल, कुलाबा चे मुख्याध्यापक, सुरेश धनावडे, शिक्षक राजाराम भोसले, Combat Tactical SystemsCTS चे भूषण चव्हाण यांनी उपस्थित महिलांना प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता बाळसराफ, नवमहाराष्ट्र युवा अभियानच्या कार्यालयातील मिनल सावंत आणि मनिषा खिल्लारे आदि उपस्थित होते.






व्हय, मी सावित्रीबाई


कलर्स मराठी वाहिनीवर सादर झालेला कार्यक्रम
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र कोकण व नवनिर्माण विद्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ९.३० वाजता नवनिर्माण विद्यालय, रत्नागिरी येथे सुषमा देशपांडे लिखित व दिग्दर्शित व्हय, मी सावित्रीबाई सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरच्या चरित्रनाट्य दाखविले जाणार आहे. शिल्पा साने, शुभांगी भुजबळ या मान्यवर हि कलाकृती सादर करणार आहेत.

व्यक्तिमत्व विकास आणि करिअर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नवी मुंबई तर्फे शनिवार १५ फेब्रुवारी २०२० रोजी स्टर्लिंग कॉलेज, सेक्टर १९ ए, नेरुल येथे व्यक्तिमत्व विकास आणि करिअर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. चाणक्य मंडळ परिवाराचे सिद्धार्थ अविनाश धर्माधिकारी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Tuesday, 11 February 2020

बहुभाषा कविसंमेलनाचे आयोजन...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र ठाणे तर्फे बहुभाषा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. महेश केळुसकर हे या कविसंमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. निरनिराळ्या भाषा घेऊन शशिकांत तिरोडकर (मराठी), प्राजक्ता सामंत (मालवणी), दिलीप सावंत (मराठी), गोविंद नाईक (मराठी), हरी मृदुल (हिंदी), रूजुल भानुशाली (गुजराती), फिलोमिना सॅमफ्रान्सिको (कोकणी) हे कविसंमेलनात सहभाग घेणार असून रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ५.३० वाजता, मराठी ग्रंथ संग्रहालय, तिसरा मजला, राजावत ज्वेलर्स समोर, गोखले रोड, ठाणे (प.) येथे हे कविसंमेलन पार पडेल. तरी अशा बहुभाषिक कविता ऐकण्यासाठी आपण या कविसंमेलनास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Monday, 10 February 2020

विज्ञानगंगाचे सत्तेचाळीसावे पुष्प ‘महाराष्ट्रातील दुष्काळे'


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा’ कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील दुष्काळे' (Famine in Maharashtra) या विषयावर विनामूल्य मराठीतून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. लातूरचे पत्रकार, श्री. अतुल देऊळगावकर मंगळवार दि. १८ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.

Sunday, 9 February 2020

अनाथ मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई विभागीय केंद्रातर्फे पनवेल येथील गजानन महाराज लीला ट्रस्ट संचलित अनाथ मुलांच्या शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस, खाऊ वाटपास प्रायोजकत्व देण्यात आले. या शाळेत ६०० मुलं मुली असून चित्रकला, नृत्य, क्रीडा यात ही मुलं निपुण आहेत. नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड यांनी संस्था चालक जगदीश जाधव यांचे कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.