Sunday, 12 May 2019

शाहिर अनंत फंदी यांच्या शहिरीतून समाज वास्तवाचे परखड़ प्रतिबिम्ब -प्रा शिरीष गंधे



महाराष्ट्रातील शाहिरांनी धीटपणाने सामाजिक वास्तव मांडले, विलक्षण भाषावैभव संवेदनशीलता यांचा अनोखा संगम त्यांच्या शाहिरीत दिसून येतो. अनंत फंदी यांची शाहिरी काळाचे नेमके चित्रण करणारी होती म्हणूनच ते द्र्ष्टे कलावंत होते.
त्यातूनच समाजाबरोबरच सामान्य माणसाचे दुःख, त्यांची हतबलता त्यांच्या काव्यात सहजपणे येते.
दागिन्यांची वर्णन करणारी 'चंद्रावळ' सारखी लावणी असो किंवा दुसऱ्या बाजीरावाला उद्देशून 'दोन दिसाची जाईल सत्ता, अपयश माथा घेऊ नको' त्यांच्यातील रोखठोक शाहिरीचे दर्शन घडवते असे प्रतिपादन प्रा. शिरीष गंधे यानी केले. प्रख्यात शाहीर अनंत फंदी यांच्या द्विशताब्दी स्मृतीवर्षानिमित्त अनंत फंदी-चरित्र व कार्य या विषयांवर सुप्रसिद्ध लेखक प्रा. शिरीष गंधे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, ग्रंथ तुमच्या दारी सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला. विश्वास ग्रुप चे कुटुंबप्रमुख, विश्वास ठाकुर कार्यक्रमाचे आयोजक होते. अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, येथे हा कार्यक्रम संपन्न झाला
शाहिरी लोककला ही समाजाचा आरसा आहे व त्यांचे जतन तसेच संवर्धन करणे म्हणजे अनंत फंदी यांचे खरे स्मरण होईलअसे ते म्हणाले. कार्यक्रमाचे स्वागत व् प्रास्ताविक प्रसाद विजय पाटील यानी केले. प्रा. गंधे यांचा सन्मान विनायक रानडे यांनी केला. अनिता गंधे यांचा सन्मान अनिता नेवे यानी केला.
















Friday, 10 May 2019

शाहीर अनंत फंदी यांच्या कार्यावर व्याख्यानाचे आयोजन…



प्रख्यात शाहीर अनंत फंदी यांच्या द्विशताब्दी स्मृतीवर्षानिमित्त अनंत फंदी-चरित्र व कार्य या विषयांवर सुप्रसिद्ध लेखक प्रा. शिरीष गंधे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, ग्रंथ तुमच्या दारी सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.  शनिवार, ११ मे २०१९ रोजी सायं. ६.०० वाजता अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
अनंत फंदी हे पेशवाईतील एक दरबारी कवी होते. सन १७४४ मधे जन्मलेल्या फंदींचा मृत्यू १८१९ मधे झाला. त्यांच्या मृत्यूला आता दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. होनाजी या तत्कालीन प्रतिभावंत कवीने अनंत कवनांचा सागरअशा शब्दात तारीफ केली आहे. अनंत फंदी हा मुळात तमासगीर शाहीर. बहुश्रुतता, वक्तृत्व आणि भाषेवरील प्रभुत्व यामुळे ते पुढे कीर्तनकार झाले. फंदींनी लावण्या, पोवाडे, कटाव आणि फटके रचले. त्यापैकी फक्त सात पोवाडे, आठ लावण्या आणि काही फटके आज उपलब्ध आहेत. श्लोक, ओव्या, आर्या आणि पदे अशाही रचना त्यांच्या नावावर आहेत. रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा आणि फटका या फंदींच्या काही गाजलेल्या रचना. फंदींना मराठीतील फटका या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते. बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको, संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको हा त्यांचा उपदेशपर फटका फार प्रसिद्ध आहे.
विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या कार्यक्रमाचे आयोजक असून, संयोजक विनायक रानडे आहेत. तरी कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.



Wednesday, 8 May 2019

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे बालनाट्य शिबिराचे आयोजन



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक यांच्या वतीने सुप्रसिद्ध नाट्यकलावंत लक्ष्मी पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली बालनाट्य शिबिराचेआयोजन करण्यात आले आहे.
मुला-मुलींच्या जडण घडणीत शिक्षणाला जसे महत्त्व आहे तसे आजच्या जगात सभाधीटपणा, संभाषण कला, निरीक्षण क्षमता, एकाग्रता, सुप्त गुणांचा विकास, स्वत:ला सादर कसे करावे, सांघिकतेचे महत्त्व आदि विषयांचा समावेश असलेली शिबिरे गेली अनेक वर्षे समाजातील विविध स्तरातील मुला-मुलींसाठी लक्ष्मी पिंपळे घेत असतात. सदर शिबीर अभिनय व मनोरंजनात्मक खेळाच्या माध्यमातून घेतले जाते.
लक्ष्मी पिंपळे यांनी अनेक लोकप्रिय नाटकांमध्ये अभिनय केला असुन त्यात खंडोबाच लगीन, क्रांतीचक्र, प्लाइंग क्वीनस्, मॅन वुमन अ‍ॅण्ड नेबर, ब्रेकींग न्यूज, दि बुद्धा, दर्दे डिस्को, माय डिअर शुभी, ‘तिरथ मे तो सब पानीअशा अनेक नाटकांमध्ये अभिनय केला आहे. अनेक साहित्यकृतींचे अभिवाचन केले आहे. पिंपळे या भरतनाट्यम् विशारद आहेत.
सदर शिबीर ८ वर्षापुढील मुला-मुलींसाठी असून बुधवार १५ मे ते बुधवार २२ मे २०१९ या कालावधीत सायं. ५ ते ८ या वेळेत क्लब हाऊस (विश्वास गार्डन), ठाकूर रेसिडेन्सी,
विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न होणार आहे.
शिबीराच्या संपर्कासाठी व अधिक माहितीसाठी राजू देसले- ७७२००५२५७२,
सचिन हांडे-७७२००५२५५९, ज्ञानेश्वर शिरसाठ-९६०४०६१७५८, विनायक रानडे-९९२२२२५७७७यांच्याशी संपर्क साधावा.
या बालनाट्य शिबिरास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.








Tuesday, 7 May 2019

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम व्याख्यानाचे आयोजन...

संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, आणि महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे सन २०१९ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ९, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० यात आणखी सुधारणा करण्याकरिता अध्यादेश आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांवर काम करण्याचा त्याचा प्रभाव या विषयावरती विनामूल्य व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अॅड. प्रमोद कुमार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विभाग १५४ब-२ मध्ये सहकारी संस्थांची नोंदणी कशी केली जाते, सहकारी संस्था कशा पद्धतीने काम करतात,  महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम अंतर्गत येणा-या सर्व गोष्टींबाबत त्यांनी संपूर्ण माहिती दिली.






संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येेथे क्लिक करा.



संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Monday, 6 May 2019

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे वारली चित्रप्रशिक्षण कार्यशाळा…



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नाशिक विभागीय केंद्रातर्फे वारली चित्रसृष्टी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. शनिवार दि. ११ मे व रविवार दि. १२ मे रोजी पहिली बॅच आणि सोमवार दि.१३ मे व मंगळवार दि. १४ मे रोजी दुसरी बॅच होईल. सकाळी १० ते १ या वेळेत बेसिक कोर्स होईल. दुपारी २ ते ५ या वेळेत ऍडव्हान्स कोर्स होणार असून त्यात कापडावर आणि मातीच्या  पॉटवर वारली पेंटिंग कसे करायचे हे शिकविण्यात येणार आहे. क्लब हाऊस, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर येथे ही कार्यशाळा संपन्न होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि वारली चित्रशैलीचे अभ्यासक संजय देवधर हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळांमध्ये ५ ते ७५ वयोगटातील कलाप्रेमींना सहभागी होता येईल. बेसिक आणि ऍडव्हान्स आणि कॉम्बो कोर्स असे या कोर्सचे स्वरूप आहे. कार्यशाळेत सहभागी होताना पेन्सिल, पाण्यासाठी बाऊल, जुना रुमाल आणि पॅड आणावे. सहभागी सर्वांना आवश्यक साहित्य, पुस्तक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी राजू देसले ७७२००५२५७२
, सचिन हांडे ७७२००५२५५७, ज्ञानेश्वर शिरसाठ ९६०४०६१७५८ व विनायक रानडे ९९२२२२५७७७ यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त कलाप्रेमींनी  कार्यशाळेत सहभागी व्हावे आणि महाराष्ट्रातील शाश्वत कला शिकून कलानिर्मिती करण्याचा आनंद मिळवावा असे आवाहन आहे.




Friday, 3 May 2019

महाराष्ट्र महिला व्यासपीठ आयोजित स्वाक्षरी विश्लेषण कार्यशाळा...



शिका व कमवा
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे मंगळवार दि. १४ मे रोजी दुपारी १ ते ६ या वेळेत बेसमेंट सभागृह, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखानाच्या बाजूला, नरीमन पॉइंट येथे स्वाक्षरी विश्लेषण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा मराठीतून होणार असून या कार्यशाळेचे शुल्क रू. २०००(GST सहित) आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थींना कोर्स मटेरियल व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.  
या कार्यशाळेत प्रगतीतील अडथळे दूर करण्याचे उपाय, आर्थिक प्रगतीचे व यशाचे उपाय, राग नियंत्रित कसा करणे, आत्मविश्वास वाढविणे, स्मरणशक्ती व एकाग्रता वाढविणे, ताण तणाव कमी करण्याचे उपाय
अशा विविध गोष्टी शिकता येणार आहेत. या कार्यशाळेचे प्रशिक्षक प्रकाश मोहिते असणार आहेत तसेच कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आदर्श स्वाक्षरी कशी असावी हे शिकवण्यात येईल.
कार्यशाळेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संजना पवार २२०४५४६०
/ २२०२८५९८ विस्तारित २४४ अथवा भ्रमणध्वणी क्रमांक ८२९१४१६२१६ यावर संपर्क करावा.




यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी ‘जाकू’


चित्रपट चावडी

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडीउपक्रमांतर्गत शनिवार ४ मे २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध फ्रान्स दिग्दर्शक अ‍ॅग्नेस वरदा यांचा जाकूहा चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
ही अ‍ॅग्नेस वरदा यांच्या चित्रपट दिग्दर्शक पती जॅक डेमी यांच्या बालपणाच्या गोष्टींवर आधारीत फिल्म आहे. लहानग्या जाकूला नाटक, सिनेमा, पपेट्सचे आकर्षक आहे. फ्रान्समधील एका गावात त्याच्या वडीलांचे मोटार दुरूस्तीचे गॅरेज आहे. त्याने लहानपणीच ठरविले की आपण चित्रपट दिग्दर्शक व्हायचे. इकडे दुसर्‍या महायुद्धाचे पडघम वाजू लागतात. जाकू कॅमेरा मिळवतो आणि त्याचा स्वप्नवत प्रवास सुरू होतो, अशा विलक्षण प्रवासाची ही गोष्ट आहे.
सन १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या फ्रेंच चित्रपटाचा कालावधी १२० मिनिटांचा आहे. हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.