Wednesday, 16 October 2019


स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचे विशेष सहायक म्हणून काम केलेले आणि भारताचे माजी पंतप्रधान श्री. नरसिंह राव यांचे विश्वासू सहकारी म्हणून काम पाहिलेले मा. राम खांडेकर यांच्यासोबत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संवाद साधण्यात आला. राम खांडेकर यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, सरचिटणीस शरद काळे, कोषाध्यक्ष हेमंत टकले आदि उपस्थित होते.





शिक्षण विकास मंच आयोजित शिक्षण परिषद शालेय शिक्षण आणि वाचनसंस्कृती...


 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षण परिषद आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी ही रविवार, दि. २४ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित होईल. या दहाव्या वार्षिक परिषदेचा विषय शालेय शिक्षण आणि वाचनसंस्कृती असेल.
ही परिषद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, रंगस्वर सभागृह, चौथा मजला, मंत्रालयासमोर, मुंबई येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत होईल.
या परिषदेत:-
वाचनसंस्कृतीचे महत्त्व
वाचनसाहित्याचे विविध प्रकार
वाचनसंस्कृतीची सद्यस्थिती
वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी सुरू असलेले वाचन कट्ट्यासारखे विविध उपक्रम, चळवळी यांचा आढावा.
वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी सूचना, नियोजन, अंमलबजावणी या विषयांवर प्रामुख्याने विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या संदर्भात चर्चा होईल.
या परिषदेत चर्चा सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पुस्तकप्रेमी प्रतिनिधींना पुढील लिंक उघडून नोंदणी करता येईल.
परिषदेस प्रवेश निःशुल्क असला तरी मर्यादित आसनसंख्येमुळे लवकरात लवकर नोंदणी करावी.
उपरोक्त परिषदेबाबत आपल्या सूचनांचे स्वागत आहे. या सूचना पुढील ईमेल आयडीवर पाठवता येतील.
कार्यक्रमाचे सर्वसाधारण स्वरूप पुढीलप्रमाणे असेल:
ते ९.४५ - प्रत्यक्ष नोंदणी आणि चहापान
१० ते ११.३० उदघाटन (प्रमुख उपस्थिती:

Monday, 14 October 2019

पालक मेळावा संपन्न

'निवड : शाळेची आणि माध्यमाची' या विषयावर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान यांच्या वतीने १३ ऑक्टोबर २०१९ रोजी पुण्यातील गांधीभवन येथे पालक मेळावा संपन्न झाला. सुरुवातीला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्यक्रम प्रमुख दत्ता बाळसराफ यांनी हा विषय ठेवण्यामागची भूमिका मांडली. सोबतच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान शैक्षणिक व इतर अन्य क्षेत्रात जे उल्लेखनीय कार्य करीत आहे त्या बाबतचे विवेचन केले. वैशाली सरवणकर यांनी ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या कार्याची ओळख सर्वाना करून दिली.
यानंतर मेळाव्यास उपस्थित असलेल्या तीन पालकांनी प्रतिनिधीक स्वरूपात आपली मनोगते व्यक्त केली त्यातून सध्या पालक किती जागृत झाले आहेत हे दिसून आले. यानंतर मनोज खंडरे यांनी महाराष्ट्र व भारतातील इतर राज्ये यांची इंग्रजी माध्यमाचे प्रमाणात बाबत योग्य व सविस्तर माहिती दिली. यातून  दक्षिण भारतात जसे साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे तसे इंग्रजीतून शिकणाऱ्यांचेही प्रमाण जास्त आहे, असे निरीक्षण मांडले. अजित तिजोरे सर यांनी जि.प. तसेच मराठी माध्यमाच्या शाळेमधून शिकलेल्या कर्तबगार तरुण तरुणींचे सादरीकरण केले.
मेंदूविज्ञान व भाषाशिक्षण या विषयावर डॉ.श्रुती पानसे यांनी अभ्यासपूर्ण माहितीच्या आधारे सहजपणे सर्वाशी संवाद साधला. खरेतर मेंदूसारखा अवघड विषय परंतु अंत्यंत सोप्या पध्दतीने समजून सांगण्याची कुशलता विलक्षण आहे ती सर्वाना आवडली.
जेवणानंतर सत्रात श्रीमती धनवंती हर्डीकर यांनी शिक्षण भाषांचे आणि भाषांमधून या विषयाबाबत सखोल विश्लेषण केले. त्यांनी सहज गतीने आणि ओघवत्या वाणीने माध्यमाबाबत फक्त मराठीच नको तर विचार करून माध्यम ठरवा हा संदेश सर्वापर्यंत पोहचविला. आपण इतक्या खोलवर जाऊन खरेच माध्यमाबाबत खरेच निर्णय घेतो का ..? असा विचारप्रवण प्रश्र त्यांनी उपस्थित केला.
मेळाव्याच्या अखेरच्या भागात महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या पालकांच्या मनात जे प्रश्न होते त्यावर चर्चा झाली. या चर्चांना डॉ. वसंतराव काळपांडे, बसंती रॉय, धनवंती हर्डीकर, डॉ. श्रुती पानसे, अजित तिजोरे यांनी उत्तरे दिली.
या मेळाव्याचा समारोप  करीत असताना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक मा. वसंतराव काळपांडे यांनी दिवसभर चाललेल्या चर्चेचा आढावा घेतला. सर्व उपस्थितांचे आणि मेळाव्यासाठी ज्यांनी मदत केली त्या सर्वाचे आभार शिक्षण विकास मंचाचे समन्वयक माधव सूर्यवंशी यांनी मानले.






ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा २०१९

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये चार कर्तबगार ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला तसेच सोबती ज्येष्ठ नागरिक संघ, विलेपार्ले या संघटनेचा सुध्दा सत्कार करण्यात आला. यावर्षी रविवार दि. ६ ऑक्टोबर २०१९ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बांद्रा ते दहिसर या विभागामध्ये कार्यरत असलेल्या ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ नागरिक संघटनांचा मेळावा भरविण्यात आला होता. महिला ज्येष्ठ नागरिक श्रीमती कुमुद मंगलदास पटेल (सांताक्रुज), प्रो. निर्मला अशोक बतिजा (खार), पुरूष ज्येष्ठ नागरिक श्री. विरेंद्र शांताराम चित्रे (अंधेरी), श्री. माधव अनंत पुरोहित (कांदिवली) या चार ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार प्रमुख पाहूणे डॉ. आनंद नाडकर्णी व प्रतिष्ठानचे सरचिटणीस व निवड समितीचे अध्यक्ष मा. श्री. शरद काळे यांच्य हस्ते सत्कार करण्यात आला.




Friday, 11 October 2019

कायदेविषयक एकदिवशीय व्याख्यानमाला...



सोलापूर १२ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर, सोलापूर बार असोसिएशन, सोलापूर व यांच्या संयु्क्त विद्यमाने एकदिवशीय कायदेविषयक व्याख्यानमाला शनिवार १२ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ८.३० ते ५ वाजेपर्यंत डॉ. निर्मलकुमार फडकुलक सभागृह सिद्धेश्वर मंदिराजवळ, सोलापूर येथे होणार आहे. उद्घाटन मृनालिनी फडणीस, (कुलगुरु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ) तसेच सोलापूर केंद्राचे अध्यक्ष युन्नुसभाई शेख, प्रमुख पाहुणे प्रदिपसिह रजपूत (जिल्हा सरकारी वकील) उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख व्याख्याते अँड. डॉ. सुधाकर आव्हाड, अँड डॉ. मकरंद आडकर, अँड. डॉ. राजेंद्र अनुभुले असणार आहेत. सर्वांनी या व्याख्यानमालेला सहभाग नोंदवा असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Thursday, 10 October 2019

विज्ञानगंगाचे त्रेचाळीसावे पुष्प ‘रेल्वे पुल'...


 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगाकार्यक्रमांतर्गत रेल्वे पुल' या विषयावर विनामूल्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्याते डॉ. बी. के. कुशवाह शुक्रवार दि. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट मुंबई येथे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.

रांगोळी कार्यशाळा


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे प्रसिद्ध रांगोळी कलाकार मंजिरी प्रभुलकर यांच्या रांगोळी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक : शनिवार , १९ ऑक्टोबर २०१९
वेळ : दुपारी २ ते ५
प्रशिक्षण शुल्क : ३००/-
स्थळ : बेसमेंट हॉल, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई.
अधिक माहितीसाठी
संपर्क : संजना पवार ८२९१४१६२१६
कार्यालय : २२०४५४६० विस्तारित २४४.