Friday, 16 August 2019

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नाशिकतर्फे देशभक्तीपर कवितांतून झाली स्वातंत्र्याची जाणीव



नाशिक : देशासाठी लढणार्‍या वीरांचं स्मरण करून देशभक्तीचा, क्रांतीचा अविष्कार कवींनी प्रभावीतपणे सादर करून वातावरणात जल्लोष निर्माण केला. स्वातंत्र्यजपण्यासाठी देश रक्षणासाठी सर्वांनी सज्ज राहायला हवे. असा निर्धारच कवितांमधून कवी मांडत होते. मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणार्‍या सैनिकांचे स्मरणही कवितांतून येत होते. स्वातंत्र्याचे गीत नव्याने गाऊया विषयावरील कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हा अविष्कार रसिकांना अनुभवण्यास मिळाला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या कार्यक्रमाचे आयोजन विश्वास हब येथे करण्यात आले होते. कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवी अशोक निलकंठ सोनवणे उपस्थित होते. संमेलनाचे सूत्रसंचलन कवी रविंद्र मालुंजकर यांनी केले. कार्यक्रमाची संकल्पना प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांची होती.
कवींनी स्वातंत्र्यया विषयावरील कवितांचे सादरीकरण केले. त्यात पोवाडा, गझल, गेय, कविता अशा विविध प्रकारातून देशाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. शालेय विद्यार्थी ते ज्येष्ठ कवी नाशिकबरोबरच निफाड, सिन्नर, पिंपळगाव, घोटी येथून यात सहभागी झाले होते. दर्जेदार कविता व कवींची उर्स्फुत उपस्थिती नाशिकच्या काव्य क्षेत्रासाठी निश्‍चितच अभिमानास्पद आहे.
कवी राज शेळके यांनी स्वातंत्र्याचे प्रतीक आमच्या अभिमानाची भाषा, एकजुटीने निशाण, आमच्या जगण्याची अभिलाषा, भारतभूच्या जयकाराला गर्वाने गर्जतो एक तिरंगा, अखंड हिंदुस्थानाला पोसतो, या ओळीतून देशाची अखंडता, अभिमान व्यक्त केला.
कवी अरूण सोनवणे यांनी उज्ज्वल माझा देश तयाची उर्जस्वल ही माती, या मातीशी इमान अमुचे, या मातीशी नातीया ओळीतून मातीशी इमान राखण्याचे आश्वासन दिले व देशाच्या समृद्धीची लौकीकाची जाणीव करून दिली. कवी प्रशांत केंदळे यांनी या मातीचा वास मिळाला, आभाळाचा श्वास मिळाला, स्वातंत्र्याचा अर्थ कळाया, मोठ्ठा कारावास मिळालायातून प्राणपणाने लढणार्‍या वीरांचे स्मरण केले व स्वातंत्र्याचा अर्थ कष्टातून मिळाल्याची जाणीव व्यक्त केली. विविध कवींनी आपल्या दर्जेदार कविता सादर केल्या त्यात रमेश हरी संवत्सरकर, चंद्रकांत वासुदेव गोडबोले, पांडुरंग यादव पानसरे, शुभम दिगंबर मोरे, अमोल नामदेव चिने, राधाकृष्ण साळुंके, गणेश पवार, नामदेव जाधव, विलास पंचभाई, अजय बिरारी, वृषाली साटम-पोहरे, सचिन मोहिते, विलास गोडसे, प्रशांत कापसे, शिवाजी क्षीरसागर या कविंचा समावेश होता.



युवा स्वतंत्रता रैली उत्साहात संपन्न…



नाशिक : देशासाठी लढणार्‍या हुतात्म्यांचे स्मरण करून देश विकासासाठी एकत्र येऊन देशाच्या विकासा साठी आम्ही कटिबद्ध आहोत असा निर्धार युवा स्वतंत्रता रॅलीत सहभागी झालेल्या सर्वानी दिला
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, 
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने ७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला युवा स्वतंत्रता ज्योत रॅली चे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ७.०० वाजता हुतात्मा चौक, गंगापूर रोड येथून रॅलीला प्रारंभ झाला. गंगापूरनाका, के.टी.एच.एम. महाविद्यालय, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल,  हुतात्मा स्मारक सीबीएस येथे रॅलीचा समारोप झाला. त्यावेळी  यांनी राज्यघटनेच्या सरनाम्याचे वाचन डॉ मनोज शिंपी विनायक रानडे यांच्या बरोबर उपस्थितांनी केले. भारतमातेच्या वेशातील मुलगी सजविलेल्या रथात विराजमान झालेली होती.
यावेळी उपस्थित युवकांनी देशभक्तीपर गीतांनी व घोषणांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले. रॅलीत अनेक सामाजिक संस्था उत्स्फुर्तपणे सहभागी झाल्या होत्या. रॅलीच्या रॅलीमध्ये  प्रसाद पाटील, कैलास पाटील, विनय अंधारे, जयंत जोगळेकर, मिलिंद धटिंगण, विक्रम उगले, सारिका देशपांडे, गोरख चव्हाण, वसंत ठाकरे, विवेकराज ठाकूर, मंदार ठाकूर, कैलास सुर्यवंशी, किशोर त्रिभुवन, रमेश बागुल, सुरेश वाघ, भूषण भोसले, महेंद्र पवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.






Wednesday, 14 August 2019

Free Demonstrations & Health Talk


 Free Demonstrations & Health Talk

Yashwantrao Chavan Pratishthan Mumbai, Maharashtra  Mahila Vyaspeeth has organized Free Demonstrations & Health Talk
Super Foods
by renowned Chef SMITA DEO
(Host of cooking shows on You tube, Get curried and Ruchkar Mejwani)
And
Natural authentic cookware by Priya Deepak founder of Getkitch
On Thursday, 22nd August 2019 from 2 pm to 5 pm at Basement Hall, YB Centre, Gen. Jagannath  Bhosale Marg, Nariman Point, Mumbai 21.
For more information please Contact on 8291416216 or 22045460 ext 244.

‘युवा स्वातंत्र्य ज्योत’ कार्यक्रमाचे आयोजन...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई- नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या वतीने युवकांमध्ये राष्ट्रभावना जागृत होण्यासाठी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच बुधवार, दि. १४ ऑगस्ट २०१९ रोजी रात्री ११.०० वाजता युवा स्वातंत्र्य ज्योतकार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, संविधान चौक, नागपूर येथे करण्यात येत आहे.
करिता आपणास विनंती करण्यात येते की, उपरोक्त युवा स्वातंत्र्य ज्योतकार्यक्रमास आपण उपस्थित रहावे, ही नम्र विनंती.

Tuesday, 13 August 2019

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे युवा स्वतंत्रता ज्योत रॅलीचे आयोजन...


  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे
युवा स्वतंत्रता ज्योत रॅलीचे आयोजन...
दि. १४ : अनेक हुतात्म्यांच्या योगदानामुळेच आपल्याला हे स्वातत्र्य अनुभवायला मिळालं. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यदिन हा प्रत्येक भारतीयाच्या मनातील हुतात्म्यांच्या कार्याप्रती स्मरण करण्याचा हा अभिमान दिन आहे. हा दिन प्रत्येक भारतीयाने आपापल्यापरीने साजरा केला पाहिजे हे देखील प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. याच जाणिवेतून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियान व विश्वास ग्रुपतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला युवा स्वतंत्रता ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. युवा स्वतंत्रता ज्योत रॅली, गुरूवार, १४ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ७.०० वाजता हुतात्मा चौक, गंगापूर रोड (प्रारंभ) - के.टी.एच.एम. महाविद्यालय - अशोकस्तंभ - मेहेर सिग्नल - हुतात्मा स्मारक (सीबीएस) येथे रॅलीचा समारोप होणार आहे.सदर युवा स्वतंत्रता ज्योत रॅली ज्या सामाजिक, संघटना, संस्थांना स्वत:चे बॅनरसह सहभागी व्हायचे असल्यास त्यांनी विवेकराज ठाकूर ९०२८०८९०००, मंदार ठाकूर ९१५८६३५९५१, भूषण काळे ९६५७४३९८३३, कैलास सुर्यवंशी ७७२००५२५९२, अभिजीत साबळे ९५०३३६२६७६  यांचेशी संपर्क साधावा.
तरी या रॅलीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य सौ. कविता कर्डक, रऊफ पटेल, अ‍ॅड. नितीन ठाकरे, राजवर्धन कदमबांडे, विक्रम मोरे यांनी केले आहे.

पुरग्रस्त मदत संकलन केंद्राचे उद्घाटन...



परभणी येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र परभणी, चतुरंग प्रतिष्ठान परभणी व मॉडेल इंग्लिश एज्युकेशन सोसायटी शारदा महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने पुरग्रस्तांसाठी मदत संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या मदत संकलन केंद्राचे उद्घाटन कृषिभूषण व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माननीय कांतराव काका झरीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई चे समन्वयक  विजय काणेकर, अनिल जैन अध्यक्ष मॉडेल इंग्लिश एज्युकेशन सोसायटी व चतुरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास पानखेडे उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना मा. कांतराव काका देशमुख यांनी पुरस्थितीमुळे झालेली भीषण अवस्था व या परिस्थितीतून सावरण्यासाठी आम्ही परभणीकरम्हणून मुक्तहस्ताने मदत करावी असे आवाहन केले. त्यानंतर अनिल जैन, विलास पानखेडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली .
या संकलन केंद्रात दिनांक १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत ही मदत संकलित करण्यात येणार असून १६ ऑगस्ट रोजी ती पुरग्रस्तांसाठी पाठविण्यात येणार आहे या याची सर्व परभणीकरांनी नोंद घ्यावी .
यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन खडके यांनी तर प्रास्ताविक मा. विजय काणेकर यांनी केले. या कार्यक्रमाला चतुरंग प्रतिष्ठानचे बालासाहेब फुलारी, रुस्तुमराव कदम, निखील जैन, श्रीराम गरजे, गंगाधर गायकवाड, धर्मराज शेजुळ, डॉ. प्रशांत मेने, प्रा. भ. पु. कालवे, एकनाथराव मस्के, टी. डी. जाधव, प्रा.डॉ. भगवान पाटील, डॉ. नितीन बावळे, डॉ रमेश भालेराव, विष्णू वैरागड, प्रा. डॉ. हनुमंत शेवाळे, प्रा. डॉ. दत्ता चामले, प्रा. डॉ. अविनाश पंचाळ, फुलसावंत सर, प्रा. शाम पाठक, सुरेश जयपूरकर, राजाराम मूत्रटकर व तुकाराम पवार यांची उपस्थिती होती .
या संदर्भात आपल्याला काही माहिती हवी असल्यास प्रा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण - ८६६९०९६२८१ व प्रा. सचिन खडके ९४२१३५५०९६ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहेत.



Monday, 12 August 2019

युवा स्वतंत्रता ज्योत रॅली २०१९...


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, नवमहाराष्ट्र युवा अभियान आणि मैत्री संस्था, ग्रांटरोड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपुरुषांना अभिवादन करण्यासाठी व तरुणांमध्ये स्वातंत्र्यदिनाविषयी आदराची जाणीव व जागृती निर्माण व्हावी यासाठी 'युवा स्वतंत्रता ज्योत रॅली २०१९चे आयोजन... राष्ट्रभक्तीच्या जाणिवांचा जागर... वर्ष बारावे.
बुधवार १४ ऑगस्ट २०१९सायंकाळी ७.३० वाजता
सर्वोदय मंडळ ग्रांटरोड ते मणिभवन, गांवदेवी मार्गे ऑगस्ट क्रांती मैदान, नाना चौक.