Wednesday, 23 October 2019

‘चार्ली चॅप्लिन एक महान कलावंत’




चार्ली चॅप्लिन एक महान कलावंत
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर आयोजित चार्ली चॅप्लिन एक महान कलावंत, चार्ली चॅप्लिन यांच्या विनोदाचं तत्व शनिवार २६ ऑक्टोबर २०१९, सायंकाळी ६ वाजता, अॅम्पी थिएटर, हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर येथे दाखवलं जाणार आहे. त्यातुन त्यांच्या विविध छटांवर भाष्य केले जाणार आहे. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे.

‘दिवाळी पहाट’



मराठी चित्रपट संगीताच्या वाटेने, मराठी इतिहास, मराठी संस्कृती, मराठी परंपरा यांचा शोध घेत आपण कुठून वाट चुकतो आहोत याचं भान मिळवून देणारा कार्यक्रम म्हणजे दिवाळी पहाट.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर व द हेरिटेज, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार २५ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजता प्रा. विलास पाटील यांच्या सोबतीने मराठी पाऊल पडते पुढे... कार्यक्रमाचे आयोजन द हेरिटेज लॉन ए, गांधी नगर, होटगी रोड, सोलापूर येथे करण्यात आले आहे.   

कायद्याचे अनेक विषय कौशाल्याने हाताळणे गरजेचे – अॅड. डॉ. सुधाकर आव्हाड


सोलापूर दि. १२ ऑक्टोबर : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र सोलापूर व सोलापूर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कायदेविषयक व्याख्यानमाला संपन्न झाली.
अटक, कोठडी व जामीन या विषयावर अॅड. डॉ. राजेंद्र अनभुले यांनी मार्गदर्शन केले. नाहक एखाद्यावर हा प्रसंग आला तर कायद्याच्या कोणत्या कोणत्या कलमाचा कसा उपयोग करावा याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. तर अॅड. योगेश दंडे यांनी उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे श्रेष्ठत्व या विषयावर बोलताना वेगवेगळ्या न्यायाधीशांनी वेगवेगळ्या खटल्यात कसे निकाल दिले आणि त्याचा आधार नंतर अनेक प्रकरणात तसा प्रभावी ठरला हे विस्तृतपणे सांगितले आणि नेमका त्याचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. अॅड. डॉ. सुधाकर आव्हाड यांनी हिंदू वारसा कलम ६ या विषयावर बोलताना महिलेला माहेरून अनेक हक्क या कायद्यात दिले आहेत. त्यामुळे भावा बहिणीच्या नात्यात अंतर कसे निर्माण होते आणि त्यामुळे सामाजिक परिस्थिती कशी बिघडते आणि सासरकडून या कायद्यात महिलांना कोणतेच संरक्षण नाही आणि सासरचे लोक माहेरच्या लोकांना या कायद्याचा आधार घेऊन कसा त्रास देतात, यामुळे एखाद्या महिलेचे आयुष्य कसे उध्वस्त होते याबाबत वकिलांनी घ्यावयाची काळजी याबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
या व्याख्यानमालेत ३५० वकिलांनी सहभाग घेतला.  




Monday, 21 October 2019

मंजिरीच्या झटपट रांगोळ्या...

click here, to watch full video
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ यांच्यातर्फे प्रसिद्ध रांगोळी कलाकार मंजिरी प्रभुलकर यांच्या रांगोळी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी कोणत्याही कागदाचा वापर न करता फक्त हाताचा वापर करून अत्यंत सोप्या आणि सुंदर रांगोळींचे प्रात्यक्षिक दिले.
प्रत्येकाकडे कला असते फक्त तिचा उपयोग करता आला पाहिजे, असंही यावेळी त्या म्हणाल्या.





Sunday, 20 October 2019

विज्ञानगंगाचे त्रेचाळीसावे पुष्प 'पेट्रोरसायने'...

विज्ञानगंगाचे त्रेचाळीसावे पुष्प 'पेट्रोरसायने'...

click here, to watch full video
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगाकार्यक्रमांतर्गत 'पेट्रोरसायने' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह डॉ. अनंत पांडुरंग देशपांडे यांनी पेट्रोरसायन म्हणजे नेमकं काय? कच्च्या तेलाचा शोध कसा लागला? भारतातील पेट्रोरसायन कारखाने तसेच पेट्रोरसायनांचा उपयोग आणि अपाय काय याबद्दल त्यांनी माहिती दिली. शेवटी प्रश्नोत्तर क्षेत्रात त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.











Thursday, 17 October 2019

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्रातर्फे ‘यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार’



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्रा तर्फे यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कारदेण्यात येणार असून मानपत्र व रोख रू २०,००० असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड यांनी दिली आहे. मराठी साहित्य, संस्कृती तसेच कला-क्रिडा या शिवाय सामाजिक एकात्मता, विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामिण विकास, आर्थिक सामाजिक विकास, कृषी औद्योगीक समाज रचना, व्यवस्थापन प्रशासन यांपैकी कोणत्याही एका क्षेत्रामध्ये भरीव कार्य अथवा योगदान करणा-या व्यक्ति किंवा संस्थेस यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार सभारंभपुर्वक दि. २५ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रदान केला जाणार आहे. इच्छुक व्यक्ती अथवा संस्थेने प्रमोद कर्नाड संपर्क ९८६७६७३३१९/ ९०८२६९८९०४ किंवा ९८१९३३९९४४ या भ्रमण ध्वनीवर संपर्क साधून दि. २५ ऑक्टोबर पूर्वी आपली प्रवेशीका प्रतिष्ठानकडे सादर करावी, असे अध्यक्ष प्रमोद कर्नाड व सचिव डॉ. अशोक पाटील यांनी कळविले आहे.