यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नवी मुंबई तर्फे ‘दहावी व बारावी नंतरचं नवं क्षितीज’ या विषयावर प्रा. संदीप नेमळेकर यांचे स्टर्लिन कॉलेज नेरूळ येथे करिअर मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड यांनी २०० हून अधिक उपस्थित विद्यार्थी व पालकांचे स्वागत केले. प्राध्यापक संदीप नेमळेकर व मिलिंद आचार्य यांनी ३ तास सविस्तर मार्गदर्शन केल्यावर विद्यार्थ्यांच्या अनेक करिअरविषयक प्रश्न विचारले असता त्यांनी मार्गदर्शन केले. पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन द्वारे मुलांचा कल पाहून त्यांना उचित मार्गदर्शन झाल्याने पालकवर्ग समाधानी होता.
No comments:
Post a Comment