प्रतिभावंत लेखक जीवनाकडे तटस्थपणे आणि
नव्या दृष्टीने बघत असतो त्यामुळे त्याच्या येणारे वास्तव वाचकाला आपलेसे वाटते.
लेखक समाजाच्या मनोव्यापाराचा अभ्यास करत असतो व शोध घेत असतो. जीवनाच्या
प्रवाहाच्या बदलत्या रंगाकडे खऱ्या लेखकाचे लक्ष असते म्हणून त्याची निर्मिती
अभिजात व काळाला पुरून उरते, असे प्रतिपादन लेखक व कॉर्पोरेट
व्यवस्थापन तज्ञ डॉ.गिरीश वालावलकर यांनी केले.
गिरीश वालावलकर यांच्या लेखनाच्या
निर्मिती क्षमतेचे व्यवस्थापन या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
ते पुढे म्हणाले की, प्रत्येकाचं जगणं हे वेगवेगळ्या जाणिवांच असते व प्रत्येकाकडे जीवनाची संहिता असते त्यात सर्जनशीलता, भावना, विचार, अनुभव विश्व असते त्याचा योग्य संगम म्हणजे प्रतिभेचे लेखनाचे व्यवस्थापन असते. ऑस्कर वाईल्ड, विजय तेंडुलकर, श्री ना.पेंडसे, सिग्मन फ्राईड,डोटोव्हसकी, टॉमस हार्डी अशा अनेक लेखकांनी जीवनाचं सत्य मांडले, त्यामुळे त्यांचे लेखन वाचतांना नवं-नवे अर्थ लागत जातात असेही डॉ.वालावलकर म्हणाले.

कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक, आभार
विनायक रानडे यांनी मांडले. सूत्रसंचालन स्वाती पाचपांडे यांनी केले. कार्यक्रमास
वैशाली प्रकाशनाचे विलास पोतदार, अश्विनी कुलकर्णी, चित्रकार, मिलिंद जोशी, दिलीप पाटील, शरद पटवा, किरण सोनार, उद्योजक सतीश
पाटील आशिष चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment