कृषी दिनानिमित्त शेतकरी मेळावा व चर्चासत्राचे आयोजन
अहमदनगर : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र अहमदनगर, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोनई, मुळा एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय सोनई, यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. यशवंतराव गडाख पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. प्रशांतभाऊ गडाख पाटील यांच्या कल्पक नियोजनाखाली शनिवार दि. १ जुलै २०१७ रोजी सकाळी ९ वाजता कृषी दिनानिमित्त शेतकरी मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मुकूंदराव गायकवाड कुलपती, अरविंद कृषी विद्यापीठ, नागपूर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. ज्ञानेश्वर पवार कृषीभूषण, पुनतगाव. ता. नेवासा हे असतील. डॉ. विनायक देशमुख सहसचिव, मुळा एज्युकेशन सोसायटी, उत्तमराव लोंढे सचिव, मुळा एज्युकेशन सोसायटी श्री. शंकरराव पटारे जनरल मॅनेजर, मुं. स.सा. कारखाना सोनई यांची प्रमुख उपस्थिती असेल. हा कार्यक्रम कृषी महाविद्यालय सोनई येथे होईल.
No comments:
Post a Comment