Thursday, 15 June 2017

‘चित्रपट चावडी’ तर्फे 'टू डेज वन नाईट'

‘चित्रपट चावडी’ तर्फे 'टू डेज वन नाईट'

नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवार १६ जून २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध बेल्जियम दिग्दर्शक जॉ पिएरे आणि ल्युक दार्दान यांचा ‘टू डेज वन नाईट'हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
‘टू डेज वन नाईट' मध्ये बेल्जीयम मधील एका शहरात सँन्ड्रा एका कारखान्यात व्यवस्थापनाने विभागातील एका कर्मचा-याला कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला. त्या बदल्यात इतरांना काही बोनस देण्याचेही ठरविले. योगायोगाने सँड्रावर त्या निर्णयात नोकरी जाण्याची वेळ येते. तिच्याकडे आता फक्त दोन दिवस एक रात्र आहे. सँन्ड्रा त्या काळात आपली नोकरी टिकवण्यासाठी काय करते ते पाहण्यासाठी अवश्य या. दार्दान बंधु जनसामान्यांच्या अपरीहार्य घटनांवर आधारीत चित्रपट बनवितात व त्यातील पेच प्रसंग ते मार्मिकपणे खुलवितात. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी ९५ मिनिटांचा आहेच. 
‘टू डेज वन नाईट' हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य सौ. कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे

No comments:

Post a Comment