Thursday 29 June 2017

विज्ञानगंगाचे सतरावे पुष्प...

विज्ञानगंगाचे सतरावे पुष्प...
चिरतारुण्याची किल्ली सापडली!

माणसाच्या चिरतारुण्याचे रहस्य काय? आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत या विषयावर सल्ले देणारे अनेक गुरू भेटतील. परंतु केवळ माणसाच्याच नव्हे, तर समस्त प्राणीसृष्टीच्या शरीरातील चिरतारुण्याला चैतन्य देण्याची क्षमता नेमकी कुठे दडली आहे, त्याचे रहस्य भेदण्याचे काम टाटा मूलभूत संशोधन केंद्रातील संशोधकांनी केले आहे. सर्व सजीवांमध्ये आढळणाऱ्या चिरतारुण्याच्या जनुकास सक्रिय करण्याची क्षमता निश्चितपणे कोणत्या क्षेत्रात आहे, त्याचे केंद्र शोधून काढण्याचे काम टीआयएफआरमधील शास्त्रज्ञ डॉ. उल्लास कोलथुर यांनी केले आहे. याविषयी अधिक माहिती व आपल्याशी संवाद साधण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत सतरावे पुष्प 'चिरतारुण्य' या विषयावरील व्याख्यान २१ जुलै २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता  चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल भोसले मार्ग, मुंबई येथे गुंफणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती. 

No comments:

Post a Comment