'आत्ममग्नता'जाणीव जागृती कार्यशाळा संपन्न...
दिव्यांग मुलांचा अतुलनीय कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह देऊन सत्कार..
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, महाराष्ट्र शासन मुंबई, यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा) पुणे, अपंग वित्त विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई, फोरम फॉर ऑटिझम मुंबई पालक संस्थांचा राष्ट्रिय महासंघ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि अपंग विकास हक्क विकास यांच्या संयुक्त विद्यमाने 'आत्ममग्नता' जाणीव जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात दिव्यांग मुलांनी अतुलनीय कामगिरी केली आहे, अशा विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
आजच्या कार्यक्रमाला मा. मंत्री राजकुमारजी बडोले (मंत्री सामाजीक न्याय व विशेष सहाय्य) करणार असून मा.ना. दिलीप कांबळे (राज्यमंत्री सामाजिक न्याय), मा. खा. सुप्रिया सुळे, मा. नंदकुमार (शिक्षण सचिव) मा. दिनेश वाघमारे (सचिव सामाजिक न्याय), मा. नितीन पाटील (आयुक्त, अपंग कल्याण) आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सुरुवातीला डॉ. समीर दलवाई यांनी आत्ममग्नता या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये मुलांच्या वर्तणुकीतील झालेल्या बदलांना कसे ओळखावे याबद्दल महत्त्वाची माहिती सांगितली. त्यानंतर प्रतिष्ठानच्या कार्यध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी सुध्दा सर्वाना 'आत्ममग्नता' याबद्दल माहिती दिली. तसेच विविध सामाजिक संस्थामध्ये काम करत असताना आलेले अनुभव सांगितले.
कार्यक्रमामध्ये पुरस्कार देण्यात आलेल्या खेळाडूंचे स्वागत करुन त्यांच्या पालकांचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी अभिनंदन केले. या मुलांसाठी धोरणात्मक जे काही असेल ते शासनाच्या वतीने चालू करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. आम्ही सर्व अधिकारी पदाधिकारी आपल्या सोबत आहे, आतपर्यंत आम्ही अनेक काम केली आहेत. दिव्यांग बांधवांना सामाजिक न्याय विभागातर्फे १२३ शाळांना मदत केली आहे. आम्ही विविध घटकावर सध्या काम करत आहोत त्याचा फायदा भविष्यात होईल असे मा. मंत्री राजकुमार बडोले यांनी कार्यक्रमात सांगितले.

No comments:
Post a Comment