Wednesday, 21 June 2017

बारावीनंतर अॅनिमेशनमध्ये करिअर करण्याची संधी

बारावीनंतर अॅनिमेशनमध्ये करिअर करण्याची संधी

जंगलबुक, बाहुबली, सिंड्रेला, डोरेमॉन, मोटू-पतलू असे अनेक अॅनिमेटेड चित्रपट आणि प्रोग्राम आपण सगळेच पाहत असतो. त्यामध्ये लहानगेच नाही तर थोरामोठ्यांना पण पाहण्यामध्ये उत्सुकता असते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, माहिती प्रबोधिनी मध्ये यांचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. सी-डॅक तर्फे चालविण्यात येणारा डिप्लोमा इन अॅडव्हान्स कम्प्युटर आर्टस् (DACA) या कोर्सचा कालावधी सहा महिने पूर्ण वेळ आहे. या कोर्सची पात्रता कोणताही शाखेतून बारावी असणे तसेच टिचर कोर्स, आर्ट टिचर कोर्स, M.F.A, B.F.A, B.Arch., G.D. Arts, त्याचबरोबर कोणत्याही डिग्री किंवा Diploma in Advertisement, Commercial Arts etc. अशी आहे.

या कोर्स मध्ये Image Editing & effects, Print Media, Animation 2D & 3D, 3D Architecture, Cartoon Animation, Digital Audio & Video, 3D Modeling, Web Designing & Web Development  या विषयांचा अभ्यासक्रमात सहभाग आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट संभाषण कलेसाठी Business Communication चे वर्ग घेतले जातात.

कंपन्यांनमध्ये विद्यार्थ्यांनी केलेले काम पाठवून व त्यांच्या मुलाखती करवून विद्यार्थ्यांना नोकरी संपादन करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान माहिती आणि तंत्रज्ञान प्रबोधिनी कडून मदत केली जाते. या कोर्ससाठी पूर्व परीक्षा पास होणे आवश्यक आहे.


डिप्लोमा इन अॅडव्हान्स कम्पप्युटर आर्ट् (DACA) या कोर्सच्या प्लेसमेंटसाठी Bombay Studio, Intel Gain Technologies Pvt. Ltd., Praxis interactive Services, Western Outdoor Interactive, Neosoft Technologies, Hindustan Pencils, Wisdmlabs, Multiversity etc. या कंपन्यांनी स्वारस्य दर्शवले.

No comments:

Post a Comment