चित्रपट चावडीतर्फे 'लेथ जोशी' मराठी चित्रपट
औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद, एमजीएम पत्रकारिता महाविद्यालय व आयटक कामगार युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडीतर्फे 'लेथ जोशी' मराठी चित्रपट शनिवार दि. ८ जुलै २०१७ रोजी सायंकाळी ५:३० वा रुक्मिणी सभागृह,एमजीएम परिसर,औरंगाबाद येथे दाखवण्यात येणार आहे. याप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश जोशी उपस्थित राहून रसिकांसोबत संवाद साधणार आहेत.
चित्रपटाबाबत अधिक माहिती...
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट. बंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पेशल ज्युरी अॅवॉर्डचा मानकरी. जागतिक पातळीवरील दहा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झालेला - *‘लेथ जोशी’*
ही यांत्रिकीकरणामध्ये अस्ताला जाणाऱ्या तंत्राची, हरणाऱ्या श्रमिकाची आणि त्याच्या कौशल्याची गोष्ट आहे. पूर्वी कारखान्यामध्ये काम करताना कामगाराच्या कौशल्याची जागा आधुनिक लेथ यंत्राने घेतली. या आधुनिकीकरणामुळे त्या कामगाराची कौशल्य साधने आणि त्यापाशी जपलेल्या भावनाच काळाच्या पडद्याआड जातात हा विषय मंगेश जोशी या युवा लेखक-दिग्दर्शकाने ‘लेथ जोशी’मधून मांडला आहे. चित्तरंजन गिरी, अश्विनी गिरी, सेवा चौहान आणि ओम भूतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मंगेश जोशी यांच्या पत्नी सोनाली जोशी निर्मात्या असून, संगीतकार नरेंद्र भिडे आणि नितीन वैद्य हे सहायक निर्माते आहेत. सारंग कुलकर्णी यांनी संगीत दिले आहे.
आपला समाज कशा पद्धतीने बदलत गेला त्यावर हा चित्रपट भाष्य करतो.जागतिक,आर्थिक, कौटुंबिक मूल्य आणि मानवी संबंध यांच्यातील संघर्षांबरोबरच मानसिक स्थिती याविषयीचे चित्रण असलेला हा चित्रपट म्हणजे साध्या पद्धतीने सांगितलेली गुंतागुंतीची गोष्ट आहे.
आपणा सर्वांना सादर निमंत्रण...
No comments:
Post a Comment