Monday, 17 June 2019

जीवनातील अनुभवांच्या संहितेचे नेटके व्यवस्थापन म्हणजे उत्तम लेखक...! -डॉ गिरीश वालावलकर



प्रतिभावंत लेखक जीवनाकडे तटस्थपणे आणि नव्या दृष्टीने बघत असतो त्यामुळे त्याच्या येणारे वास्तव वाचकाला आपलेसे वाटते. लेखक समाजाच्या मनोव्यापाराचा अभ्यास करत असतो व शोध घेत असतो. जीवनाच्या प्रवाहाच्या बदलत्या रंगाकडे खऱ्या लेखकाचे लक्ष असते म्हणून त्याची निर्मिती अभिजात व काळाला पुरून उरते, असे प्रतिपादन लेखक व कॉर्पोरेट व्यवस्थापन तज्ञ डॉ.गिरीश वालावलकर यांनी केले.
गिरीश वालावलकर यांच्या लेखनाच्या निर्मिती क्षमतेचे व्यवस्थापन या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
ते पुढे म्हणाले की, प्रत्येकाचं जगणं हे वेगवेगळ्या जाणिवांच असते व प्रत्येकाकडे जीवनाची संहिता असते त्यात सर्जनशीलता,
भावना, विचार, अनुभव विश्व असते त्याचा योग्य संगम म्हणजे प्रतिभेचे लेखनाचे व्यवस्थापन असते. ऑस्कर वाईल्ड, विजय तेंडुलकर, श्री ना.पेंडसे, सिग्मन फ्राईड,डोटोव्हसकी, टॉमस हार्डी अशा अनेक लेखकांनी जीवनाचं सत्य मांडले, त्यामुळे त्यांचे लेखन वाचतांना नवं-नवे अर्थ लागत जातात असेही डॉ.वालावलकर म्हणाले.
कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक, आभार विनायक रानडे यांनी मांडले. सूत्रसंचालन स्वाती पाचपांडे यांनी केले. कार्यक्रमास वैशाली प्रकाशनाचे विलास पोतदार, अश्विनी कुलकर्णी, चित्रकार, मिलिंद जोशी, दिलीप पाटील, शरद पटवा, किरण सोनार, उद्योजक सतीश पाटील आशिष चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.




Thursday, 13 June 2019

विज्ञानगंगाचे एकोणचाळीसावे पुष्प ‘बहुपयोगी गणित’...



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत बहुपयोगी गणितया विषयावर विनामूल्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. विवेक पाटकर शुक्रवार दि. २१ जून रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला,  जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट मुंबई येथे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.



Monday, 10 June 2019

दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज - विश्वास ठाकूर



दिव्यांग बांधवांचे पुर्नवसन हा समाजासाठी मुलभूत जाणिवेचा भाग असून यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घेणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकत्त्वाचा दृष्टीकोन जोपासण्याचीही गरज आहे. त्यांच्यात आत्मविश्वास व बळ निर्माण करण्याबरोबरच त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिकचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले.
सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अपंग हक्क विकास मंच, मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, नाशिक आणि विश्वास ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील गरजू दिव्यांग बंधु-भगिनींना आवश्यकतेनुसार लागणार्‍या कृत्रिम अवयव व साधने वाटप करण्यासाठी मोफत नाव नोंदणी व मोजमाप/तपासणी शिबीराचे आयोजन कुमुसाग्रज स्मारक येथे करण्यात आले होते. या तपासणी शिबीरामध्ये व्हिल चेअर, श्रवणयंत्र, कुबडी, एम.आर.किट, कॅलिपर, स्प्लिंट, जयपुर फुट, कमोड चेअर, वॉकर, चष्मा, एल्बो क्रचेस, वॉकिंग स्टिक, अंधचष्मा, अंधकाठी, ब्रेलकिट इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. सदर शिबिराच्या शुभारंभा प्रसंगी विश्वास ठाकूर बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, आज सर्व क्षेत्रात दिव्यांग बांधवांनी आपल्या कतृत्वाने नावलौकिक संपादन केला आहे व आपले वेगळेपण सिध्द केले आहे. समाजाचा आपण काही देणे लागतो. या भावनेने त्यांच्याशी आपण नाते जोडावे. शिबिरात 300 हून अधिक दिव्यांग बंधु भगिनींनी सहभाग नोंदवला.
या प्रसंगी मार्गदर्शन करतांना जिल्हा परिषद नाशिक समाज कल्याण विभागाचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील म्हणाले की
, दिव्यांगांसाठी शासनाच्या अनेक योजना कार्यरत असून त्यांना अशा शिबिराच्या माध्यमातून लाभ मिळत आहेत व त्यांचे जीवन सुखकर होत आहे.
शिबिरात तपासणी प्रकल्प समन्वयक-जितेंद्र दाभाडे , तंत्रज्ञ-वसीम खान व असिस्टंट तंत्रज्ञ कलीम शेख यांनी काम पाहिले.




Thursday, 6 June 2019

शिक्षण विकास मंच आयोजित शिक्षण कट्टा


शिक्षणप्रेंमींनी शिक्षणाविषयी काही औपचारिक आणि काही अनौपचारिक पध्दतीने चर्चा करण्याचे ठिकाण म्हणजेच शिक्षण विकास मंच चा 'शिक्षण कट्टा'.
|यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, शिक्षण विकास मंचच्या वतीने चर्चासत्र नवीन शैक्षणिक धोरण मसुदा २०१९  चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १५ जून २०१९ रोजी दुपारी २ वाजता सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे शिक्षण कट्टयाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी माधव सूर्यवंशी (समन्वयक) भ्रमणध्वनी क्रमांक ९९६७५४६४९८ वर संपर्क करा.



Tuesday, 4 June 2019

‘हिंदू विवाह कायदा.. एक आढावा’ व्याख्यानाचे आयोजन...



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, कायदे विषयक सहाय्य व सल्ला फोरम आणि नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या वतीने आपला कायदा जाणून घ्या व्याख्यानमाले अंतर्गत हिंदू विवाह कायदा.. एक आढावा या विषयावर डॉ. जे. बी. पाटील यांचे व्याख्यान शुक्रवार दिनांक १४ जून २०१९ रोजी सायं ५.३० वाजता सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई -२१ येथे होणार असून या व्याख्यानास आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती.



Sunday, 2 June 2019

'सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन सर्टिफिकेट कोर्स' ला सुरूवात...



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे 'सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन सर्टिफिकेट कोर्स' दिनांक १ जूनपासून सुरू झाला. १ जून ते २८ जुलै २०१९ या कालावधी मध्ये (शनिवार-रविवार) दुपारी ११ ते ५ या वेळेमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधील बेसमेंट हॉल मध्ये हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोर्स पूर्ण झाल्यानंतर परिक्षा घेण्यात येणार आहे तसेच प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणा-यास प्रमाणपत्र दिले जाणार आहे. कोर्सचा होणारा उपयोग, फायदे, कोर्सबद्दल संपूर्ण माहिती कार्यकारी संयोजिका ममता कानडे यांनी दिली. यावेळी अॅड. प्रमोद कुमार, प्रभाकर चुरी उपस्थित होते.









अमेझिंग औरंगाबाद या प्रदर्शनाच्या शेवटच्या टप्प्याला सुरुवात




यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद, इंस्टाग्राम वरील ग्रुप कलर्स ऑफ औरंगाबाद व महात्मा गांधी मिशन यांच्या संयुक्त उपक्रमाअंतर्गत अमेझिंग औरंगाबाद : द फोटोथॉनया छायाचित्र प्रदर्शनाचा चौथा टप्पा रविवार २ जून पासून चार दिवस एमजीएमच्या कला दीर्घा आर्ट गॅलरीत सुरू झाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन शहराचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद चे अध्यक्ष अंकुशराव कदम, ज्येष्ठ कृषीतज्ञ विजय अण्णा बोराडे, डॉ.आर.आर.देशपांडे, प्राचार्या डॉ. रेखा शेळके, शिव कदम, विभागीय केंद्राचे सचिव नीलेश राऊत यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले.यावेळी सहभागी छायाचित्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
'अमेझिंग औरंगाबाद : द फोटोथॉन' ज्यामध्ये औरंगाबाद शहराचा ऐतिहासिक वारसा, स्थापत्य, रस्ते, खाद्यसंस्कृती आणि जीवसृष्टी यांचा त्यांच्या दृष्टीकोणातून दर्शन होते.
५५० हौशी छायाचित्रकारांनी या प्रदर्शनाकरिता आपले छायाचित्र पाठविले होते. त्यातील निवडक शंभरहून अधिक छायाचित्र प्रदर्शनाकरिता निवडण्यात आले आहे. यामध्ये स्ट्रीट, लॅण्डस्केप, वाईल्डलाईफ, पीपल अ‍ॅण्ड पोट्रेट यासारख्या विविध छायाचित्रांचा समावेश आहे. संपूर्ण कलाकृतींचा आस्वाद घायचा असल्यास पाच जून पर्यंत एमजीएम कला दीर्घा आर्ट गॅलरीला नक्की भेट द्या. प्रदर्शन सर्वांकरिता खुले आहे.
प्रदर्शनाचा यंदाच्या वर्षाचा आता समारोप आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर पाटील, सुबोध जाधव, आदित्य दिवाण, ऍड.स्वप्नील जोशी, निखिल भालेराव, आदित्य वाघमारे, संकेत कुलकर्णी, प्रवीण देशमुख, मंगेश निरंतर, दीपक जाधव आदींनी परिश्रम घेतले.