नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवार १८ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध इटालीयन दिग्दर्शक नानी मोरेट्टी यांचा ‘डियर डायरी’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
सुप्रसिद्ध इटालीयन दिग्दर्शक नानी मोरेट्टी यांच्या तीन चित्रपटांच्या मालिकेतला हा पहिला चित्रपट आहे. साधारण ४० वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक वैविध्यपूर्ण चित्रपट केले आहेत आणि भूमिकाही केल्या आहेत. मानवी नात्यामधील गुंतागुंत व आत्मशोधाच्या वाटेवर येणार्या अनेक अनुभवांचा वेध मोरेट्टी यांनी आपल्या चित्रपटातून मांडला आहे. चित्रपटांच्या विषयांच्या शोधात असलेला एक दिग्दर्शक म्हणजेच त्यांचा स्वत:चा प्रवास यातून मांडला आहे.
१९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी १०० मिनीटांचा आहे. ‘डियर डायरी’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment