यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि महाराष्ट्र महिला व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारी गृहनिर्माण सोसायटी व्यवस्थापण, पदाधिकारी, सल्लागार, सदस्य आणि व्यवस्थापक याबाबत मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा ११ सप्टेंबर ते १३ आक्टोबर दरम्यान होणार असून विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सहभागी होणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांला ५ हजार रूपये शुक्ल आकारण्यात येईल. तसेच प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांला प्रमाणपत्र देण्यात येईल. कार्यशाळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई महाराष्ट्र महिला व्यासपीठ, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग येथे होईल. संपर्क संजना पवार-८२९१४१६२१६, २२०२८५९८.
No comments:
Post a Comment