यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम व मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय विधी साक्षरता कार्यशाळेचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूल, वसई सहकारी बँकेसमोर व चिमाजी अप्पा मैदानाजवळ, वसई येथे केले आहे. ही कार्यशाळा सामाजिक कार्यकर्ते महिला व पुरुष यांच्या करिता आहे.
पहिल्या सत्रामध्ये - स्वागत, परिचय, पुष्पगुच्छ, प्रदान, प्रास्ताविक, संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन, हुंडाबंदी शपथा नंतर विषयानुसार १)भारतीय संविधान - अॅड. प्रमोद ढोकळे, २)कौटूंबिक अत्याचारापासून महिलांचे संरक्षण कायदा २००५ - अॅड. हेमंत केंजाळकर, ३)कामाच्या ठिकाणी महिलांचे लैगिक छळापासून संरक्षण कायदा २०१३- अॅड अजय केतकर यांची व्याख्याने होतील. लगेच प्रश्नोत्तरे आणि भोजन.
दुस-या सत्रामध्ये १) पोलिस स्टेशनचे कामकाज व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ - अॅड. प्रमोद ढोकळे, २) माहितीचा अधिकार कायदा २००५ व आई-वडील, नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणकारी अधिनियम २००७ - अॅड भूपेश सामंत, ३) हिंदू विवाह कायदा - १९५५- अॅड जे.बी. पाटील यांची व्याख्याने होतील.
No comments:
Post a Comment