यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या विभागीय परभणी केंद्रातर्फे "जागर माय-लेकीचा"या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानोपासक महाविद्यालयात १४ जानेवारी २०१८ रोजी ११ वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा. संध्याताई दूधगावकर (अध्यक्ष,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणी) असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. विलासजी पानखेडे (कोषाध्यक्ष,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणी) हे असतील. मा.बाळासाहेब फुलारी, मा.किरण सोनट्टके, मा.सुमंत वाघ इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये समाजातील प्रतिष्ठीत माय-लेकींचा विभागीय केंद्र परभणी तर्फे शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला अधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. विष्णू व श्री. प्रमोद दलाल यांनी केले आहे.
Wednesday, 9 January 2019
Monday, 7 January 2019
औरंगाबाद आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने विशेष पोस्टर प्रदर्शनाचे उदघाटन संपन्न
नाथ ग्रुप व महात्मा गांधी मिशन प्रस्तुत व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद आयोजित सहाव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन सोमवार, दि. ७ जानेवारी रोजी सायं. ६ वा. प्रोझोन मॉल,औरंगाबाद येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. राष्ट्रीय फिल्म संग्रहालय, भारत सरकार, पुणे यांच्या सहकार्याने महात्मा गांधी यांची १५० वी जयंती,जागतिक ख्यातीचे स्वीडिश दिग्दर्शक इगमान बर्गमन,मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज पु.ल.देशपांडे, ग दि माडगुळकर,सुधीर फडके तसेच हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रातील महान कलावंत संगीतकार नौशाद,संगीतकार स्नेहल भाटकर, गीतकार कैफि आझमी आणि मझरूह सुल्तानपुरी, पार्श्वगायिका शमशाद बेगम यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या मोजक्या चित्रपटांची पोस्टर्स या प्रदर्शनात त्यांच्या विषयी आदरांजली म्हणून मांडली जाणार आहे.या शिवाय नुकतेच ज्यांचे निधन झाले ते जागतिक कीर्तीचे भारतीय दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या चित्रपटांची पोस्टर्स प्रदर्शनात असणार आहेत. सदरील प्रदर्शन दि १३ जानेवारी पर्यंत प्रोझोन मॉल येथे सुरू राहील.
या प्रदर्शनाचे उद्घाटन औरंगाबाद आंतरऱाष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या संयोजन समितीचे अध्यक्ष मा. नंदकिशोर कागलीवाल, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष मा. अंकुशराव कदम व फेस्टिव्हलचे संचालक मा. अशोक राणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रोझोनचे सेंंटर हेड मा. मोहम्मद अर्शद,मा. भालचंद्र कांगो, सुजाता कांगो,एमजीएम फिल्म आर्टस् चे प्रमुख शिव कदम,डॉ.आनंद निकाळजे,डॉ.मुस्तजीब खान,महेश देशमुख,मनोज तुळपुळे,किशोर निकम, जाई देशमुख, नीता पानसरे, योगिता महाजन,नीना निकाळजे,प्रा.अनिलकुमार साळवे, पवन गंगावणे, आयनॉक्सचे दशरथ खजिनदार,अविनाश रावते, ऍड.स्वप्नील जोशी, योगेश इरतकर यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होते. औरंगाबादच्या रसिकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध याविषयावरती मार्गदर्शन
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे आपले आरोग्य आपल्या हाती असावे याच हेतूने विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध या विषयावरती संशोधक व सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षीत यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम विनामुल्य असून नागरिकांनी सहकुटूंब उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष मा. सुप्रिया सुळे यांनी केले आहे. हा कार्यक्रम गुरूवारी १० जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता आर. एम. डी. कॉलेज, वारजे पुणे येथे सुरू होईल.
Sunday, 6 January 2019
महिला गौरव पुरस्कार - २०१९ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन...
महिला गौरव पुरस्कार - २०१९ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन...
मा. यशवंतरावजी चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून मानले जातात. राजकीय, सामाजिक, अर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या लक्षणीय कामगिरीमुळे राष्ट्रीय जीवनात महाराष्ट्राला गौरवास्पद स्थान प्राप्त झाले आहे. प्रखर स्वातंत्र्यसेनानी, कुशल मुत्सद्दी, संस्कृत सत्ताधीश, लोकाग्रणी म्हणून त्यांचे स्थान लोकमानसात चिरंतन राहणार आहे. त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा जतन करून सार्वजनिक हिताचे विविध उपक्रम हाती घेण्याच्या उद्देशाने १९८५ साली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईची स्थापना करण्यात झाली.
प्रतिष्ठानतर्फे यावर्षी पासून 'महिला गौरव पुरस्कार' देण्यात येणार आहे. हा पुरस्कार महाराष्ट्रातील महिलेस देण्यात येणार आहे. सन २०१९ या वर्षासाठी समाजसेवा क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये भरीव कामगिरी करणा-या महिलेस महिला गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. रोख रक्कम १०,००० शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सदर पुरस्कारासाठी महिलांची नावे विहित पध्दतीनूसार सुचविण्यासाठी पुरस्कार नियमावली कृपया यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट मुंबई ४०० १२१ या पत्तावर संपर्क साधावा. पुरस्कारासाठी नावे पाठविण्याची अखेरची तारिख २६ जानेवारी २०१९ आहे.

Thursday, 3 January 2019
४ फेब्रुवारी पासून सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापक प्रशिक्षण
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे 'सहकारी गृहनिर्माण संस्थांची कामे व्यवस्थित व्हावी, तसेच शासनाच्या कायद्याचा ज्ञान असावं या हेतूने सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापक प्रशिक्षण या विषयावर कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे. दिनांक ४ फेब्रुवारी ते १५ मार्च २०१९ या कालावधी मध्ये (सोमवार ते शुक्रवार) दुपारी २ ते ५ या वेळेमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधील बेसमेंट हॉल मध्ये प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये असणार असून प्रशिक्षण शुल्क ६४९०/- भरून सहभागी होता येईल. तसेच प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणा-यास प्रमाणपत्र दिले जाणार आहे. पूर्णवेळ व अर्धवेळ नोकरी मिळविण्यासाठी सहकार्य केले जाईल असे महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे सांगण्यात आले आहे. या संदर्भात अधिक माहिती व नावनोंदणीसाठी कृपया संजना पवार यांच्याशी ( दूरध्वनी - २२०४५४६० विस्तारित क्र. २४४ अथवा भ्रमणध्वनी ८२९१४१६२१६) वर संपर्क साधावा.
Monday, 24 December 2018
२९ डिसेंबरला "दिव्यांग कट्टा "
अपंग हक्क विकास मंच आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'दिव्यांग कट्टा' अंतर्गत 'दिव्यांग व्यक्ती आणि सरकारी विविध अर्थिक योजना' या विषयावरती मा. नंदकुमार फुले यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी २९ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी २ वाजता बेसमेंट हॉल मध्ये दिव्यांग कट्ट्याला सुरूवात होईल. अपंग विकास मंचतर्फे दिव्यांग मित्र मंडळीसह बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. अधिक संपर्क - सुकेशनी शेवडे ८६५२११८९४९
Subscribe to:
Posts (Atom)