यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या विभागीय परभणी केंद्रातर्फे "जागर माय-लेकीचा"या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानोपासक महाविद्यालयात १४ जानेवारी २०१८ रोजी ११ वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा. संध्याताई दूधगावकर (अध्यक्ष,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणी) असतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. विलासजी पानखेडे (कोषाध्यक्ष,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणी) हे असतील. मा.बाळासाहेब फुलारी, मा.किरण सोनट्टके, मा.सुमंत वाघ इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये समाजातील प्रतिष्ठीत माय-लेकींचा विभागीय केंद्र परभणी तर्फे शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला अधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. विष्णू व श्री. प्रमोद दलाल यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment