Monday, 7 January 2019

विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध याविषयावरती मार्गदर्शन

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे आपले आरोग्य आपल्या हाती असावे याच हेतूने विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध या विषयावरती संशोधक व सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षीत यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम विनामुल्य असून नागरिकांनी सहकुटूंब उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष मा. सुप्रिया सुळे यांनी केले आहे. हा कार्यक्रम गुरूवारी १० जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता आर. एम. डी. कॉलेज, वारजे पुणे येथे सुरू होईल. 

No comments:

Post a Comment