Sunday, 6 October 2019

‘डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ’ पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन...


 मुंबई : दि. ७ :  सर्व विद्यार्थांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचा विभाग शिक्षण विकास मंच मागील काही वर्षांपासून कार्यरत आहे. प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचाने आतापर्यंत अनेक परिषदा, कार्यशाळा आणि चर्चासत्रे चव्हाण सेंटर मध्ये आयोजित केली आहेत. तसेच शासनाला धोरणात्मक बदल करण्याच्या दृष्टीने शिफारशीही केल्या आहेत.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचतर्फे प्रतिवर्षी शैक्षणिक विषयक लिखाण केलेल्या उत्कृष्ट पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक यांना डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्काराने सन्मानित केले जाते. यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचाकडून उत्कृष्ट शिक्षणविषयक पुस्तकं मागविण्यात आली आहेत. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शिक्षणाची गुणवत्ता, मूल्यमापन पध्दती, शालेय उपक्रम, समाजाचा सहभाग, शैक्षणिक प्रशासन अशा विषयांना स्पर्श करणारे हे पुस्तक असावे.
तसेच शैक्षणिक प्रश्नांवर उपाययोजना त्यात मांडलेल्या असाव्यात. हे पुस्तक दि. १ ऑक्टोबर २०१८ ते दि. ३० सप्टेंबर २०१९ या कालावधीत प्रकाशित झालेले असावे. तरी संबंधित प्रकाशकांनी/लेखकांनी सदर ग्रंथाच्या दोन प्रती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य कार्यालयात शनिवार दि. ३१ ऑक्टोबर २०१९ पर्यंत शिक्षण विकास मंच,
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई २१ येथे पाठवाव्यात अशी विनंती डॉ. वसंत काळपांडे मुख्य संयोजक शिक्षण विकास मंच यांनी केली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : समन्वयक श्री. माधव सूर्यवंशी ९९६७५४६४९८.

सृजन कार्यशाळा ओरिगामी / पेपर क्राफ्ट


सृजन कार्यशाळा ओरिगामी / पेपर क्राफ्ट या विषयावर दिनांक ६ ऑक्टोबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आली होती. 
ही कार्यशाळा प्रिती सुद्रिक आणि अभिषेक सुद्रिक या कलाकार दांपत्याने घेतली.
सदर कार्यशाळेत पारंपारिक पद्धतीने कागदापासून कंदिल कसे बनवायचे, ओरिगामी पद्धतीने कंदिलाचे तोरण व त्याचबरोबर पेपर पासून वॉल हँगिंग या गोष्टीचे प्रात्यक्षिक देऊन ते मुलांकडून करुन घेतले.






Friday, 4 October 2019

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी ‘पर्सेपोलीस’


  ‘चित्रपट चावडी
नाशिक दि. ४ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडीउपक्रमांतर्गत शनिवार ५ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध इराणी अ‍ॅनिमेशन दिग्दर्शक मार्जेन सत्रापी हीचा पर्सेपोलीसहा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
चार अ‍ॅनिमेशन पटांच्या मालिकेतील हा दुसरा चित्रपट हाही वॉल्टझ् विथ बशीरप्रमाणे आत्मचरित्रात्मक आहे. १९७९ च्या इराणमधील इस्लामिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवर एका छोट्या संवेदनशील, खेळकर मुलीची धीट आणि ध्येयवेडी कहाणी आहे. ही मुलगी अर्थातच मार्जेन सत्रापी स्वत:च आहे. क्रांतीपर्व इराण हा प्रागतिक होता व एका उचभ्रू घरात रहाणारी मार्जेन अचानकपणे आलेल्या इस्लामिक क्रांतीच्या झंझावाताने हादरून गेली. त्यानंतर ती शिक्षणासाठी फ्रान्समध्ये आली. युरोपमधील मुक्त वातावरण तिला फारसे रूचले नाही. तिला मातृभूमीकडे परतण्याचे वेध लागले. हा तिचा प्रवास वैचारीक आंदोलनाने व भुराजकीय बदलांनी अत्यंत संस्मरणीय होतो. २००८ साली प्रदर्शित झालेल्या या इराणी चित्रपटाचा कालावधी ९६ मिनिटांचा आहे.
हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य सौ. कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड. नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

Thursday, 3 October 2019

‘भयंकर सुंदर मराठी भाषा’

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नवी मुंबई आणि कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था, सीवुड- नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पोर्णिमेनिमित्त भयंकर सुंदर मराठी भाषा’ याविषयावर नामवंत कवी आणि वक्ते अशोक बागवे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक १२ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ७.०० वाजता कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणामध्ये हे व्याख्यान पार पडेल.

'पृथ्वीचे वाढते तापमान आणि आपण'

'पृथ्वीचे वाढते तापमान आणि आपण' व्याख्यान संपन्न…

click here, to watch full video


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे 'पृथ्वीचे वाढते तापमान आणि आपण' या विषयावर विनामूल्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हवामानात होत चाललेला बदल, झाडांची होणारी कत्तल, बांधकामे, एकूणच या सर्व हासाला कारणीभूत ठरणा-या मानवी कृती आटोक्यात आणता याव्यात याविषयी व्याख्याते अतुल देऊळगावकर यांनी भावी पिढीला हवामान बदलाविषयी जागृकता निर्माण व्हावी यासाठी मार्गदर्शन केले. या गोष्टीचा गंभीर विचार करायचा असेल तर याविषयीच गांभीर्य येणा-या पिढीला कळायला पाहिजे अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.









ज्येष्ठांनी आपल्या अनुभवांचा, ज्ञानाचा उपयोग समाजाच्या नव्या जडणघडीसाठी करावा - अ‍ॅड. जयंत जायभावे


ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा



नाशिक दि. १ : ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या कर्तुत्वाने इतिहास घडवला असून त्या इतिहासाचे आजच्या पिढीस वर्तमानात उपयोग करून भविष्यकाळ उज्वल करावा. आज समाजातील अनेक व्यक्ती सुसंवादापेक्षा अनावश्यक चर्चा करण्यात आनंद मानतात. त्यांतून संस्कारांचा व नैतिकमूल्यांचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. सत्याने बाजूने बोलण्याचे धाडसही समाज हरवत चालला आहे. त्यासाठी ज्येष्ठांनी आपल्या ज्येष्ठत्वाचा अधिकार गाजवण्याची गरज आहे. व आपल्या अनुभवांचा, ज्ञानाचा उपयोग समाजाच्या नव्या जडणघडीसाठी करावा असे प्रतिपादन ख्यातनाम विधिज्ञ अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी केले.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व लोकज्योती ज्येष्ठ नागरिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने प.सा. नाट्यमंदिर शालिमार येथे आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अ‍ॅड. जायभावे बोलत होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना जायभावे यांनी कायद्या विषयी समाजात असलेले अज्ञान व त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन याविषयी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा म्हणाले की, आज देशात तरूणांची संख्या जास्त असली तरी ज्येष्ठ नागरिकांनी जीवनाच्या झळा सोसून, लोकजीवनात तळागाळात जाऊन आपल्या आयुष्याला आकार दिला. म्हणूनच त्यांच्या विचारांची देशाला खरी गरज आहे. त्यासाठी ज्येष्ठांनी आपल्या अनुभवांचे योगदान द्यावे. समाजाचा ढासळलेला जीवनस्तर ही समस्या निर्माण झाली आहे.