Thursday, 19 September 2019

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी ‘वॉल्टज् विथ बशीर’



‘चित्रपट चावडी’ 
नाशिक (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार २१ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध इस्राईल दिग्दर्शक अरी फोलमन यांचा ‘वॉल्टज् विथ बशीर’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
चित्रपट चावडीमध्ये चार अ‍ॅनिमेशन व पूर्ण लांबीच्या चित्रपटांचे आयोजन करण्याचे योजले आहे. हा एक स्वतंत्र चित्रपट प्रकार जगभर हाताळला जातो. त्यामानाने भारतात तो तितकासा प्रचलीत नाही.
वॉल्ट्स विथ बशीर हा चित्रपट पहिल्या इस्राईल व लेबॅनॉन युद्धावर जे १९८० च्या दशकात घडले व त्यावर आधारीत आहे. ही दिग्दर्शक अरी फोलमनचीच गोष्ट आहे. अरीने ह्या युद्धात भाग घेतला होता. पण त्याला त्याचे विस्मरण झाले आहे. ह्या विस्मरणातून तो अनेक गोष्टी ज्या भूतकाळात घडल्या त्याचा शोध घेतो आहे. स्वप्न व सत्य यांच्या सीमारेषेवरील त्याचा प्रवास तसेच युद्ध व त्याचे संहारक परीणाम असा हा विस्मयकारक प्रवास अद्भुत असाच आहे. २००८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा कालावधी ९० मिनिटांचा आहे.
हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य सौ. कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.


यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेची अंतिम फेरी मुंबईत रंगली...

click here, to watch full video


अभिजीत अनिल खोडके प्रथम, तर ऐश्वर्या एस.भद्रे द्वितीय...

मुंबई १८ : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, नवमहाराष्ट्र युवा अभियान तर्फे आयोजित 'यशवंत शब्दगौरव' राज्यस्तरीय अंतिम फेरी बुधवार दिनांक १८ सप्टेंबर २०१९ रोजी  यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा व खासदार सुप्रियाताई सुळे तसेच सरचिटणीस श्री. शरद काळे यावेळी उपस्थित होते.
यशवंत शब्दगौरव राज्यस्तरीय स्पर्धा ९ विभागामध्ये घेण्यात आली, त्यामध्ये ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक अभिजीत अनिल खोडके (सीपी अॅन्ड बेरार कॉलेज नागपूर ) यांना १५,००० रुपये रोख रक्कम व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तर दुसरा क्रमांक ऐश्वर्या एस. भद्रे (मुंबई विद्यापीठ ) १०,००० रुपये रोख रक्कम व मानचिन्ह व तिसरा क्रमांक शुभम सतीश शेंडे (एस.एम. जोशी कॉलेज, हडपसर)  ह्यास ७,००० रुपये रोख व मानचिन्हे तसेच उत्तेजनार्थ म्हणून जीवन प्रकाश गावंडे (श्री शिवाजी आर्ट व कॉमर्स, अमरावती), गणेश ज्ञानदेव लोळगे (एएमजीओआय, कोल्हापूर ), श्रुती अशोक बोरस्ते ( एचपीटी कॉलेज, नाशिक), अभिजीत अंबारास जाधव ( एसएमटी, सीएचएम कॉलेज, मुंबई) व तेजस दिनकर पाटील (मॉर्डन कॉलेज, पुणे ) ३००० रोख रुपये व मानचिन्ह देण्यात आले.

Monday, 9 September 2019

यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नांदेड यांचा उपक्रम
नांदेड, दि. ९ : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त सामाजिक, ग्रामीण विकास यासह अन्य क्षेत्रात भरीव कार्य करणा-या व्यक्ती व संस्था यांना यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सदरील पुरस्कारासाठी व्यक्ती व संस्थांनी नामनिर्देशन दि. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत पाठवण्याचे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नादेडच्या वतीने करण्यात आले आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण यांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रातील महाराष्ट्राचा थोर वैचारिक वारसा पुढे नेला आहे. राष्ट्रीय जीवनात महाराष्ट्राला उच्चस्थान मिळवून दिले. प्रखर स्वातंत्र्य सेनानी दूरदृष्टीचे राजकारणी, मुत्सद्दी सुसंस्कृत लोकाग्रणी म्हणून त्यांचे स्थान लोकमाणसात चिरंतन आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे निरंतर सुरु राहावा यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली व विभागनिहाय संपूर्ण महाराष्ट्रभर विभागीय केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. समाजहित डोळ्यासमोर ठेवून राज्यात अनेक संस्था, व्यक्ती सामाजिक कार्य करत असतात. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नादेडच्या वतीने कृषी, औद्योगिक, समाजरचना, व्यवस्थापन, प्रशासन, सामाजित एकात्मता, विज्ञानतंत्रज्ञान, ग्रामीणविकास, मराठी साहित्य संस्कृती, कला क्रिडा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्ती व संस्था यांचा यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात योणार आहे. १५ हजार रु. रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनी म्हणजेच २५ नोव्हेंबर २०१९ रोजी नांदेड येथे एका समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येईल.
पुरस्कारासाठी पुढील निकष पूर्ण करणा-या व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. कोणत्याही व्यक्ती व संस्थेचे वैयक्तीक अर्ज विचारात घेतले जाणार नसून त्यासाठी संबंधित जिल्हा किंवा विभागातील विभागातील लोकप्रतिनिधी, नामांकित संस्था, कुलगुरू, साहित्यिक, संमेलन अध्यक्ष यांची शिफारस असणे आवश्यक आहे. व्यक्ती व संस्थेची संपूर्ण माहिती मराठी मध्ये असावी. सोबत दोन फोटो, कार्याची माहिती, संस्थेचा परिचय, कार्याची ठळक वैशिष्ट्ये, संपर्क आदी तपशील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, नांदेड येथे दि. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत पाठवावेत अये आवाहन विभागीय केंद्राचे सचिव शिवाजी गावंडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.  

Sunday, 8 September 2019

झुंडशाहीच्या विचारांचे दडपण आपल्या भाषणात येऊ देऊ नका, मोकळेपणे व्यक्त व्हा : श्रीपाद भालचंद्र जोशी


यशवंत शब्दगौरव नागपूर विभागीय फेरीचा अभिजीत खोडके मानकरी !

नागपूर (दि.८) : सध्या देशात झुंडशाहीच्या विचारांचे प्राबल्य आहे. तुम्ही कसे वागायचे, काय बोलायचे, काय वाचायचे हे ठरवणारे लोक निर्माण झाले आहेत. तुम्ही त्याच्या विरोधात गेलात की तुम्ही देशद्रोही होता. पण तो विचार माणुसकीला धरून नसेल तर त्याचे समर्थन करू नका. आपला विवेकी विचार जिवंत ठेवा आणि तोच तुमच्या शब्दांमधून व्यक्त करा, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियान व युगांतर शिक्षण संस्थेचे तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या नागपूर विभागीय फेरीचे आयोजन करण्यात आलेले होते. त्याच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी जोशी बोलत होते. या स्पर्धेच्या आयोजनासाठी विभागीय केंद्राचे अध्यक्ष गिरीश गांधी, संस्थेचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे, सचिव विवेक कोबाडे यांचे मार्गदर्शन लाभले, याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रमोद काळपांडे, सरचिटणीस गणेश गौरखेड़े, प्राचार्य डॉ. दीपक मसराम, डॉ.स्वाती धर्माधिकारी, कार्यक्रम समन्वयक डॉ. अर्शिया सैय्यद, प्रा. दिगंबर टूले, प्रा. सचिन हुँगे, बाबा कोम्बाडे, अभिजित राऊत, निशिकांत काशीकर, जगदीश पंचबुद्धे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत परीक्षक म्हणून डॉ. कल्पना उपाध्याय, डॉ. मंजुषा सावरकर, प्रा. महेश अचिंतलवार यांनी काम पाहिले. या स्पर्धेत नागपूर, वर्धा, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील ६० स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक - अभिजित खोडके, सी. पी. अँड बेरार महाविद्यालय, नागपूर, द्वितीय क्रमांक : विनय भीमराव पाटील, सी. पी. अँड बेरार महाविद्यालय, नागपूर, तृतीय क्रमांक : श्रावणी प्रकाश चव्हाण, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, नागपूर, उत्तेजनार्थ क्रमांक : पूनम जगदीश रामटेके, नरेंद्र तिडके महाविद्यालय, रामटेक व विशाखा गणोरकर, एल. ई. डी. महाविद्यालय, नागपूर
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे राज्य संघटक नीलेश राऊत, विभागीय संघटक अभिजीत राऊत, दिनेश मासोदकर, संजय पुसाम, प्रविण राठोड, नीलिमा, निलेश झालटे, राहुल कामळे आदींनी परिश्रम घेतले.






Friday, 6 September 2019

नव्या तरुणाईने गाजविली ‘यशवंत शब्दगौरव वकृत्त्व स्पर्धा’


अमरावती विभागीय फेरीत जीवन गावंडे, आकांक्षा असनारे, साक्षी इंगोले,ऋतुजा हरणे आणि अक्षय सुरोसे ठरले पारितोषिकांचे मानकरी
दि. ६ (अमरावती) : आजच्या काळात विचारमंथन घडणे आवश्यक आहे, असे पाच जीवंत विषय आणि या पाच विषयांची ८३ स्पर्धकांनी आपापल्या शैलीत केलेली अभ्यासपूर्ण मांडणी व या मांडणीतून आजच्या ज्वलंत विषयांच्या बाबत समोर आलेली तरुणाईचा मनातील गंभीरता याने आज येथील श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात दिवसभर चाललेली ‘यशवंत शब्दगौरव’ महाविद्यालयीन वकृत्त्व स्पर्धेची अमरावती विभागीय फेरी प्रचंड गाजली. जीवन प्रकाश गावंडे या विद्यार्थ्याने या स्पर्धेचा प्रथम पुरस्कार पटकावला तर कु.आकांक्षा अविनाश असनारे व कु. साक्षी राजकुमार इंगोले यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक पटकावले. कु. ऋतुजा सुभाष हरणे आणि अक्षय अजय सुरोसे यांनी उत्तेजनार्थ पुरस्कार पटकावून मुंबई येथे होणाऱ्या अंतिम स्पर्धेसाठी आपली निवड पक्की केली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई नवमहाराष्ट्र युवा अभियान व श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘यशवंत शब्दागौरव’ महाविद्यालयीन वकृत्त्व स्पर्धेच्या अमरावती विभागीय फेरीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय लोकशाही व निवडणूक व्यवस्था, यशवंतराव चव्हाण यांची कारकीर्द : शोध आणि बोध, महाराष्ट्राच्या महिला धोरणाची २५ वर्षे, जातीचं काय करायचं? व्यवस्थापन की निर्मुलन आणि सोशल मिडिया : मी आहे नेहमी ऑनलाईन या पाच विषयावर अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम व यवतमाळ या पाच जिल्ह्याच्या विविध महाविद्यालयातील एकूण ८३ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता देशमुख यांच्या हस्ते झाले तर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले यांच्या अध्यक्षतेत आणि सुप्रसिद्ध कवी बबन सराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण समारोह झाला.

First Aid and CPR Training program


First Aid and CPR Training program
Yashwantrao chavan pratishthan, Mumbai, Maharashtra Mahila Vyaspeeth And AAA Healthcare has organized certified First Aid and CPR Training program on Sunday 15th September 2019, 11.30 am to 5.30 pm at Basement Hall, YB Centre, Gen. Jagannath Bhosale Marg, Mumbai.
Fees for this certified training is Rs. 2,000 (inclusive GST).
For Registration kindly contact on 8291416216 or 22045460 Ext 244.

Thursday, 5 September 2019

विज्ञानगंगाचे बेचाळीसावे पुष्प ‘आय.ओ.टी. चे तंत्रज्ञान'...



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा’ कार्यक्रमांतर्गत ‘आय.ओ.टी. चे तंत्रज्ञान' (IOT Technology) या विषयावर विनामूल्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्याते डॉ. रामचंद्र सत्यदेव तिवारी. गुरुवार दि. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालया समोर, नरिमन पॉईंट मुंबई येथे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.