आवाहन...
दिनांक २४ नोव्हेंबर २०१९ रोजी यशवंतराव
चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचामार्फत 'शालेय शिक्षण आणि वाचनसंस्कृती या
विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. नोव्हेंबर २०२० मध्ये याच विषयावर एक
पुस्तक प्रकाशित करण्याचा आमचा विचार आहे. तरी इच्छुकांनी या पुस्तकासाठी आपले लेख पाठवावेत, असे
आवाहन करण्यात येत आहे.
१. लेख मुलांचे वाचन या क्षेत्रात
झालेले अभ्यास/संशोधन,
स्वतःचे अनुभव, या क्षेत्रात स्वतः केलेले किंवा
निरीक्षण केलेले प्रयोग यांवर आधारित असावेत.
२. शब्दमर्यादा :- कमाल १२००
३. लेख मराठीत, देवनागरी
लिपीत (युनिकोड आणि/किंवा पीडीएफ फॉरमॅटमध्ये) असावेत. आवश्यक तेथे लेखासोबत फोटो
जोडण्यात यावेत.
४. लेख दिनांक ३१ जानेवारी २०२० पर्यंत sanskrutivachan@gmail.com
या ई-मेल आयडीवर पाठवावे.
५. लेखाखाली लेखकाचे नाव, पत्ता आणि तीन ते चार वाक्यांत संक्षिप्त परिचय द्यावा.
६. लेख स्वीकारण्याचे, नाकारण्याचे, स्वीकारलेल्या लेखांत योग्य ते संपादकीय
संस्कार करून बदल करण्याचे अधिकार संपादक मंडळाकडे असतील.
डॉ. वसंत काळपांडे
मुख्य संयोजक,
शिक्षण विकास मंच,
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
No comments:
Post a Comment