Monday 30 December 2019

३१ डिसेंबर रोजी नववर्षाच्या पूर्वसंध्येला फ्यूजन – २०१९ संगम सप्तकलांचा...


रसिकांसाठी अविस्मरणीय संगीतानुभव मैफलीसाठी प्रवेश विनामूल्य
नाशिक (दि. ३१) : नववर्षाच्या पूर्वसंध्येला नव्या संकल्पांची नवी मैत्री, नवी ओळख आनंदाची जाणीव असलेल्या नवीन वर्षाची सुरुवात ही थोड्याशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्हावी, याकरीताच नववर्षाच्या पूर्वसंध्येला काही चांगले संकल्प घेऊन नवीन वर्ष आपण सर्वच एका वेगळ्या प्रकारे साजरा करावा या संकल्पनेतून विश्वास ग्रृप, विश्वास संकल्प आनंदाचा उपक्रमातंर्गत फ्यूजन२०१९ संगम सप्तकलांचा...या अनोख्या मैफिलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मैफिल सर्वांसाठी विनामुल्य आहे.
मंगळवार, ३१ डिसेंबर २०१९ रोजी सायं. ६ ते ९ या वेळात विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकरनगर, गंगापूर रोड,  नाशिक ४२२०१३ येथे सदर मैफल संपन्न होणार असून कार्यक्रमाची संकल्पना विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास जयदेव ठाकूर यांची असून संयोजक मिलिंद धटिंगण हे आहेत. सदर उपक्रमाचे ५ वे वर्ष असून नववर्षाच्या पूर्वसंध्येला वेगळे आणि अभिरूची संपन्न कार्यक्रमाची परंपरा विश्वास गृपने राखली आहे.
शब्द-सूर-ताल-रंगरेषा या समन्वयातून वैशिष्ठपूर्ण अविष्कार रसिकांना अनुभवास मिळणार आहे. चित्र, शिल्प, गायन, नृत्य अशी ही विविधरंगी मैफल आनंदानुभवच देणार आहे.
विश्वास को-ऑप बँक लि. नाशिक, सारस्वत बँक, फॅरवशी इंटरनॅशनल अ‍ॅकेडमी, जुम्मा मस्जिद चॅरिटेबल ट्रस्ट, स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था, पिंपळगाव (ब.), नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम संपन्न होत आहे.
संयोजक मिलिंद धटिंगण असून गायन, मकरंद हिंगणे, मिलिंद धटिंगण, विवेक केळकर, मीना परूळकर-निकम, शुभंकर हिंगणे करणार आहेत. सहगायिका तन्मयी घाडगे, दिशा दाते,
जुई आंबेकर आहेत.

नृत्यविष्कार डॉ. सुमुखी अथणी व सहकारी सादर करणार असून नाट्यविष्कार दत्ता पाटील, सचिन शिंदे, लक्ष्मण कोकणे व सहकारी सादर करणार आहेत. चित्र भारती हिंगणे, शिल्पकला यतीन पंडीत, तर तबला नितीन वारे, वाद्यवृंद कलाकार अमोल पाळेकर, रागेश्री धुमाळ, शुभम जाधव, जयंत पाटेकर, दिनेश पडाया हे आहेत. संहिता व निवेदन किशोर पाठक यांची असून ध्वनी व्यवस्था व प्रकाश व्यवस्था सचिन तिडके यांची आहे.
तरी या मैफिलीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास ग्रृपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर व  समन्वयक विनायक रानडे, डॉ. मनोज शिंपी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment