Wednesday, 17 May 2017

ज्येष्ठ क्रीडा मानसतज्ज्ञ भीष्मराज पुरुषोत्तम स्मृतीसभा

ज्येष्ठ क्रीडा मानसतज्ज्ञ भीष्मराज पुरुषोत्तम स्मृतीसभा

ज्येष्ठ क्रीडा मानसतज्ज्ञ आणि निवृत्त विशेष पोलिस महानिरिक्षक भीष्मराज पुरुषोत्तम बाम यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी शुक्रवारी १२ मे रोजी २०१७ नाशिक येथे हदय विकाराने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी २३ मे रोजी सायंकाळी ५ वाजता प्रतिष्ठानच्या जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग येथील रंगस्वर सभागृहात प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. शरदरावजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्मृतिसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
मा. बाम पोलिस महासंचालक पदावरुन निवत्त झाल्यानंतर त्यांना एका दुखापतीला सामोरे जावे लागले. त्या दुखापती दरम्यान आराम करीत असताना त्यांच्या वाचनात रशियन पुस्तके आली. त्यात एका पुस्तकात, 'आपले मन हाच शत्रू' हे वाक्य त्यांना अधिक भावले. या वाक्यामुळेच ते क्रीडा मानसोपचाराकडे वळले. मा. बाम स्वत: एक उत्कृष्ट नेमबाज असून, ते योग आणि मन यांचा क्रीडाक्षेत्राच्या दृष्टीकोनातून अभ्यास करीत असत. त्यांनी क्रीडा मानसोपचाराचा रीतसर अभ्यासक्रमही पूर्ण केला. काही खेळाडूंच्या कामगिरीत त्यांनी दिलेल्या सल्ल्यानूसार फरक पडत गेल्याने दिग्गज खेळाडू त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ लागले.
मा. बाम यांनी १९८९ मध्ये नाशिक येथे नेमबाजीची क्रीडा प्रबोधिनी स्थापन करुन त्याद्वारे अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय नेमबाज घ़डविले. नेमबाजीला प्रोत्साहन देण्यासाठी मा. बाम यांनी एक्स. एल. टारगेट शूटर्स असोसिएशनची स्थापना केली. ते पुरुषोत्तम अकॅडमीचे संस्थापक, पुण्याच्या चाणक्य मंडळाचे विश्वस्त व मार्गदर्शक, योगी विद्या धामच्या योगकुलगूरु विभागात अध्यापक म्हणून त्यांनी काम केले. मा. भीष्मराज पुरूषोत्तम बाम आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तसेच प्रतिष्ठानचे मा. अध्यक्ष श्री. शरदरावजी पवार यांचा घनिष्ठ संबंध होता. कार्यक्रमाला अधिक संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment