Saturday, 7 July 2018

‘चित्रपट चावडी’तर्फे चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी ‘सी यु इन माँटेव्हीडीओ’

नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार ०७ जुलै २०१८ रोजी सायंकाळी ६.३०वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक ड्रॅगन जेलो ग्रिलीच यांचा ‘सी यु इन माँटेव्हीडीओ’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
सध्या २०१८ जागतिक फुटबॉल वल्डकपची जोरदार हवा आहे. त्यानिमित्ताने युरोपियन चित्रपट असला तरी कथानक माँटेव्हीडीओ, उरूग्वे, दक्षिण अमेरीका येथे घडते. युगोस्लाव्हीयाची फुटबॉल टीम १९३० साली पहिली जागतिक फुटबॉल स्पर्धा खेळण्यासाठी पात्र होते व माँटेव्हीडीओत दाखल होते. पण मॅचेसआधी व नंतर बर्‍याच गमतीदार नाट्यमय घडामोडी होतात व त्यातून खेळ व मनोरंजन असा एक आनंद रसिकांना मिळतो. सन २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी १४१ मिनिटांचा आहे.
‘सी यु इन माँटेव्हीडीओ’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

Friday, 6 July 2018

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर, ग्रंथाली प्रकाशन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'वाचकजागर 'या कार्यक्रमांतर्गत अभिवाचन चळवळीतलं पुढचं पाऊल 'पुस्तकांच्या भेटी' या अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अभिराम पांडे (प्रसिध्द लेखक - दिग्दर्शक), चंद्रकांत मेहेंदळे (ज्येष्ठ अभिनेते), अस्मिता पांडे (प्रसिध्द निवेदिका) आणि श्रीनिवास नार्वेकर (लेखक - दिग्दर्शक) इत्यादी मान्यवरांनी पुस्तक, कथा आणि कवितांच अभिवाचन केले. हा कार्यक्रम नूकताच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, तिसरा मजला, शारदा सिनेमाजवळ, नायगाव, दादर (पुर्व) मुंबई येथे प्रेक्षकांच्या उपस्थित पार पडला.

*शेतकरी कंपन्यांच्या सक्षमीकरणाकरीता दि. 17 जुलै रोजी सीटा संवाद कार्यक्रमाचे आयोजन *




औरंगाबाद :  सीटा (सेंटर फॉर इंटरनॅशनल ट्रेड इन अ‍ॅग्रीकल्चर अ‍ॅण्ड अग्रोबेस्ड इंडस्ट्रिज), यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद व कृषी विज्ञान केंद्र, एमजीएम, औरंगाबाद व कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी कंपन्या वा फार्मर प्रोड्युसर कंपन्या आणि शेतमालाचे ठोक खरेदीदार यांच्यासाठी इ-कॉमर्स प्लॅटफार्मची निर्मिती, शेतकरी कंपन्यांचा सक्षमीकरण या विषयावर सीटा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मंगळवार दि. 17 जुलै 2018 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत सदरील कार्यक्रम आर्यभट्ट सभागृह, जेएनईसी महाविद्यालय, एमजीएम परिसर, औरंगाबाद येथे संपन्न होईल.

या कार्यक्रमात सीटाचे संचालक ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ फिरोज मसानी, ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ विजयअण्णा बोराडे, सीटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील तांबे, दत्ता बाळसराफ आदी मान्यवर आपले विचार व्यक्त करणार आहेत.

शेतकरी कंपन्यांच्या मार्गदर्शनासाठी-प्रकल्प अहवाल तयार करणे, केंद्र व राज्य सरकार तसेच नाबार्डच्या विविध योजना व कार्यक्रमांचा लाभ मिळवणे, सल्लागार सेवा इत्यादी सेवा सिटाच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहेत.  शेतकरी कंपन्या आणि कॉर्पोरेट वा मोठे खरेदीदार यांनी शेतकरी कंपन्यांकडून थेट खरेदी करावी यासाठी इ-कॉमर्सचा प्लॅटफॉर्म उभारण्यासंबंधात सिटा पुढाकार घेणार आहे. ज्या शेतकरी कंपन्या वायदे बाजारात उतरतात त्यांच्यासाठी माहिती सेवा-कमोडिटी इंटेलिजन्स, पुरवण्यासंबंधात सिटा उत्प्रेरकाची भूमिका पार पाडेल. या सर्व अनुषंगाने शेतकरी कंपन्यांना उपरोक्त विषयांची माहिती व्हावी याकरीता या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

शेतकरी, शेतकरी कंपन्या वा शेतकरी गट, शेतमालाचे व्यापारी, शेतमाल प्रक्रिया उद्योग, कृषिउत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व अधिकारी, कमिशन एजंट, नाबार्ड तसेच शेतीकर्ज पुरवठा करणार्‍या बँका, कृषि विद्यापीठातील विस्तार विभागाचे अधिकारी वा प्राध्यापक, कृषी विभागाचे अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

सदरील कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, पूर्व नोंदणी आवश्यक आहे. दि. 15 जुलैपुर्वी इच्छुकांनी वैशाली देशमुख (मो.क्र. 9404738920, 7028167090) या क्रमांकावर अथवा mgmkvk@gmail.com या इमेल आयडीवर संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत, काकासाहेब सुकासे, जी. आर. रेड्डी, डॉ. ए. के. पांडे,  श्रीकृष्ण सोनवणे, विजय कान्हेकर, सुहास तेंडुलकर, डॉ. रेखा शेळके, सुबोध जाधव आदींनी केले आहे.

Thursday, 5 July 2018

विनामूल्य आर्थिक गुंतवणूक मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ आणि संवेदन प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य आर्थिक गुंतवणूक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा नुकतीच यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये संपन्न झाली.

समीर दिघे यांनी वाढती महागाई आणि घटते व्याजदर , वाढत चाललेळे दाम दुप्पट फसव्या योजनांचे प्रमाण, इन्शुरन्स का घ्यावा? का घेऊ नये?, उत्पन्न प्रमाणे आर्थिक शिस्त कशी असावी, नियोजन करताना कसा विचार करावा याविषयांवरती लोकांना उदाहरणासाहित मार्गदर्शन केले.

त्यानंतर दिघे यांनी शेअर बाजार , म्यूचुअल फंड ह्या बाबत सखोल चर्चा केली. तसेच सिप म्हणजे नक्की काय?जेष्ठ नागरिकांच्या दर महिना खरचायला हवे असलेले पैसे आणि त्या पैस्याचा वाढीचा दर ह्याचा समतोल कसा साधावा,जागतिक गुंतवणूक गुरू वॉरेन बफेट ह्यांचे विचार आणि नियम, समृद्ध आर्थिक विकासाच्या दृष्टीने पाउल कसे टाकावे! याबाबतही मार्गदर्शन केले.

Wednesday, 4 July 2018

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात पुस्तकांच्या भेटी कार्यक्रम

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर, ग्रंथाली प्रकाशन आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवाचन चळवळीतलं पुढचं पाऊल 'पुस्तकांच्या भेटी' या अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अभिराम पांडे (प्रसिध्द लेखक - दिग्दर्शक), चंद्रकांत मेहेंदळे (ज्येष्ठ अभिनेते), अस्मिता पांडे (प्रसिध्द निवेदिका) आणि श्रीनिवास नार्वेकर (लेखक - दिग्दर्शक) इत्यादी मान्यवर अभिवाचन करणार आहेत. हा कार्यक्रम शुक्रवारी ६ जुलै २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, तिसरा मजला, शारदा सिनेमाजवळ, नायगाव, दादर (पुर्व) मुंबई येथे होईल. विश्वास मोकाशी, दत्ता बाळसराफ आणि धनश्री धारप यांनी कार्यक्रमाला अधिक संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन केले आहे. (ग्रंथालीची पुस्तके ४० टक्के सवलतीत उपलब्ध असतील.

Tuesday, 3 July 2018

चित्रपट चावडीतर्फे थ्री कलर्स व्हाईट

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र औरंगाबाद आणि एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट चावडी उपक्रमांतर्गत थ्री कलर्स व्हाईट हा चित्रपट शनिवारी १४ जुलै २०१८ सायंकाळी ६ वाजता आईनस्टाईन सभागृह, एमजीएम परिसर, औरंगाबाद येथे दाखवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिक संख्येने लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन विभागीय केंद्र औरंगाबाद आणि एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या तर्फे करण्यात आले आहे. 

Sunday, 1 July 2018

विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत श्रवणयंत्र वाटप...

स्टार्की फाऊंडेशन, अमेरिका, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, आरव्हीएम एज्युकेशनल अॅन्ड चॅरिटेबल फाऊंडेशन, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई, सक्सेरिया फाऊंडेशन मुंबई आणि ठाकरसी ग्रुप मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत श्रवणयंत्र वाटपासाठी कानांची पूर्ण तपासणी शिबीरे विविध ठिकाणी आयोजीत करण्यात आली आहेत.

शिबीर खालील तारिख - ठिकाण प्रमाणे पार पडेल
२ जुलै – संभाजीराजे सभागृह, पंचायत समिती, पुरंदर
३ जुलै – समाधान मंगल कार्यालय, हांडेवाडी, ता. हवेली.
४ जुलै - स्पोर्टस कॉम्प्लेक्स, वारजे, पुणे.
५ जुलै - लोकनेते ना. शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन, धनकवडी, पुणे.
६ जुलै – पौड ग्रामीण रुग्णालय, ता. मुळशी
७ जुलै – राष्ट्रवादी भवन, कसबा, बारामती
८ जुलै – मूकबधीर शाळा, इंदापूर

ज्येष्ठ नागरिकांसाठी परदेशी बनावटीचे कानाच्या मशीनचा लाभ घेण्यासाठी तपासणी व मोजमाप शिबीर तपासणीसाठी येताना ज्येष्ठ नागरिकांकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे – अल्प उत्पन्न गटाचा दाखला, पिवळे / केशरी रेशन कार्ड आणि वय ६० वर्षे पूर्ण असलेबाबातचे प्रमाणपत्र (आधार कार्ड).