Friday, 6 July 2018

*शेतकरी कंपन्यांच्या सक्षमीकरणाकरीता दि. 17 जुलै रोजी सीटा संवाद कार्यक्रमाचे आयोजन *




औरंगाबाद :  सीटा (सेंटर फॉर इंटरनॅशनल ट्रेड इन अ‍ॅग्रीकल्चर अ‍ॅण्ड अग्रोबेस्ड इंडस्ट्रिज), यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद व कृषी विज्ञान केंद्र, एमजीएम, औरंगाबाद व कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी कंपन्या वा फार्मर प्रोड्युसर कंपन्या आणि शेतमालाचे ठोक खरेदीदार यांच्यासाठी इ-कॉमर्स प्लॅटफार्मची निर्मिती, शेतकरी कंपन्यांचा सक्षमीकरण या विषयावर सीटा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मंगळवार दि. 17 जुलै 2018 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत सदरील कार्यक्रम आर्यभट्ट सभागृह, जेएनईसी महाविद्यालय, एमजीएम परिसर, औरंगाबाद येथे संपन्न होईल.

या कार्यक्रमात सीटाचे संचालक ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ फिरोज मसानी, ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ विजयअण्णा बोराडे, सीटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील तांबे, दत्ता बाळसराफ आदी मान्यवर आपले विचार व्यक्त करणार आहेत.

शेतकरी कंपन्यांच्या मार्गदर्शनासाठी-प्रकल्प अहवाल तयार करणे, केंद्र व राज्य सरकार तसेच नाबार्डच्या विविध योजना व कार्यक्रमांचा लाभ मिळवणे, सल्लागार सेवा इत्यादी सेवा सिटाच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहेत.  शेतकरी कंपन्या आणि कॉर्पोरेट वा मोठे खरेदीदार यांनी शेतकरी कंपन्यांकडून थेट खरेदी करावी यासाठी इ-कॉमर्सचा प्लॅटफॉर्म उभारण्यासंबंधात सिटा पुढाकार घेणार आहे. ज्या शेतकरी कंपन्या वायदे बाजारात उतरतात त्यांच्यासाठी माहिती सेवा-कमोडिटी इंटेलिजन्स, पुरवण्यासंबंधात सिटा उत्प्रेरकाची भूमिका पार पाडेल. या सर्व अनुषंगाने शेतकरी कंपन्यांना उपरोक्त विषयांची माहिती व्हावी याकरीता या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

शेतकरी, शेतकरी कंपन्या वा शेतकरी गट, शेतमालाचे व्यापारी, शेतमाल प्रक्रिया उद्योग, कृषिउत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व अधिकारी, कमिशन एजंट, नाबार्ड तसेच शेतीकर्ज पुरवठा करणार्‍या बँका, कृषि विद्यापीठातील विस्तार विभागाचे अधिकारी वा प्राध्यापक, कृषी विभागाचे अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

सदरील कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, पूर्व नोंदणी आवश्यक आहे. दि. 15 जुलैपुर्वी इच्छुकांनी वैशाली देशमुख (मो.क्र. 9404738920, 7028167090) या क्रमांकावर अथवा mgmkvk@gmail.com या इमेल आयडीवर संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबादचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत, काकासाहेब सुकासे, जी. आर. रेड्डी, डॉ. ए. के. पांडे,  श्रीकृष्ण सोनवणे, विजय कान्हेकर, सुहास तेंडुलकर, डॉ. रेखा शेळके, सुबोध जाधव आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment