Tuesday, 19 June 2018

विनामूल्य आर्थिक गुंतवणूक मार्गदर्शन कार्यशाळा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ आणि संवेदन प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य आर्थिक गुंतवणूक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा गुरूवार ५ जुलै २०१८ रोजी दुपारी ३ ते ५ यावेळेत बेसमेंट सभागृह, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखाना जवळ,नरिमन पॉईंट, मुंबई होणार आहे.
कार्यशाळेतील या विषयांवरती वाढती महागाई आणि घटते व्याजदर , वाढत चाललेळे दाम दुप्पट फसव्या योजनांचे प्रमाण, इन्शुरन्स का घ्यावा? का घेऊ नये?, उत्पन्न प्रमाणे आर्थिक शिस्त कशी असावी, नियोजन करताना कसा विचार करावा, शेअर बाजार , म्यूचुअल फंड ह्या बाबत सखोल चर्चा, सिप म्हणजे नक्की काय?जेष्ठ नागरिकांच्या दर महिना खरचायला हवे असलेले पैसे आणि त्या पैस्याचा वाढीचा दर ह्याचा समतोल कसा साधावा,जागतिक गुंतवणूक गुरू वॉरेन बफेट ह्यांचे विचार आणि नियम, समृद्ध आर्थिक विकासाच्या दृष्टीने पाउल कसे टाकावे! चर्चा करण्यात येणार आहे. संपर्क - संजना पवार - भ्रमणध्वनी 8291416261 कार्यालय - 22045460, 22028598

Thursday, 14 June 2018

'सूर पश्चिमेचे'मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात...

'पाश्चात्य संगीतसंज्ञा कोश' या अशोक दा. रानडे लिखित आणि चैतन्य कुंटे संपादीत ग्रंथाच्या निमित्ताने लोकसत्ता, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 'सूर पश्चिमेचे' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते चैतन्य कुंटे असून हा कार्यक्रम शनिवार दिनांक २३ जून २०१८ रोजी सायंकाळी ५.३० वाजता, तिसरा मजला, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दादर (पश्चिम) येथे होईल. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाकडून कार्यक्रमाला अधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

Saturday, 26 May 2018

"दिव्यांग कट्टा" संपन्न...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि अपंग हक्क विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने "दिव्यांग कट्टा"चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये अपंग स्टॉलधारकांच्या समस्या या विषयावर चर्चा करण्यात आली. आलेल्या दिव्यांग व्यक्तींची विचारपूस करून त्यांच्या अपंग स्टॉलधारकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर शमीद खान यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

Monday, 21 May 2018

मोबाईल ट्रेनिंग वर्कशॉप

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे मोबाईल ट्रेनिंग वर्कशॉपचे आयोजन ४ जून व ८ जून असे दोन दिवस यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये व्हाट्सअप्प, फेसबूक, आणि ट्विटर सोबत स्मार्ट फोन बाबत परिपुर्ण माहिती कार्यशाळेत देण्यात येणार आहे. तसेच टॅक्सी बूक करणे, गूगल मॅप शोधून काढणे, बूक माय शो, एम-इंडिकेटर, स्विगी, बीग मार्केट आणि पेटीएम इ. अॅपची माहिती सुध्दा दिली जाणार आहे. प्रत्येक प्रशिक्षणार्थीकडून १२०० रूपये शुल्क आकारले जाईल. संपर्क संजना - ८२९१४१६२१६

Sunday, 20 May 2018

वारली चित्रसृष्टी प्रशिक्षण कार्यशाळा

नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि विभागीय केंद्र नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने वारली चित्रसृष्टी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन २८, २९, ३०, ३१ मे २०१८ रोजी नाशिक येथील क्लब हाऊस (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को - ऑफ. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत संजय देवधर-पत्रकार व वारली चित्रशैली अभ्यासक हे मार्गदर्शन करणार आहेत. पहिली बॅच २८, २९ मे ला आहे तर दुसरी बॅच ३०, ३१ मे रोजी होणार आहे. बेसिक कोर्स सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत असेल, त्यासाठी प्रशिक्षणार्थी कडून ५०० रूपयाचं शुल्क आकारलं जाईल. दुपारी २ ते ५ यावेळेत अँडव्हान्स कोर्स असेल त्यासाठी ७५० रूपयांचं शुल्क आकारलं जाईल. तसेच सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत तिथेच कॉम्बो कोर्स असेल, त्यासाठी प्रशिक्षणार्थीकडून ११०० रूपये शुल्क आकारले जाईल.

पेन्सिल पाण्यासाठी बाऊल, जुना रूमाल व रायटिंग पॅड आणावे. प्रशिक्षणार्थ्यांनी दोन्ही दिवशी यायचे आहे. सर्वांना सहभागाचे आकर्षक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच वारली चित्रसृष्टी व वारली आर्ट वर्ल्ड पुस्तके उपलब्ध आहेत.

विनायक पाटील, विश्र्वास ठाकूर, डॉ. कैलास कमोद, डॉ. सुधीर संकलेचा, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, कविता कर्डक, नितीन ठाकरे, आणि विक्रम मोरे यांनी प्रशिक्षणार्थीनी अधिक सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. संपर्क राजू देसले - ७७२००५२५७२

Wednesday, 16 May 2018

नाशिक मध्ये बालनाट्य शिबीराला सुरूवात

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, सारस्वत बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ व विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्यकलावंत लक्ष्मी पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली बालनाट्य शिबीराचा आज क्लब हाऊस (विश्वास लॉन्स) येथे शुभारंभ झाला. शिबीराला मुला-मुलींचा जोरदार प्रतिसाद लाभला आहे. मनोरंजनात्मक खेळाच्या माध्यमातून नाटक शिकण्याची प्रक्रिया यातून मुलांना आनंद देत आहे. सदर शिबीर शुक्रवार २५ मे २०१८ पर्यंत सुरू असणार आहे.

सुलेखन कार्यशाळेचा आज शेवटचा दिवस

नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, सारस्वत बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ व विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध सुलेखनकार नंदू गवांदे यांच्या सुलेखन कार्यशाळेचा आज शुभारंभ झाला. सुलेखनातून अक्षरांची शैली, स्वभाव व कलात्मक अविष्कार यांचा अनोखा मिलाफ शिबीरार्थींना अनुभवास मिळत आहे. सदर कार्यशाळा गुरूवार १७ मे २०१८ पर्यंत सुरू असणार आहे.