Thursday, 10 May 2018

१९ मे ला 'अजात' डॉक्यूमेंटरी...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या नवमहाराष्ट्र युवा अभियातर्फे 'अजात' नावाची डॉक्यूमेंटरी शनिवारी १९ मे २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई दाखवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील जातीअंताच्या लढाईचे एक अज्ञात पर्व 'अजात' डॉक्यूमेंटरी मधून दिग्दर्शक अरविंद जोशी दाखवत आहेत. कार्यक्रम प्रवेश विनामुल्य असून प्रथम येणा-यास प्राधान्य देणात येईल. 

Tuesday, 8 May 2018

नाशिक केंद्राकडून बालनाट्य शिबीराचे आयोजन

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि विभागीय केंद्र नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ते १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी नाट्यकलावंत लक्ष्मी पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बालनाट्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार १६ ते शुक्रवार २५ मे २०१८ दरम्यान वेळ सायं ४ ते ७ यावेळेत नाशिक येथील क्लब हाऊस (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को - ऑफ. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, येथे शिबीर होणार आहे. शिबीरात सहभागी होणा-या विद्यार्थ्यांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाईल. विनायक पाटील, विश्वास ठाकूर, डॉ. कैलास कमोद, डॉ, सुधीर संकलेचा, राजवर्धन कदमबोडे, रऊफ पटेल, कविता कर्डक आणि नितीन ठाकरे यांनी कार्यक्रमाला अधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे. 

Monday, 7 May 2018

सुलेखनकार नंदू गवांदे यांची कॅलिग्राफी (सुलेखन) कार्यशाळा


नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, सारस्वत बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ व विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने कॅलिग्राफी (सुलेखन) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कॅलिग्राफी सुलेखन कार्यशाळा मंगळवार, १५ ते गुरूवार १७ मे २०१८ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळात सुप्रसिद्ध सुलेखनकार नंदू गवांदे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. देवनागरी व इंग्रजी भाषेतील अक्षरांविषयी, सुलेखनाविषयी यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अक्षरांचे सौंदर्य, लेखनातील सहजता व पद्धती यांविषयी सप्रयोग माहिती कार्यशाळेत देण्यात येणार आहे. कार्यशाळेसाठी लागणारे साहित्य पुरविण्यात येणार आहे.
सदर शिबीर १० वर्षांपुढील सर्वांसाठी असून क्लब हाऊस (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न होणार आहे. शिबिराच्या संपर्कासाठी व अधिक माहितीसाठी राजू देसले ७७२००५२५७२, सचिन हांडे ७७२००५२५५९, ज्ञानेश्वर शिरसाठ ९६०४०६१७५८, विनायक रानडे ९९२२२२५७७७ यांच्याशी संपर्क साधावा.
या कार्यशाळेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे  यांनी केले आहे.

‘चित्रपट चावडी’ तर्फे चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी ‘बॅबेल’


नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार ०५ मे २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध दिग्दर्शक अलेजांडर इनारीतु यांचा ‘बॅबेल’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक- ४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
मेक्सीकन सिनेमाचा उत्तुंग प्रतिभेचा तसेच आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या तसेच मेनस्ट्रीम हॉलीवुड मध्येही तितक्याच ताकदीने मिरविणारा अलेजांडर इनारीतु हा प्रतिभावंत दिग्दर्शक आहे. आधुनिक समाजामध्ये विशेषत: शहरी जीवनात माणसांची आयुष्ये ही वरून जरी सुटी सुटी वाटली तरी एकमेकांशी घट्ट जोडलेली असतात. इनारीतु त्याच्या खास शैलीत कथानकांचे गोफ विणतो. त्यामध्ये त्यांची सुख:दु:खे, त्यांचे भोग, प्राक्तने, जन्म, मृत्यु सगळेच झपाटल्यासरखे विणलेले असतात. 
मेक्सीको येथे २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॅबेल’ या सिनेमाचा कालावधी १४३ मिनीटांचा आहे.
‘बॅबेल’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अ‍ॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.

Sunday, 6 May 2018

'विज्ञानगंगा'चे सव्वीसावे पुष्प...'घनकच-याचे व्यवस्थापन'

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत सव्वीसावे पुष्प सीटेक संस्थेचे प्रमुख कार्यकारी संचालक श्री. संदीप असोलकर यांचे 'घनकच-याचे व्यवस्थापन' या विषयावर दिनांक १८ मे २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर नरिमन पॉईंट, मुंबई येथे गुंफणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती. 

Friday, 4 May 2018

तृतीयपंथीयांच्या जाणीव जागृतीबाबत कुलाबा पोलिसांना प्रशिक्षण

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि विकास अध्ययन केंद्रातर्फे तृतीयपंथी आणि त्यांचे हक्क याबाबत जाणीव जागृती प्रशिक्षण शिबीरं आणि विविध शासकीय यंत्रणांसोबत आज सकाळी ९ वाजता कुलाबा पोलिस स्टेशन मध्ये कार्यक्रम आयोजीत केला होता. पहिला टप्पा म्हणजे शालेय शिक्षकांसोबत आम्ही हा कार्यक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक शिक्षकांना तृतीयपंथी आणि त्यांचे हक्क जाणीव जागृती शिबिर मार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. कुलाबा पोलीस ठाण्यात विकास अध्ययन केंद्राच्या रेणुका कड आणि विकी शिंदे यांनी पोलिसांना मार्गदर्शन केले. तसेच पोलिसांच्या उपस्थित प्रश्नांना विकी शिंदे आणि रेणुका कड यांनी योग्य उत्तरे दिली.

महाराष्ट्राची निर्मिती यशवंतराव चव्हाण यांच्या कौशल्यामुळे झाली – प्रा. राजेंद्र दास

यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला नेहमीच भारत सेवक महाराष्ट्र म्हणून मानले स्व. प्र. के. अत्रे, एस. एम. जोशी, शाहीर अमर शेख यांनी संघर्ष उभा केला आणि १०५ हुतात्मांच्या बलिदानानंतर देखील राज्याची निर्मिती अवघड झाली होती, तेव्हा चव्हाण साहेब सुध्दा अस्वस्थ झाले होते. हा जनभोक्ष दिल्लीकरांना समजला पाहिजे म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांनी पंडीत जवाहरलाल नेहरूंना प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी बोलवले आणि महाराष्ट्राच्या निर्मितीचा तो जनभोक्ष आणि तीव्र भावना पाहून पंडीत नेहरूंनी स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीला १ मे १९६० रोजी मान्यता दिली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र सोलापूर यांच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राची निर्मिती आणि समकालीन समस्या या विषयावर आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. राजेंद्र दास यांनी आपले विचार मांडले.

यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र सर्वगुणसंपन्न, समृध्द आणि अत्यंत कल्पकतेने उभा केला. यासाठी सहकार, शेती आणि उधोग हे तीनही क्षेत्र अव्वलस्थानी राहील. यासाठी विशेष काळजी घेतली आणि हे तीनही क्षेत्र समृध्द होण्यासाठी शिक्षण क्षेत्र देखील समृध्द झाले पाहिजे, म्हणून सिक्षण समाजातील सर्व घटकांना मिळले पाहिजे, म्हणून विशेष काळजी घेतली एवठ्या विशाल विचारांचे चव्हाण साहेब होते. हे करत असताना राजकारणात त्यांनी मानापानापेक्षाही राज्याचे सार्वजनिक हित म्हत्वाचे मानले. म्हणूनच राज्य मराठ्यांचे कि मराठीचे असा प्रश्न त्यांना विचारला. तेव्हा हे राज्य बहुजनांचे असे उत्तर यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिले. म्हणुनच आजही राज्याच्या आणि देशाच्या गर्भकाळात यशवंतराव चव्हाण यांचे विचार जिवंत आहेत
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार युनुसभाई शेख होते. तर स्वागत व प्रस्तविक विभागीय केंद्राचे सदस्य दत्ता गायकवाड यांनी केले. जुळे सोलापूर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी विभागीय केंद्राचे सदस्य माजी खासदार धर्मणा सादूल यांची प्रमुख उपस्थिती होती. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सपन्न झालेल्या या कार्यक्रमास नागरिक उपस्थित होते.