Wednesday, 14 March 2018
Tuesday, 13 March 2018
एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता या विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विकास अध्ययन केंद्र, कोरो मुंबई आणि कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता या विषयावर चव्हाण सेंटर मध्ये राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्याताई चव्हाण, निशा शिवूरकर, आशा भिसे, दीप्ती राऊत, सुरेश शेळके आणि महेंद्र रोकडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक रेणुका कड यांनी केले. तर एकल महिला कौटुंबिक, सामाजिक प्रश्न, उपजीविका आणि अर्थिक स्थिती या विषयावर आशालता देशपांडे, भाग्यश्री रणदिवे आणि राम शेळके यांनी मार्गदर्शन केले. 'एकल महिला आणि शासकीय योजना' या विषयावर विजय जाधव यांनी मार्गदर्शन केले. 'भटके विमुक्त समाजातील एकल महिला या विषयावर वैशाली भांडवलकर आणि पल्लवी रेणके त्यांना आलेले अनुभव उपस्थितांना सांगितले. 'एकल महिला आणि लैंगिक शोषण' या विषयावर मनीषा तोकले यांनी मार्गदर्शन केले. 'एकल महिलांच्या पाल्यांचे प्रश्न' या विषयावर करूणा महांतारे यांनी मार्गदर्शन केले. शहरी आणि ग्रामीण भागातील अविवाहीत एकल महिलांचे प्रश्न या विषयावर दिप्ती राऊत यांनी मोजक्या शब्दात मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला आलेल्या लोकांचे गट तयार करून चर्चा करण्यास सांगितले. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शन निशा शिवूरकर यांनी केले तर अध्यक्षीय समारोप आमदार विद्या चव्हाण यांनी केले. पुढील कृती आराखडा आणि आभारप्रदर्शन दत्ता बाळसराफ यांनी केले.
Wednesday, 7 March 2018
साहित्यकारण आणि राजकारण विषयावर मुक्त संवाद
ठाणे : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र ठाणे आणि कोकण मराठी साहित्य परिषद (मध्यवर्ती) यांच्या संयुक्त विद्यमाने विंदा करंदीकर जीवनगौरव सन्मान प्राप्त पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा सत्कार आणि ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांचा मधुभाईंशी साहित्यकारण आणि राजकारण विषयावर मुक्त संवादाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम १२ मार्च २०१८ रोजी सायंकाळी ६ ते ८ यावेळेत सहयोग मंदिर सभागृह, २ रा मजला, घंटाळी, ठाणे (पश्चिम) होणार आहे. नमिता कीर, अमोल नाले, महेश केळुसकर आणि मुरलीधर नाले यांनी कार्यक्रमाला अधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.
'लोकशाही की कॉर्पोरेटशाही ?' विषयावरती व्याख्यान
औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'लोकशाही की कॉर्पोरेटशाही ?' या विषयावरती १२ मार्च २०१८ रोजी, दुपारी १२ वाजता, आईन्स्टाईन सभागृह, जेएनईसी महाविद्यालय, एमजीएम परिसर, औरंगाबाद येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते यशवंतराव चव्हाण यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त 'लोकशाही की कॉर्पोरेटशाही ?'या विषयावरती ज्येष्ठ पत्रकार मा. हेमंत देसाई ' मार्गदर्शन करणार आहेत. तर औरंगाबाद विभागीय केंद्राचे अध्यक्ष मा. अंकुशराव कदम यांनी कार्यक्रमाला लोकांनी अधिक संख्येने उपस्थित असे आवाहन केले आहे.
Monday, 5 March 2018
'विज्ञानगंगा'चे चोविसावे पुष्प...'अतिनवतारा
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत चोविसावे पुष्प श्री. ऋषिकेश जोगळेकर यांचे 'अतिनवतारा' या विषयावर दिनांक १६ मार्च २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर नरिमन पॉईंट, मुंबई येथे गुंफणार आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती.
वृद्धत्व विरोधी वैद्यकीय व नैसर्गिक उपचार याविषयी मोफत व्याख्यान
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठतर्फे वृद्धत्व विरोधी वैद्यकीय व नैसर्गिक उपचार याविषयी मोफत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक २२ मार्च २०१८ रोजी गुरुवारी दुपारी २ ते ५ यावेळेत सांस्कृतिक सभागृह, ४था माळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखाना जवळ नरीमन पॉईटं, मुंबई येथे होईल. या कार्यक्रमात प्रख्यात मेडीकल कॉस्मोलोजीस्ट डॉ पूर्णिमा म्हात्रे या मार्गदर्शन करतील. अधिक माहितीसाठी संपर्क संजना पवार -२२०४५४६० (विस्तारित २४४) ८२९१४१६२१६ ( वेळ ११ ते ६)
Subscribe to:
Posts (Atom)






