यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या सृजन विभागातर्फे रविवारी ५ नोव्हेबर सकाळी १० वाजता सृजनतर्फे विज्ञान खेळणी कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे. या कार्यशाळेत अधिक मुलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
Friday, 3 November 2017
Saturday, 28 October 2017
ग्रामीण व शहरी विभागातील कर्णबधीर मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना मोफत श्रवणयंत्र
स्टार्की फाउंडेशन अमेरिका, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, आरव्हीएस एज्युकेशनल अॅण्ड चॅरिटेबल फाउंडेशन मुंबई, नरोत्तम सक्सेरीया फाउंडेशन मुंबई, ठाकरसी ग्रुप मुंबई, विद्या प्रतिष्ठान बारामती आणि महात्मा गांधी सेवा संघ, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील एकूण १२०० ग्रामीण व शहरी विभागातील कर्णबधीर मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना मोफत वैद्यकीय तपासणी करुन दिनांक ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर २०१७ या दरम्यान ग. दि. माडगुळकर सभागृह, विद्या प्रतिष्ठान, एम. आय. डी. सी. बारामती येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत आधुनिक डिजिटल श्रवणयंत्र वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात प्रत्येक कर्णबधीर मुलास व ज्येष्ठ नागरिकास रु २५,०००/- किंमतीचे (अमेरिकन मेड) आधुनिक श्रवणयंत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
या शिबिरासाठी स्टारकी फाउंडेशन, अमेरिका या संस्थेचे, पदाधिकारी व स्वयंसेवक मिळून २५ जणांची एक टीम अमेरीकेहून बारामतीमध्ये उपस्थित राहणार आहे. या कर्णबधिर मुलांना श्रवणयंत्र लावल्यानंतर ऐकू येणा-या ध्वनी लहरींमुळे त्यांना होणारा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सदरील कार्यक्रमास आपली उपस्थिती प्राथनीय आहे.
Friday, 27 October 2017
'विज्ञानगंगा'चे विसावे पुष्प संपन्न...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत विसावे पुष्प, व्याख्याते डॉ. सोमक रॉय चौधरी यांचे 'विश्वातील सर्वात मोठी आकाशगंगा' या विषयावर चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट, मुंबई व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विशेषम्हणजे नेमकी म्हणजे आकाशगंगा हे समजून घेण्यासाठी अधिक विद्यार्थ्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.
सुरुवातीला चौधरी यांनी 'विश्वातील सर्वात मोठी आकाशगंगा' म्हणजे नेमकं काय हे समजावून सांगितलं. त्यानंतर त्यानी आकाश संदर्भात संशोधन करत असताना त्यांना आलेले अनुभव उपस्थितांना सांगितले.
आकाशात काही ग्रह कधी कधी उलटे फिरताना दिसतात. वास्तविक सर्वच ग्रह सूर्याभोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुध्द दिशेने फिरतात. पण पृथ्वीवरून पाहताना काही ग्रह मधेच उलटे जाताना दिसतात. असं का होतं हेही त्यांनी उदाहरणं देऊन स्पष्ट केलं.
चंद्रकक्षेपलीकडील, सूर्यमालेतील पोकळी म्हणजे चंद्रकक्षेपासून आपल्या सूर्यमालेच्या शेवटच्या ग्रहाच्या कक्षेपर्यंतच्या पोकळीस अंतरिक्ष म्हणू या. सूर्य हा आपल्या सूर्यमालेचा केन्द्र आहे, म्हणून त्याच्या पृष्ठभागापासून ते सूर्यमालेच्या परीघापर्यंत अंतरिक्षाची मर्यादा होते. शुक्र, मंगळ, गुरू, शनि, युरेनस, नेपच्यून वगैरे ग्रहांचे, ज्या यानांतून वेध घेतले गेले ती अंतरिक्ष याने, अंतराळ याने नव्हेत. आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रह आणि त्यांचे अुपग्रह, प्लुटोसारखे बटुग्रह, लघुग्रहांचा पट्टा आणि त्यातील लघुग्रह, अशनी वगैरे वस्तू अंतरिक्षात भ्रमण करतात. पृथ्वीही अंतरिक्षातच भ्रमण करते. असंही सोमक यांनी सांगितलं.
‘चित्रपट चावडी’तर्फे चित्रपटप्रेमींसाठी शनिवारी ‘अनिकी बोबो’
नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार २८ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध पोर्तुगाल दिग्दर्शक मॅन्युएल डी. ऑलीवेरा यांचा ‘अनिकी बोबो’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक - ४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
ऑलीव्हेरांचा हा अगदी सुरूवातीचा पोर्तुगीज चित्रपट पुढे येऊ घातलेल्या इटालीयन नव वास्तववादाची नांदीच होती. चित्रपटातील सर्व पात्रे खरंतर लहान मुलेच आहेत. पण त्यांचे बालखेळ मात्र मोठ्यांचे प्रतिबींबच आहेत. लहान मुलांचा निरागसपणा व खेळकरपणा मात्र शेवटी प्रेक्षकांची मने जिंकतो.
पोर्तुगीज चित्रपट दिग्दर्शक मन्युअल डी. ऑलीवेरा हे जागतिक चित्रपट सृष्टीतील एक आश्चर्यच म्हटले पाहिजे. १०६ वर्षांचे प्रदिर्घ आयुष्य लाभलेले ऑलीवेरा ८० वर्षे चित्रपट सृष्टीत कार्यरत राहीले. मूक चित्रपट ते २१ वे शतक असा खूप मोठा कालखंड त्यांनी पाहिला. त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता तशी उशीराच मिळाली. पण पोर्तुगालमधील हुकुमशाही राजवटीमुळे सुरूवातीला चित्रपटासाठी लागणारे पोषक वातावरण नव्हते. एकंदरीत सामाजिक आशयाचा चित्रपट तसेच लघुपट व माहितीपटांची अखंड निर्मिती केली.
१९४२ मध्ये पोर्तुगीज येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी ७१ मिनीटांचा आहे. ‘अनिकी बोबो’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.
Wednesday, 25 October 2017
मा. यशवंतराव चव्हाण यांची ३३ वी पुण्यतिथी...
आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व धुरंधर राष्ट्रीय नेते मा. यशवंतराव चव्हाण यांच्या ३३ वी पुण्यतिथी निमित्त शनिवारी दिनांक २५ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता कार्यक्रमांचे आयोजन चव्हाण सेंटर, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईन्ट मुंबई येथे करण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई पुरस्कृत न्यायमूर्ती वाय्. व्ही. चंद्रचूड पारितोषिक वितरण,
मा. यशवंतराव चव्हाण यांच्या "भूमिका" व "माझ्या विद्यार्थी मित्रांनो"ऑडिओ सीडीचे प्रकाशन,
वि. का. राजवाडे यांच्या साहित्याच्या वेबसाईटचे उद्घाटन, "लोकमान्य ते महात्मा" या पुस्तकाच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन,
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक २०१७ प्रदान करणे, राज्यस्तरीय पारितोषिक स्वीकाराचे भाषण,
यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०१७ जाहीर करणे,
अध्यक्षांचे भाषण.
Tuesday, 24 October 2017
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार – २०१८
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार – २०१८
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांचा उपक्रम
दरवर्षी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार दिले जातात. सामाजिक व क्रीडा विभागात एक युवक व एक युवती यांना विशेष कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार’ (युवक व युवती) व ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार’ (युवक व युवती) असे एकूण चार पुरस्कार दिले जातात. क्रीडा व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून इतर युवांसमोर एक आदर्श ठेवणाऱ्या युवा वर्गाच्या कर्तुत्वाची दाखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा यामागे उद्देश आहे. पुरस्काराचे यंदाचे अठरावे वर्ष आहे.
महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूंच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, हे या क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व भरीव कार्य करणाऱ्या युवक-युवतींची समाजाला ओळख व्हावी हे या सामाजिक युवा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. २१,०००/-चा धनादेश, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारासाठी व्यक्तीचे वय ३१ डिसेंबर २०१६ अखेरीस ३५ वर्षांच्या आत असले पाहिजे. पुरस्कारासंबंधीची संपूर्ण माहिती व फॉर्म www.ycpmumbai.com या वेबसाईटवरून डाऊनलोड करावे. आपले प्रस्ताव व अर्ज संपूर्ण माहितीनिशी दिलेल्या फॉर्मवर भरून दि. १० डिसेंबर २०१७ च्या आत संघटक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई – २१ या पत्त्यावर, अथवा navmaharashtra@gmail.com या मेल आयडीवर पाठवावेत. या पुरस्कारासंबंधी अधिक माहितीकरिता कार्यालयामध्ये ०२२-२२०२८५०८ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा श्री. सुबोध जाधव (९८२३०६७८७९) व श्रीमती मनीषा खिल्लारे (९०२२७१६९१३) व रमेश मोरे (९००४६५२२६२) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे संयोजक दत्ता बाळसराफ, सहसंयोजक विश्वास ठाकूर, विजय कान्हेकर व संघटक नीलेश राऊत यांनी केले आहे.

Monday, 23 October 2017
सिंहासन सिनेमा व चर्चा...
ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधूंचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या 'सिंहासन' व 'मुंबई दिनांक' या कादंबरी व कथासंग्रहातील निवडक प्रसंगांवर आधारित सिनेमा बनला-"सिंहासन". आपल्या सर्वांचा परिचित चित्रपट. १९७९ ला हा सिनेमा प्रदर्शित झाला... संपूर्णपणे राजकारणच केंद्रबिंदू असलेला हा मराठीतील पहिला चित्रपट...सत्तेच्या सिंहासनासाठी केल्या जाणाऱ्या राजकारणावर आधारित हा सिनेमा आहे..राजकीय डाव, बेरीज-वजाबाकी आणि अनुत्तरित गणितंही...हे राजकारण अनेकदा सामान्य माणसांच्या आकलनापलीकडचे असते...पण एक पत्रकार म्हणून खुर्चीभोवतालचे हे डाव टिपता येतात...याचचं यथार्थ चित्रण या सिनेमात आहे.
जब्बार पटेल दिग्दर्शित व विजय तेंडुलकर पटकथा लिखित... निळू फुले, श्रीराम लागू, अरुण सरनाईक, मोहन आगाशे, नाना पाटेकर, रिमा लागू, सतीश दुभाषी, उषा नाडकर्णी यांचा प्रगल्भ अभिनय आणि हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत असलेला हा राजकीय चित्रपट.
सम्यक संवाद व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आयोजित सिंहासन : सिनेमा व चर्चा दिनांक ४ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालयाजवळ, नरीमन पॉईंट येथे दाखविला जाणार आहे व त्यानंतर चर्चा ही होणार आहे अधिक माहितीसाठी व कृपया, येण्यापूर्वी उपस्थिती कळवा. प्रथम येणा-यांस प्राधान्य. गौरव तोडकर (८४११९९१९११), मनिषा खिल्लारे (९०२२७१६९१३), निलेश खानविलकर (८०९७५४४३२०), सोनाली शिंदे (९००४१२१५९५).
Subscribe to:
Posts (Atom)