ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधूंचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या 'सिंहासन' व 'मुंबई दिनांक' या कादंबरी व कथासंग्रहातील निवडक प्रसंगांवर आधारित सिनेमा बनला-"सिंहासन". आपल्या सर्वांचा परिचित चित्रपट. १९७९ ला हा सिनेमा प्रदर्शित झाला... संपूर्णपणे राजकारणच केंद्रबिंदू असलेला हा मराठीतील पहिला चित्रपट...सत्तेच्या सिंहासनासाठी केल्या जाणाऱ्या राजकारणावर आधारित हा सिनेमा आहे..राजकीय डाव, बेरीज-वजाबाकी आणि अनुत्तरित गणितंही...हे राजकारण अनेकदा सामान्य माणसांच्या आकलनापलीकडचे असते...पण एक पत्रकार म्हणून खुर्चीभोवतालचे हे डाव टिपता येतात...याचचं यथार्थ चित्रण या सिनेमात आहे.
जब्बार पटेल दिग्दर्शित व विजय तेंडुलकर पटकथा लिखित... निळू फुले, श्रीराम लागू, अरुण सरनाईक, मोहन आगाशे, नाना पाटेकर, रिमा लागू, सतीश दुभाषी, उषा नाडकर्णी यांचा प्रगल्भ अभिनय आणि हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत असलेला हा राजकीय चित्रपट.
सम्यक संवाद व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आयोजित सिंहासन : सिनेमा व चर्चा दिनांक ४ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालयाजवळ, नरीमन पॉईंट येथे दाखविला जाणार आहे व त्यानंतर चर्चा ही होणार आहे अधिक माहितीसाठी व कृपया, येण्यापूर्वी उपस्थिती कळवा. प्रथम येणा-यांस प्राधान्य. गौरव तोडकर (८४११९९१९११), मनिषा खिल्लारे (९०२२७१६९१३), निलेश खानविलकर (८०९७५४४३२०), सोनाली शिंदे (९००४१२१५९५).
No comments:
Post a Comment