Saturday 27 August 2016

अणू-रेणूंची संरचना विषयावर रंगले डॉ. मानसी राजाध्यक्ष यांचे व्याख्यान


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि मराठी विज्ञान परिषद ह्या दोन संस्थांच्या वतीने ‘डावे-उजवे’ अर्थात अणू-रेणूंची संरचना ही संकल्पना जनसामान्यांसमोर सोप्या भाषेत स्पष्ट करणारे व्याख्यान शुक्रवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित करण्यांत आले होते. हे व्याख्यान ऐकण्यासाठी उपस्थित श्रोत्यांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. व्याख्यानानंतर वक्त्यांशी झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात मोठ्यांबरोबर ह्या विद्यार्थ्यांनीही अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. ‘दिसायला सारखे असणे वा वाटणे, आणि प्रत्यक्ष सारखे असणे’ यात खूप मोठा फरक असतो हे अणू-रेणूंच्या संरचनेमध्ये काळजीपुर्वक लक्षात घ्यावे लागते’ हा मुद्दा डॉ. मानसी राजाध्यक्ष यांनी प्रश्नोत्तरा दरम्यान अधिक स्पष्ट केला. डॉ. राजाध्यक्ष यांचे व्याख्यान पडद्यावर बदलणा-या अनेक स्लाईडसच्या मदतीने होत असल्याने श्रोत्यांपर्यंत ते उत्तमरित्या पोहोचले, व अतिशय रंगले.

No comments:

Post a Comment