यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे व 'ब्यूटीलाईन खुबसुरत'च्या संयोगाने महिलांसाठी सौंदर्यविषयक मार्गदर्शनासाठी एक विनामूल्य कार्यशाळा मंगळवार दिनांक ३० ऑगस्ट २०१६ रोजी आयोजित करण्यांत आली होती. ह्या कार्यशाळेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संयोजिका ममता कानडे यांनी प्रास्ताविक केले व कार्यशाळेची सुत्रे 'ब्यूटीलाईन खबसुरत"च्या संचालिका गीता सरवय्या यांचेकडे दिली. गीता सरवय्या यांनी उपस्थित महिलांना सौंदर्यविषयक विविध बाबींसंबंधी तपशीलवार माहिती दिली. केसांची निगा, त्वचा, डोळे वगैरेंची काळजी घेण्याच्या पद्धती व नानाविध टीप्स देत वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनाचा वापर कसा करावा याचे धडे कार्यशाळेत दिले. कार्यक्रमाच्या अखेरीस, प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठाच्या संचालिका ममता कानडे यांनी सांगितले की २६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या काळात पाच दिवसांची सौंदर्यविषयक मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यांत आली आहे. त्यात शुल्क रू.३०००/- शुल्क भरून महिलांना सहभागी होता येईल.
या संदर्भात अधिक माहिती व नावनोंदणीसाठी कृपया संजना पवार व संगिता गवारे यांच्याशी ( दूरध्वनी - २२०४५४६० विस्तारित क्र. २४४ अथवा भ्रमणध्वनी ८२९१४१६२१६ ) वर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment