सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लोक स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. व त्याचे दुष्परिणाम फार त्रासदायक होतात. तेव्हा आपल्या आरोग्याविषयी सतर्क रहाणे फार गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन आरोग्याविषयी काय काय काळजी घ्यावी,दिनचर्या व आहार कसा असावा तसेच विविध शारीरिक व्याधी व त्यावरील उपाय व या व्याधी होऊच नये म्हणून घेण्यात येणारी दक्षता यावरील आयुर्वेदिक उपचार पद्धती याविषयी पोतदार आयुर्वेदिक कॉलेज मधील डॉक्टरांचे दोन दिवसीय शिबिर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे दि २ व १२ ऑगस्ट २०१६ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत माफक शुल्कात आयोजित केले होते या शिबिरास महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्त्रीरोग, नेत्र आरोग्य,स्वास्थ स्वंरक्षण व घरगुती फेसपॅक व आयुर्वेदिक साबण निर्मिती या विषयावर प्रशिक्षकांनी पी पी टी, नोट्स प्रात्यक्षिक द्वारे मार्गदर्शन केले. तयार केलेले लिपबाम, साबण महिलांना वाटण्यात आले.
Wednesday, 24 August 2016
आरोग्याची काळजी कशी घ्यावी कार्याशाळा संपन्न...

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment