Tuesday, 5 March 2019

'दिलखुलास- मैफल गप्पांची'

'दिलखुलास- मैफल गप्पांची' 
यशवंतराव चव्हाण यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व विभागीय केंद्र नाशिक यांच्यावतीने सकारात्मक जगण्याची आनंदयात्रा... 'दिलखुलास- मैफल गप्पांची' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार ११ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजता अॅडमिनिस्ट्रेटीव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे मिलिंद कुलकर्णी सादर करणार आहेत. 


‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार - २०१८’ डॉ. रघुराम राजन यांना...

‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार - २०१८’
 डॉ. रघुराम राजन यांना...
राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची १०६ वी जयंती १२ मार्च रोजी सायंकाळी ५.०० वाजता नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये साजरी करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे समारंभाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. या कार्यक्रमात ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार - २०१८’ हा पुरस्कार रिझर्व बँक ऑफ इंडियाचे माजी गवर्नर डॉ. रघुराम राजन यांना प्रदान करण्यात येणार आहे.
६ तासांत ४८४० कर्णबधिरांना कर्णयंत्र लावून "गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" करण्यात आला आहे. या गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, टाटा ट्रस्ट, ठाकरसी ग्रुप, आर. व्ही. एस. ट्रस्ट, पवार पब्लिक ट्रस्ट, महात्मा गांधी सेवा संघ जिल्हा पुनर्वसन केंद्र, पुणे यांना गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी यांच्या हस्ते देण्यात येणार असून स्टार्की फाऊंडेशन अमेरिकेचे संस्थापक बिल अॅस्टीन व त्यांच्या पत्नी टॅनी अॅस्टिन यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने 'यशवंतराव चव्हाण विशेष पुरस्कार, भारत' देवून गौरविण्यात येणार आहे.


Monday, 4 March 2019

विभागीय केंद्र परभणीचा अनोखा उपक्रम.. 'यशवंत कृषक-कृषी सन्मान-२०१९'

 विभागीय केंद्र परभणीचा अनोखा उपक्रम..
'यशवंत कृषक-कृषी सन्मान-२०१९'
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व विभागीय केंद्र परभणी यांच्यावतीने दि. ४ मार्च रोजी परभणी-पाथरी महामार्गावरील रानमेवा मळा येथे 'कृषक-कृषी सन्मान २०१९' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
पुरस्काराचे मानकरी ठरलेले लोहगाव येथील सीताराम देशमुख हे एक कसदार शेतकरी म्हणून परिचित आहेत. त्यांनी प्रमाणित पाण्याचा वापर करून अंजीर फळाचे दर्जेदार उत्पादन काढले आहे. मा श्री.सितारामजी देशमुख व सौ.वनमाला सि.देशमुख यांना 'कृषक-कृषी सन्मान २०१९ ' स्मृतिचिन्ह,मानाचे वस्त्र व रोख रक्कम ११,००० रू. देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरवातीस श्री.प्रा.अशोक जोंधळे यांनी 'मोठका पाणी' हि रचना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. हा कार्यक्रम शेती व काळ्यामातीचा सन्मान करणारा असल्यामुळे महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी मा.प्रा.श्री.इंद्रजीत भालेराव यांनी 'माझ्या गावकड चाल माझ्या दोस्ता' हि रचना सादर केली.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा.ना.डॉ.अशोक ढवण (कुलगुरू,व.ना.म.कृ.वि.परभणी) तर प्रमुख पाहुणे मा.डॉ.सौ. संध्याताई दूधगावकर(अध्यक्ष,वि.के.परभणी), मा.श्री. विजयरावजी कान्हेकर(सचिव,वि.के.परभणी), मा.श्री.इंद्रजीत भालेराव( महाराष्ट्राचे सुपरीचीत कवी तथा सल्लागार वि.के.परभणी), मा.श्री.सोपानराव अवचार(कृषी व्यासपीठाचे प्रमुख संयोजक), मा.सौ.भावनाताई नखाते(उपाध्यक्ष जि.प.परभणी) तसेच या कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सन्माननीय सदस्य श्री.बाळासाहेब फुलारी, विलास पानखेडे, अनिल जैन, किरण सोनटक्के, रमेश जाधवर, सुमंत वाघ, प्रमोद दलाल व विष्णू वैरागड उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.बबन आव्हाड यांनी केले तर आभार मा.विलास पानखेडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील प्रतिष्ठीत नागरीक व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



Sunday, 3 March 2019

पु.ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके जन्मशताब्दी वर्षानिमित्त "मानाचा मुजरा"- अमृतयोग...

पु.ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके
जन्मशताब्दी वर्षानिमित्त "मानाचा मुजरा"- अमृतयोग...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई तर्फे पु.ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त "मानाचा मुजरा"- अमृतयोग हा कार्यक्रम गुरुवार दिनांक ७ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ७ वाजता, मुख्य सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष. मा. श्री. शरदराव पवार, अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक कलर्स मराठी, वाहिनी आहे. कार्यक्रमामध्ये सुमित राघवन, स्पृहा जोशी, अतुल परचुरे, आनंद इंगळे, हेमांगी कवी, राहुल देशपांडे, ऋषिकेश रानडे, अजित परब, प्रियांका बर्वे, शरयू दाते तसेच सुर नवा ध्यास नवा मधील छोटे सुरवीर सोनिया परचुरे व नृत्य समूह असे कलाकार असणार आहेत. अशा रंगतदार कार्यक्रमास आपण अगत्यपूर्वक उपस्थित राहावे असे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई तर्फे आवाहन करण्यात आले आहे.


यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न...

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने मागील एकवीस वर्षांपासून सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या युवक युवतींना राज्यस्तरीय युवा पुरस्कार दिले जातात. यंदाच्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार-२०१९ ची घोषणा करण्यात आलेली होती. या पुरस्कारांचा वितरण सोहळा रविवार, दि. ३ मार्च २०१९ रोजी, सायं ५ वा., लोकनेते ना. शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन, धनकवडी, पुणे येथे पार पडला. प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा मा. खा. सौ. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते क्रीडा व सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या वेदांगी कुलकर्णी (सायकल पटू ), किसन नरशी तडवी (धावपटू), साक्षी दिनेश चितलांगे (बुद्धीबळ पटू), अभिजित सदानंद दिघावकर व स्नेहल चौधरी कदम यांना (युवा सामाजिक पुरस्कार ) या युवांना सन्मानित करण्यात आले.








यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचा महिला गौरव पुरस्कार "समाजसेवाव्रती अनुसया पाटील" यांना...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचा
महिला गौरव पुरस्कार "समाजसेवाव्रती अनुसया पाटील" यांना...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, महाराष्ट्र महिला व्यासपीठ आयोजित जागतिक महिला दिननिमित्त 'महिला गौरव पुरस्कार" समाजसेवाव्रती अनुसया पाटील यांना शुक्रवार, ८ मार्च २०१९ रोजी सायं ४ वाजता, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे प्रधान करण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी अभिनेत्री सीमा देशमुख उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी अँड सविता प्रभुणे या "भारतीय दंड विधान कलम ४९७" याविषयी मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. विजया वाड भूषविणार आहेत.


गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रमाणपत्र वितरण सोहळा...

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रमाणपत्र वितरण सोहळा...

स्टार्की फाऊंडेशन अमेरिका, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, अपंग हक्क विकास मंच, टाटा ट्रस्ट, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, आरव्हीएम एज्युकेशनल अँण्ड चॅरिटेबल फाऊंडेशन मुंबई, ठाकरसी ग्रुप मुंबई, बी.जी. शिर्के ग्रुप, मुंबई आणि महात्मा गांधी सेवा संघ, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ रोजी पुणे येथे बालेवाडी क्रीडा संकुलात महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांतील एकूण ६००० कर्णबधिर विद्यार्थ्यांना व ज्येष्ठ नागरीकांना मोफत आत्याधुनिक डिजिटल श्रवणयंत्र बसविण्यात आली. यावेळी दुपारी १२ ते सायं ६ या कालावधीमध्ये ४८४० कर्णबधिरांना कर्णयंत्र लावून "गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" करण्यात आले व त्याची तशी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होऊन त्याचा प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक १२ मार्च, २०१९ रोजी सायं ५.०० वा. स्थळ मुख्य सभागृह, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे होणार आहे. या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून अमेरीकेहून स्टारकी फाऊंडेशनेचे संस्थापक बिल अँस्टीन व त्यांच्या पत्नी उपस्थित राहणार आहेत. टाटा ट्रस्ट, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, आरव्हीएस एज्युकेशनल अॅण्ड चॅरिटेबल फाऊंडेशन मुंबई, ठाकरसी ग्रुप मुंबई, या संस्थांचे अध्यक्ष तसेच गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे (यु.के) अधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी बिल अँस्टीन व त्यांच्या पत्नी मा. टॅनी अँस्टिन यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने "यशवंतराव चव्हाण विशेष पुरस्कार, भारत" देवून गौरविण्यात येणार आहे.