Thursday, 21 February 2019

साहित्य मंदिर सभाग्रृहात रंगणार ‘स्वर तीर्थ’..

साहित्य मंदिर सभाग्रृहात रंगणार ‘स्वर तीर्थ’...
पु. ल. देशपांडे, सुधीर फडके व ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने मेघ मल्हार यांचा ‘स्वर तीर्थ’ हा कार्यक्रम शनिवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वा. साहित्य मंदिर सभाग्रृह, वाशी येथे आयोजित करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबई केंद्रातर्फे आयोजित करण्यात येणा-या या दर्जेदार कार्यक्रमाचा विनामूल्य आस्वाद घेता येणार आहे.

जिंतूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत वैश्विक ओळखपत्र वाटप नोंदणी शिबीर


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणी यांच्यातर्फे दि. २१ फेब्रुवारी २०१९ रोजी पंचायत समिती जिंतूर ता.जिंतूर जि. परभणी येथे ‘दिव्यांगअस्मिता’ अभियानांतर्गत जिंतूर तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत वैश्विक ओळख पत्र वाटपासाठी नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबीराच्या उदघाटनाला मा.श्री.आर.जी.गायकवाड(वै.शा.का.जि.प.परभणी) अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे मा.श्री.विष्णू वैरागड (समन्वयक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणी)मा.श्री.शेख साहेब(गट विकास अधिकारी,जिंतूर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांगाना प्रातनिधिक स्वरूपात वैश्विक कार्ड वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिंतूर तालुक्यातील ३६५ दिव्यांगानी वैश्विक ओळख पत्रासाठी नोंदणी केली.या कार्यक्रमासाठी जिंतूर तालुक्यातील दिव्यांग संघटनेचे विविध पदाधिकारी व विशेष शाळेतील कर्मचारी या प्रसंगी मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा.श्री.ताटे सर(विशेष शिक्षक)तर आभार प्रदर्शन मा.श्री.अपुर्वा सर यांनी केले.



Wednesday, 20 February 2019

'दिव्यांगअस्मिता' अभियानांतर्गत दिव्यांग व्यक्तींना मोफत वैश्विक ओळख पत्र वाटप नोंदणी शिबीर

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,आयुक्त,अपंग कल्याण म.रा.पुणे,जिल्हा समाज कल्याण जि.प.परभणी व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणी व महात्मा गांधी सेवा संघ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज २० फेब्रुवारी २०१९ रोजी जि.प.कन्या प्रशाला परभणी येथे "दिव्यांगअस्मिता अभियानांतर्गत परभणी तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत वैश्विक ओळख पत्र वाटपासाठी नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबीरासाठी उदघाटनाला मा.श्री.पृथ्वीराज बी.पी.(मुख्यकाय॔कारी अधिकारी जि.प.परभणी)हे अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे मा.डाॅ.सौ.संध्याताई दूधगावकर(प्राचार्य तथा अध्यक्ष यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र,परभणी)मा.सौ.एस.के.भोजने(जि.स.क.जि.प.परभणी)मा.श्री.विजयरावजी कान्हेकर(सचिव य.च.प्र वि.के.परभणी)मा.श्री.ढोकणे(गट विकास अधिकारी,परभणी)मा.श्री.आर.जी.गायकवाड (वै.सा.का.जि.प.परभणी)यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांगाना प्रातनिधिक स्वरूपात वैश्विक काड॔ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी परभणी तालुक्यातील २५० दिव्यांगानी वैश्विक ओळख पत्रासाठी नोंदणी केली.या कार्यक्रमासाठी परभणी तालुक्यातील दिव्यांग संघटनेचे विविध पदाधिकारी व विशेष शाळेतील कम॔चारी या प्रसंगी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.श्री.घायाळ सर(विशेष शिक्षक)तर आभार प्रदर्शन मा.श्री.विष्णू वैरागड(समन्वयक,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र परभणी)यांनी केले.





शनिवार, 23 फेब्रुवारीला चित्रपट चावडीत अमेरिकन चित्रपट ‘रोप’चे प्रदर्शन


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद व एमजीएम पत्रकारीता महाविद्यालय संचलीत एमजीएम फिल्म आर्ट्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रपट चावडी उपक्रमाअंतर्गत, शनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2019 रोजी सायं. 6 वा. ‘रोप’ हा चित्रपट चित्रपती व्ही. शांताराम प्रेक्षागृह, एमजीएम फिल्म आर्ट विभाग, एमजीएम पत्रकारीता महाविद्यालय, औरंगाबाद येथे दाखविण्यात येणार आहे.



Friday, 15 February 2019

'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत पस्तीसावे पुष्प... 'जमिनीखालील तेलवाहिन्या'

संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत पस्तीसाव्या पुष्पाचे आयोजन करण्यात आले होते. श्री अनंत पांडुरंग देशपांडे यांनी 'जमिनीखालील तेलवाहिन्या' या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी माहितीचे प्रेझेंटेशन सादर केले. अगदी दोन दशकांपूर्वीपासून ते आतापर्यंत तेलवाहिन्यांमधून वाहतूक कशा प्रकारे केली जाते, त्यांचा वापर कसा करून घेतला जातो, त्यांची निगा कशी ठेवली जाते अशा प्रकारची माहिती त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितली. याबरोबरच याचे फायदे व तोटे देखील त्यांनी सांगितले.



Thursday, 7 February 2019

'आरती थाळी सजावट' विनामूल्य कार्यशाळा संपन्न...


संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठ तर्फे विनामूल्य आरती थाळी सजावट या एकदिवसीय विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 'क्रिएटिव्ह आर्ट, ऑफ वीणा म्हात्रे संस्था' च्या संस्थापिका विणा म्हात्रे या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका होत्या. त्यांनी उपस्थित महिलांना उत्तमरित्या मार्गदर्शन केले. महिलांनी या कार्यशाळेला अतिशय चांगला प्रतिसाद दिल्याने सदर कार्यशाळा उत्साहवर्धक स्थितीत पार पडली.




को-ऑपरेटिव्ह सोसायटीला जीएसटी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे...रमेश प्रभू

संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे बुधवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी को-ऑपरेटिव्ह सोसायटी संबंधीत इनकम टॅक्स आणि जीएसटी या विषयावरती विनामूल्य मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशन (MSWA) चे अध्यक्ष, सीए रमेश प्रभू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. GST कधी भरावा लागतो? का भरावा लागतो? किती मर्यादेपर्यंत GST भरणे अनिवार्य आहे? अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


ले. शेवटी प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले.