यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि अपंग हक्क विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी १० नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी ३ वाजता "दिव्यांग कट्टा"चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये अपंग स्टॉलधारकांच्या समस्या या विषयावर चर्चा करण्यात आली. आलेल्या दिव्यांग व्यक्तींची विचारपूस करून त्यांच्या अपंग स्टॉलधारकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यानंतर शमीद खान यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
Friday, 10 November 2017
‘चित्रपट चावडी’तर्फे चित्रपटप्रेमींसाठी ‘इक्सेन्ट्रीसीटीज ऑफ ब्लाँड हेअर्ड गर्ल’
नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार ११ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध पोर्तुगाल दिग्दर्शक मॅन्युएल डी. ऑलीवेरा यांचा ‘इक्सेन्ट्रीसीटीज ऑफ ब्लाँड हेअर्ड गर्ल’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
‘इक्सेन्ट्रीसीटीज ऑफ ब्लाँड हेअर्ड गर्ल’ हा चित्रपट एका तरूण जोडीचा प्रेमपट आहे. आगगाडीच्या प्रवासात एक तरूण एका मध्यमवयीन सहप्रवासी स्त्रीला त्याच्या आयुष्यात आलेल्या एका सुंदर तरूणीबद्दल सांगतो. चायनीज पंखा धारण करणार्या त्या तरूणीच्या प्रेमात पडलेल्या ह्या तरूणाची काय अवस्था होते ते पहाण्यासाठी अवश्य या. २००९ मध्ये पोर्तुगीज येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी ६४ मिनीटांचा आहे.
‘इक्सेन्ट्रीसीटीज ऑफ ब्लाँड हेअर्ड गर्ल’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.
Thursday, 9 November 2017
"सहकारी गृहनिर्माण संस्था"एकदिवशीय माहिती कार्यशाळा
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे "सहकारी गृहनिर्माण संस्था" कायदा आणि नियम यासंदर्भात एकदिवशीय माहिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये कायदा आणि नियम यासंदर्भात प्रभाकर चुरी हे २ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ११ ते ५ यावेळेत प्रक्षिणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होण्या-या प्रक्षिणार्थीं कडून २५० रूपये शुल्क आकारले जाईल. ही कार्यशाळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई जन.जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई येथे होईल. या कार्यशाळेसाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. संपर्क - ८२९१४१६२१६, २२०४५४६०.
एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता (राज्यस्तरीय चर्चासत्र)
मराठवाड्यात २०१५ व २०१६ या दोन वर्षांमध्ये पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 'एकल महिला व पाणिप्रश्न' या विषयावर संशोधन अहवाल प्रसिध्द करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने औरंगाबाद येथे ९ सप्टेंबर २०१७ रोजी 'एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता' या विषयावर विभागीय चर्चासत्र आयोजीत केले होते. या कार्यक्रमात झालेल्या सर्व चर्चेतून एक समान सूर समोर आला तो म्हणजे एकल महिलांसाठी 'स्वतंत्र धोरणाची आखणी' करणे गरजेचे आहे.
या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विकास अध्ययन केंद्र, मुंबई, कोरो-मुंबई, कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट, मुंबई या सर्व संस्थांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण केंद्र, जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१ येथे राज्यस्तरीय चर्चासत्र सोमवारी १३ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ९ ते ३ तीन यावेळेत आयोजीत करण्यात आले आहे. समाजातील सर्व घटकांमधील महिलांच्या प्रश्नांवर कार्य करणा-या व्यक्ती व संस्थांना या चर्चासत्राकरिता आमंत्रित करीत आहोत.
या चर्चासत्रासाठी आपला सहभाग महत्त्वपुर्ण आहे. आपण ह्या सगळ्या प्रक्रियेत सहभागी झालात तर एकत्र मिळून एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरणाचा प्राथमिक मसुदा शासनाला २०१८ साली जागतिक महिला दिनी सादर करता येईल, असे आम्हांस वाटते. यासाठीचे चर्चासत्र आणि पुढील धोरणाची मांडणी करण्यासाठी आपली संस्थाही या प्रक्रियेत सोबत जोडली जावी असे आम्हाला वाटते, तरी आपल्या संस्थेतील दोन प्रतिनिधिंना या चर्चासत्रात सहभाग नोंदविण्याकरिता पाठवावे, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
विशेष सुचना : चर्चासत्रातील सहभाग निशुल्क असून उपस्थित प्रतिनिधींच्या चहा नास्ता व भोजनाची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात आलेली आहे. चर्चासत्राकरीताची नोंदणी अनिवार्य असून शनिवार, दि. ११ नोव्हेंबर २०१७ रोजी पर्यंत नोंदणी करण्यात यावी. नोंदणी करीता संपर्क - मनिषा खिल्लारे (७०२०२९९६७७)
अपंग स्टॉलधारकांच्या समस्यावर चर्चा
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि अपंग हक्क विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी १० नोव्हेंबर २०१७ रोजी दुपारी ३ वाजता "दिव्यांग कट्टा"चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये अपंग स्टॉलधारकांच्या समस्या या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अधिक लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन विजय कान्हेकर यांनी केले आहे.
Sunday, 5 November 2017
जीएसटी कायद्या मध्ये जागतिक विक्रम ठरावा इतक्या दुरुस्त्या
जीएसटी कायद्या मध्ये जागतिक विक्रम ठरावा इतक्या दुरुस्त्या आत्तापर्यंत झाल्या आहेत, व करत राहाव्या लागणार आहेत. हट्टीपणा व श्रेय घेण्यासाठी उतावळेपणा यातून हे घडते आहे, असं मतं अर्थविषयक सल्लागार अजित जोशी यांनी नूकतेच झालेल्या कार्यक्रमामध्ये व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र कोकण, ठाणे आणि युवाराज प्रतिष्ठान, बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “जीएसटी - काही अनुक्तरीत प्रश्न” यावर आयोजित केलेल्या विशेष व्याख्याना मध्ये ते बोलत होते.
सरकारने जीएसटी कायद्याची अंमलबजावणी अत्यंत अनावश्यक घाईने व पुरेश्या नियोजना अभावी करण्याचा प्रयत्न केला आहे. योग्य सॉफ्टवेअर सुद्धा तयार करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. त्याचा परिणाम असंघटीत छोट्या उद्योग धंद्यांवर विपरीत झाला आहे. असंही ते यावेळी म्हणाले.
जेष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांनी इतर अनेक देशातील(सिंगापूर ते ब्राझील ) जीएसटी च्या अंमलबजावणीची उदाहरणे देऊन आपल्या देशातील अंमलबजावणी मधील दोष व त्रुटी मांडल्या. अमेरिकेत जीएसटी का लागू करण्यात आला नाही, हेही उदाहरणे देऊन स्पष्ट केले. आणि भारतात लागू करण्यातील अडचणी व अडथळे समजावून सांगितले. याबाबत उद्योग व व्यवसायनुसार परिषदा घेऊन चर्चा घडवून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन आशिष दामले केले होते. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला दत्ता बाळसराफ, सुनिल तांबे आणि पद्मभूषण देशपांडे हे मान्यवर उपस्थित होते.
Subscribe to:
Posts (Atom)





