यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत टाटा इन्स्टिटयुट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे शास्त्रज्ञ प्रा. जे. एस यादव यांचे 'कृष्ण विवर' या विषयावरील नववे पुष्प बुधवार दि. १६ नोव्हेंबर २०१६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१ येथे आयोजित केलेले आहे. प्रा. यादव हे आय.एफ.आर मध्ये सन १९८२ पासून कार्यरत असून एस्ट्रोसेट उपग्रहावर कृष्ण विवरांसंबंधी माहिती मिळविण्यासाठी बसविलेल्या उपकरणाचे ते निर्माते आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती..
Saturday, 5 November 2016
'विज्ञानगंगा'चे नववे पुष्प.. 'कृष्ण विवर'
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' कार्यक्रमांतर्गत टाटा इन्स्टिटयुट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे शास्त्रज्ञ प्रा. जे. एस यादव यांचे 'कृष्ण विवर' या विषयावरील नववे पुष्प बुधवार दि. १६ नोव्हेंबर २०१६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१ येथे आयोजित केलेले आहे. प्रा. यादव हे आय.एफ.आर मध्ये सन १९८२ पासून कार्यरत असून एस्ट्रोसेट उपग्रहावर कृष्ण विवरांसंबंधी माहिती मिळविण्यासाठी बसविलेल्या उपकरणाचे ते निर्माते आहेत. तरी वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही विनंती..
Friday, 4 November 2016
'पर्व-प्रगतीचे, परिवर्तनाचे' पुस्तिका प्रकाशित...
पुणे विभागीय केंद्र : आदरणीय पवारसाहेबांच्या कायदे मंडळातील कारकीर्दीला अविरत पाच दशकांचा कालावधी एकाही दिवसांच्या खंडाविना पूर्ण होत आहे. यानिमित्ताने शालेय व महाविद्यालयीन युवा वाचकांसाठी 'पर्व-प्रगतीचे, परिवर्तनाचे' ही पुस्तिका प्रकाशित करण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी या निमित्ताने आयोजित उपक्रमाची माहिती पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.
या पुस्तिकेच्या प्रकाशनाला राज्यव्यापी उपक्रमाची जोड देत या पुस्तिकेचा संदर्भ असलेले विषय घेऊन माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावर आयोजित केली आहे. या निबंध व वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून या पुस्तिकेचे व इतर आनुषंगिक साहित्याचे वाचन व मनन विद्यार्थी करतील आणि या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.
http://ycpmumbai.com/images/pdf/parva_parivatan_2016.pdf

Saturday, 29 October 2016
'रंगस्वर' तर्फे 'सूरप्रभात' कार्यक्रम संपन्न...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व "रंगस्वर" तर्फे दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी "सूरप्रभात' हा कार्यक्रम शनिवार दिनांक २९ ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य सभागृहात संपन्न झाला. श्रीमती सुष्मीता दास (गायन) तबला- ओजस अधिया संवादिनी - सिद्धेश बिचोलकर आणि पंडित गणपती भट ( गायन) तबला- श्रीधर मंदारे संवादिनी - केबल कावले यांचा संगीतमय जादूने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रेखा नार्वेकर यांनी केले.
Sunday, 23 October 2016
पाचवी शक्ती ह्या विषयावर शास्त्रज्ञ प्रा. एन. कृष्णन यांचे व्याख्यान संपन्न...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध मार्गदर्शन शिबीरे आयोजित केली जातात. त्यातील एक उपक्रम म्हणजे 'विज्ञानगंगा' हा उपक्रम प्रतिष्ठान आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जातो. 'विज्ञानगंगा' उपक्रमांतर्गत होणा-या कार्यक्रमाचे आठवे पुष्प प्रतिष्ठानच्या सभागृहात नुकतेच पार पडले. ह्या आठव्या मार्गदर्शन कार्यक्रमाचा विषय होता The fifth force (पाचवी शक्ती) प्रा. एन. कृष्णन्. आतापर्यंत आपल्याला गुरूत्वाकर्षण शक्ती, चुंबकीय शक्ती, तीव्र अणुशक्ती, आणि सौम्य अणुशक्ती ह्या चार प्रकारच्या शक्ती माहित आहेत. तथापि, पाचवी शक्ती अस्तित्वात असल्याचे पुरावे हाती येत आहेत याची माहिती प्रा. एन. कृष्णन् यांनी दिली. केलेले मार्गदर्शन लक्षपूर्वक ऐकून कार्यक्रमाच्या शेवटी शंकासमाधनासाठी अनेक प्रश्न विचारले गेले.
Tuesday, 18 October 2016
'पर्व-प्रगतीचे, परिवर्तनाचे' ....
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ही संस्था गेली तीन दशके सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक क्षेत्रांत वेगवेगळे उपक्रम राबविताना नव्या पिढीची जडण-घडण सम्यकपणे घडावी, असा आम्हा सर्वांचाच प्रयत्न असतो. प्रागतिक आणि परिवर्तनवादी विचारांची विधायक दृष्टी असलेली क्रियाशील तरुणाई या प्रक्रियेतून पुढे येईल, अशी आशा आहे. त्यादृष्टीने शालेय व महाविद्यालयीन युवा वाचकांसाठी 'पर्व-प्रगतीचे, परिवर्तनाचे' ही पुस्तिका प्रकाशित करीत आहोत व त्याला एक राज्यव्यापी उपक्रमाची जोड देत आहोत. या पुस्तिकेचा संदर्भ असलेले विषय घेऊन माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावर आयोजित केली आहे. या निबंध व वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून या पुस्तिकेचे व इतर अनुषंगिक साहित्याचे वाचन व मनन विद्यार्थी करतील आणि या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.
आदरणीय पवारसाहेबांच्या कायदे मंडळातील कारकिर्दीला अविरत पाच दशकांचा कालावधी एकाही दिवसाच्या खंडाविना पूर्ण होत आहे, ही आपल्या सर्वांनाच आनंदानची व अभिमानाची बाब आहे. यानिमित्ताने त्यांच्या या कारकिर्दीतील काही महत्त्वाची धोरणे व निर्णय यांचा या पुस्तिकेत अतिशय मोजक्या शब्दांत परिचय करून दिला आहे. अतिशय कमी वेळेत या पुस्तिकेच्या संदापनाची जबाबदारी ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी पार पाडली, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.
- सुप्रिया सुळे, कार्याध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

http://ycpmumbai.com/images/pdf/s_pawar_book_18102016.pdf
Monday, 17 October 2016
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक २०१६ सुप्रसिद्ध उद्योगपती श्री प्रतापशेठ दादा साळुंखे यांना देण्यात येणार...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी कृषी, औद्योगिक, समाजरचना/व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता / विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास / आर्थिक सामाजिक विकास, मराठी साहित्य, संस्कृति/कला क्रीडा या क्षेत्रांमध्ये लक्षणीय कामगिरी करणा-या महाराष्ट्रातील व्यक्तीस/संस्थेस यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येते. रोख रक्कम. रु. २,००,०००/- व मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरुप आहे..वरील क्षेत्रामध्ये लक्षणीय कार्य करणा-या व्यक्ती अगर संस्था यांच्या विषयी प्राप्त झालेल्या शिफारसींचा विचार करुन पारितोषिक निवड समितीने सुप्रसिद्ध उद्योगपती श्री. प्रतापशेठ दादा साळुंखे यांची या वर्षीच्या पारितोषिकासाठी निवड केलेली आहे. श्री प्रतापशेठ दादा साळुंखे यांनी गेली अनेक औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. या क्षेत्रातील त्यांचे असाधारण कर्तृत्व लक्षांत घेऊन हे पारितोषिक मा. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे दिनांक २५ नोव्हेंबर २०१६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता चव्हाण केंद्रात आयोजित केलेल्या कार्यक्रमाध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. श्री. शरद पवार यांच्या हस्ते श्री. प्रतापशेठ दादा साळुंखे यांना देण्यात येईल.
Subscribe to:
Posts (Atom)