रांगोळी म्हणजे प्रसन्नता, सकारात्मक व भारतीय संस्कृतीचे कलात्मक प्रतिबिंब असं चित्र लगेच डोळ्यांसमोर चटकन उभं राहतं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि महाराष्ट्र महिला व्यासपीठातर्फे "मंजिरीच्या झटपट रांगोळ्या व रांगोळी काढायच्या सोप्या व विविध पद्धती" या विषयावरती प्रशिक्षणार्थींच्या आग्रहाखातर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २० ऑक्टोबर २०१८ शनिवारी दुपारी २ ते ५ यावेळेत बेसमेंट सभागृह, वाय बी सेंटर, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, सचिवालय जिमखाना जवळ, मुंबई २१ कार्यशाळा होईल. अधिक संपर्क संजना पवार ८२९१४१६२१६, ऑफीस २२०४५४६० (२४४).
No comments:
Post a Comment