Wednesday 26 September 2018

डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ’ पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सर्व विद्यार्थांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचा विभाग शिक्षण विकास मंच मागील ६ वर्षांपासून कार्यरत आहे. प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचाने आतापर्यंत अनेक परिषदा, कार्यशाळा आणि चर्चासत्रे चव्हाण सेंटर आयोजित केली आहेत. तसेच शासनाला धोरणात्मक बदल करण्याच्या दृष्टीने शिफारशीही केल्या आहेत.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचतर्फे प्रतिवर्षी शैक्षणिक विषयक लिखाण केलेल्या उत्कृष्ट पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक यांना ‘डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ’ पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी हा पुरस्कार दि. २५ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रदान करण्यात येणार आहे. यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या शिक्षण विकास मंचाकडून उत्कृष्ट शिक्षणविषयक पुस्तकं मागविण्यात आले आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शिक्षणाची गुणवत्ता, मूल्यमापन पध्दती, शालेय उपक्रम, समाजाचा सहभाग, शैक्षणिक प्रशासन अशा विषयांना स्पर्श करणारे हे पुस्तक असावे.

तसेच शैक्षणिक प्रश्नांवर उपाययोजना त्यात मांडलेल्या असाव्यात. हे पुस्तक दि. १ ऑक्टोबर २०१७ ते दि. ३० सप्टेंबर २०१८ या कालावधीत प्रकाशित झालेले असावे. तरी संबंधित प्रकाशकांनी/लेखकांनी सदर ग्रंथाच्या दोन प्रती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य कार्यालयात शनिवार दि. ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई – २१. येथे पाठवाव्यात अशी विनंती डॉ. वसंत काळपांडे मुख्य संयोजकशिक्षण विकास मंच यांनी केली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. माधव सूर्यवंशी – ९९६७५४६४९८ श्री. रमेश मोरे – ९००४६५२२६२

No comments:

Post a Comment