Thursday, 27 September 2018

ठाणे विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने ठाणे शहरातील काही निवडक ज्येष्ठांचा, त्यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याचा गौरव करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र ठाणे रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने 'ज्येष्ठ नागरिक गौरव संध्या' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मा. महेश झगडे, आय. ए. एस. निवृत्त प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील, तर श्री. विश्र्वंभर दास, डॉ. दामोदर खडसे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, श्री. अरबिंद हेब्बार आणि डॉ. भगवान नागापूरकर यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहेत. सत्कारानिमित्त मुकेश, किशोर कुमार, लता, आशा यांच्या काही निवडक गाण्यांचा खास कार्यक्रम आयोजीत केला आहे.

हा कार्यक्रम मंगळवारी २ ऑक्टोबर २०१८ रोजी संध्याकाळी ६ वाजता नरेंद्र बल्लाळ सभागृह, पहिला मजला, ठाणे महानगरपालिका ठाणे (प) येथे सुरू होईल. रोटोरीयन दिलीप दंड, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ, रोटेरीयन अॅड. विशाल लांजेकर, सचिव, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ, अमोल नाले, सचिव, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ठाणे जिल्हा केंद्र, आणि मुरलीधर नाले अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ठाणे जिल्हा केंद्र यांनी अधिक संख्येने लोकांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे. 

No comments:

Post a Comment