Thursday 12 July 2018

विशेष निवेदन

शिक्षण विकास मंच-यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि ज्ञानभाषामराठी प्रतिष्ठान, डोंबिवली या दोन संस्थांच्या वतीने "सेमी-ENGLISH" या विषयावर एक मार्गदर्शक ग्रंथ तयार करण्याचे प्रयोजन आहे.

शिक्षण विकास मंचने २५ नोव्हेंबर २०१७ रोजी 'सेमी इंग्रजी-काल,आज,उद्या' या विषयावर राज्यस्तरीय परिषद आयोजित केली होती. या परिषदेत संबंधित विषयावर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेचा संदर्भ घेऊन सर्वाना मार्गदर्शक ठरणारा ग्रंथ तयार करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे.

सदर काम वर उल्लेखलेल्या दोन्ही संस्थांच्या सहकार्याने केले जात आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्य माहिती असेलच.. *संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार , पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मृत्यूनंतर त्याचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी १९८५ साली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना झाली.* प्रतिष्ठान समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत आहे. प्रतिष्ठानचे शिक्षणविषयक कार्यक्रम "शिक्षण विकास मंच" च्या माध्यमातून आयोजित करण्यात येतात. याच्या निमंत्रक मा. खासदार सुप्रियाताई सुळे आहेत तर मुख्य संयोजक जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ डाॅ.वसंतराव काळपांडे हे आहेत. २००८ पासून शिक्षण विकास मंच महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे याकरीता प्रयत्नरत आहे. यासाठी शिक्षण विकास मंच राज्यभर विविध उपक्रम राबवित असतो. विविध विषयावर शैक्षणिक परिषदा ,कार्यशाळा, चर्चासत्रे, शिक्षक साहित्य संमेलने, शिक्षणकट्टा, उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथाना पुरस्कार आणि विविध मार्गदर्शनपर पुस्तकाची निर्मिती इत्यादी.

त्याचप्रमाणे "ज्ञानभाषामराठी प्रतिष्ठान" ही मराठी भाषेप्रती बांधिलकी बाळगणारी संस्था आहे. २०१७ साली नोंदणीकृत झालेल्या संस्थेचे अध्यक्ष सुचिकांत वनारसे आहेत . अल्पावधीतच या संस्थेने मराठी भाषेच्या संदर्भात संवर्धनाच्या, प्रसाराच्या कार्यासाठी जी पावले टाकली आहेत, ती कौतुकास्पद आहेत. संस्थेच्या कार्यकारी मंडळामार्फत गेल्या तीन वर्षांत अनेक भाषिक तसेच शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. "ज्ञानभाषामराठी प्रतिष्ठान"ने स्वतःला मातृभाषेतून शिक्षणाचे समर्थन, प्रचार-प्रसार आणि सक्षमीकरण यासाठी वाहून घेतले आहे. मराठी ही ज्ञानभाषा म्हणून सक्षम व्हावी, लोकभाषा आणि राजभाषा म्हणून सार्वजनिक क्षेत्रात तिला प्राधान्य मिळावे ही भूमिका "ज्ञानभाषामराठी प्रतिष्ठान"ने नेहमीच घेतली आहे. विविध समाजमाध्यमाच्या मदतीने प्रतिष्ठानने महाराष्ट्रभर झेप घेतली आहे. त्या त्या भागातील सदस्यांना सोबत घेऊन मराठी भाषा सक्षमीकरणाचे काम सुरू केले आहे. माझी शाळा-माझी भाषा, ऑनलाईन वाचनकट्टा, युनिकोडिंग,चला अनुवाद करू या, ज्ञान-विज्ञानपर साहित्याचा प्रसार, निर्मिती आदी उपक्रमातून ज्ञानभाषामराठी प्रतिष्ठानचे काम सुरू आहे.

उपरोक्त उल्लेख केलेल्या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून 'सेमी-ENGLISH' या विषयावर काम सुरू आहे.
सेमी इंग्रजी वर्ग भरवणाऱ्या शाळांच्या सक्षमीकरणाचा भाग म्हणून सर्वाना मार्गदर्शक ठरणारा, विविध शालेय उपक्रमाचा अंतर्भाव असणारा संशोधन ग्रंथ आम्ही तयार करीत आहोत.

याकामी आपण आपल्या शाळेत राबविलेले उपक्रम व अन्य माहिती पुढे दिलेल्या गुगल फॉर्मच्या प्रश्नावलीत भरून दयावी असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने डाॅ.वसंतराव काळपांडे यांनी केले आहे.

गुगल फॉर्म- https://goo.gl/9Pdmss
अधिक माहितीसाठी संपर्क :-
इमेल - semi-english@gmail.com
श्री. अजित तिजोरे- ८०९७६१७०२०
श्री. माधव सूर्यवंशी- ९९६७५४६४९८
सौ. मृणाल पाटोळे- ७५०६९१९८१६

No comments:

Post a Comment