अहमदनगर : सीटा (सेंटर फॉर इंटरनॅशनल ट्रेड इन अॅग्रीकल्चर अॅण्ड अॅग्रोबेस्ड इंडस्ट्रिज), यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी कंपन्या वा फार्मर प्रोड्युसर कंपन्या आणि शेतमालाचे ठोक खरेदीदार यांच्यासाठी इ-कॉमर्स प्लॅटफार्मची निर्मिती, शेतकरी कंपन्यांचा सक्षमीकरण या विषयावर सीटा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सोमवारी १६ जुलै २०१८ रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत सदरील कार्यक्रम कृषी महाविद्यालय सोनई येथे होणार आहे.
या कार्यक्रमामध्ये सीटाचे संचालक ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ, मा. फिरोज मसानी, सीटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमुख पाहुणे मा. सुनील तांबे, आणि मा. दत्ता बाळसराफ इत्यादी मान्यवर मार्गदर्शन करतील. तसेच मा. भाऊसाहेब ब-हाटे प्रकल्प संचालक आत्मा, अहमदनगर यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आहे. सदरील कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, पूर्व नोंदणी आवश्यक आहे. दि. १५ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत इच्छुकांनी (मो.क्र. ८३९०६५४१०९, ९५२७११०८०९ )या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र अहमदनगर चे सचिव प्रशांत गडाख यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment